' अमिताभ बच्चनने राजकारणात आल्यावर एका रात्रीतुन “हा महत्वाचा” नियम बदलला… – InMarathi

अमिताभ बच्चनने राजकारणात आल्यावर एका रात्रीतुन “हा महत्वाचा” नियम बदलला…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अमिताभ नावाचा दबदबा गेली कित्येक वर्षं केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर जवळपास सर्वत्र आहे. बच्चन काही सांगेल आणि होणार नाही हे जवळपास अशक्य आहे. मात्र अमिताभनं चक्क राष्ट्रपती भवनातला एका नियम रातोरात बदलायला लावला हे तुम्हाला माहित आहे का?

अमिताभ बच्चन, नाम ही काफी है. या नावाला कोणत्याही परिचयाची गरजच नाही. बच्चन या नावाला आणि त्यांच्या शब्दालाही वजन आहे. सामाजिक कार्य असो, राजकारण असो कि मनोरंजन बच्चन हे नाव सर्वव्यापी आहे.

 

amitabh bachchan inmarathi

 

या वजनाची प्रचिती तेंव्हा आली जेंव्हा अमिताभच्या विनंतीवरून राष्ट्रपती भवनातला वर्षानुवर्षं चालत आलेला नियमही बदलला. याबद्दल कोणाला फारशी माहिती नव्हती मात्र साक्षात अमिताभनच शबाना आझमीला ही गोष्ट सांगितली आणि मग ती सर्वांना समजली.

===

हे ही वाचा ‘नाटक मत कर, रख फोन नीचे’ नितीन गडकरींनी अमिताभला झापलं…

===

त्याचं झालं असं कि, १९८३ या वर्षातली ही गोष्ट आहे. अमिताभ आणि शबाना आझमी यांच्या “मैं आझाद हूं” या चित्रपटाचं शूटींग चालू होतं. निर्माते टिनू आनंद दिग्दर्शक असणार्‍या या चित्रपटाची तेंव्हा वेगळ्या वाटेवरचा अमिताभपट म्हणून चर्चा होत होती.

या चित्रपटाच्या थोडा काळ आधीच अमिताभनं राजकारणात प्रवेश केलेला होता. राजकारणी अमिताभचा हा पहिलाच चित्रपट असल्यानंही याच्या चर्चा होत्या.

या चित्रपटाच्या सेटवर एकदा शबानानं गप्पा गप्पात अमिताभला प्रश्न विचारला की सांसद म्हणून तू काही बदल करण्याचे प्रयत्न केलास का? किंवा एखादा नविन नियम बनवलास का?

 

amitabh and shabana inmarathi

 

शबानानं सहज गुगली म्हणून टाकलेल्या या प्रश्नाला अमिताभनं जे उत्तर दिलं ते ऐकून सेटवरचे तर चकीत झालेच पण हे उत्तर बातमीचा विषय बनलं.

अमिताभनं सांगितलं की, त्याला एकदा राष्ट्रपती भवनात डिनरचं आमंत्रण आलं होतं. राष्ट्रपती भवनात डिनर ही प्रतिष्ठेचीच गोष्ट आहे. अमिताभ ठरलेल्या वेळेत प्रोटोकॉल पाळत हजर झाला.

जेवणाच्या प्रशस्त टेबलवर बसलेला असतानाच त्याचं लक्ष समोर ठेवलेल्या डिशवर गेलं. त्या प्लेटवर त्यावर राष्ट्रीय प्रतिक असणार्‍या अशोक स्तंभाचं चित्र होतं आणि त्यात अन्नपदार्थ वाढले जात होते. अमिताभच्या मनाला ही गोष्ट पटली नाही. मात्र तो त्यावेळेस काही बोलला नाही.

त्यानंतर मात्र जेंव्हा त्याला संधी मिळाली तेंव्हा त्यानं हा मुद्दा संसदेत मांडला आणि नाराजी व्यक्त केली. अभिमानाचं असं राष्ट्रीय प्रतिक डिशवर असणं हा त्या प्रतिकाचा अपमान असल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर थोड्याच दिवसांत आदेश निघाले की खाण्याच्या डिशवर आता अशोक स्तंभाचं चित्र असणार नाही.

 

ashokstambha inmarathi

 

या घटनेला एक पार्श्वभूमी असल्याचंही अमिताभनं सांगितलं. अमिताभच्या शहेनशाहचं चित्रीकरण चाललेलं असताना इंदर राज यांच्यासोबत झालेल्या एका चर्चेमुळे हा विचार त्याच्या मनात रुजल्याचं त्यानं सांगितलं.

इंदर राज यांची निर्मिती असलेला आणि टिनू आनंद दिग्दर्शक असलेल्या शहेनशाहचं चित्रीकरण चाललेलं होतं. मात्र एका कारणावरून टिनू आणि अमिताभमधे वाद झाले आणि दोघांमधली बातचीत बंद झाली.

===

हे ही वाचा बच्चनच्या शहेनशहा आणि हॉलिवूडच्या सुपरमॅनमधील एक साम्य अभिमानास्पद आहे

===

घटना अशी घडली होती की, एका दृष्यात अमिताभला खाकी वर्दी घालायला सांगितलेली मात्र अमिताभ या दृष्यात ब्लेझरच हवा म्हणून हटून बसला. दोघेही आपापल्या मुद्द्यावर अडून बसले होते आणि चित्रीकरणावर याचा परिणाम होऊ लागला.

 

amitabh in shahenshah inmarathi

 

शेवटी अमिताभनं इंदर राज यांच्यासोबत बोलायचं ठरवलं. इंदर राजही शांतपणे अमिताभशी बोलायला लागले. बोलता बोलता इंदर राज यांनी अमिताभच्या समोरच असलेल्या कचर्‍याच्या डब्याकडे इशारा करत अमिताभला विचारलं –

अमित तुला कचर्‍याच्या डब्यातला कचरा दिसतोय? नीट बघ, त्यात केशरी, पांढरे आणि हिरव्या रंगाचे कागदाचे कपटे आहेत. जर हे तुकडे एकत्र केले तर त्याचा तिरंगा बनेल आणि मग त्या तिरंग्यासाठी तू तुझा जीव द्यायलाही तयार होशील.

त्याचप्रमाणे पोलिसांची खाकी वर्दी जेंव्हा एखादा सामान्य व्यक्तीही अंगावर चढवतो तेंव्हा त्याच्या मनात आपोआपच देशासाठी काहीतरी हिताचं काम करून दाखविण्याची भावना निर्माण होते. हे ऐकून अमिताभ अंतर्मुख झाला आणि काहीही न बोलता वर्दी घालून सेटवर हजर झाला.

 

bachchan as cop inmarathi

 

त्याने शबानाला सांगितलं की इंदर राज यांनी सांगितलेली ही गोष्ट कुठेतरी मनात खोलवर रुजली होती आणि अशोक स्तंभाचा निर्णय बदलायला लावण्याचा प्रस्ताव देण्यामागे कुठेतरी प्रेरणा बनली.

===

हे ही वाचा …म्हणून यश चोप्रा यांनी बमन इराणी ऐवजी या सिनेमात बच्चनला काम दिलं!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?