' सेलिब्रिटी मालदीवला निसर्ग सौंदर्यासाठी जात नाहीत! त्यामागे आहेत वेगळीच कारणं!

सेलिब्रिटी मालदीवला निसर्ग सौंदर्यासाठी जात नाहीत! त्यामागे आहेत वेगळीच कारणं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आज  कोरोनामुळे एकूणच देशातील परिस्थिती फारशी चांगली दिसत नाहीये. एकीकडे जगायला आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडीसार इंजेक्शन वरून होणारे राजकारण ह्यामध्ये सामान्य जनतेचे मोठया प्रमाणावर हाल होताना दिसून येते आहेत.

आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेलल्या बातम्या रोज ऐकायला मिळत आहेत. कोरोनामुळे लोक मृत्युमुखी पडत आहेतच पण आरोग्य व्यवस्थेच्या गलथान कारभारामुळे सुद्धा लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहे.

 

lockdown effect inmarathi

 

आज देशभरात पुन्हा सर्वत्र लॉकडाऊन करण्यास सुरवात केली आहे. आता कुठे लोकांचे जीवनमान रुळावर येत होते तर पुन्हा एकदा लॉकडाऊन मुळे खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण होताना दिसून येते आहे.

पर्यटन व्यवसाय हळू हळू सुरु पूर्वपदावर येत होता, त्यात लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार पुन्हा धोक्यात आले आहेत. राजस्थान, हिमाचल प्रदेश, काश्मीर केरळ सारखी राज्य जवळपास पर्यटनवरच चालतात.

 

tourism inmarathi

हे ही वाचा – “शाहरुख खान, तू सच्चा मुस्लिम नाहीस” : गणपती बसवल्याबद्दल मुस्लिमांची शाहरुखवर टीका

पर्यटनाबरोबरीने चित्रपटसृष्टी देखील वर्षभरापासून ठप्प आहे. अनेक सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज आहे मात्र एकूणच परिस्थिती बघता ओटीटी प्लँटफॉर्मचा आधार निर्माते घेत आहेत.

बॉलीवूड सेलिब्रिटी मात्र देशात एकूण गंभीर परिस्थिती असताना मदतीचा हात पुढे न करता थेट मालदीव ला जाऊन मस्त मज्जा करत आहेत. सर्व स्तरातून यावर टीका होताना दिसून येत आहे. खुद्द अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने सुद्धा खरमरीत शब्दात सेलिब्रेटींवर टीका केली आहे.

मागच्या वर्षीच्या कडक लॉकडाऊनमध्ये सर्वच जण घरात अडकलेले होते. त्यामुळे कोणालाच कुठे जाता आले नाही हळू हळू निर्बंध कमी झाल्याने लोक बाहेर फिरायला निघाले, त्यातच हे आपले सेलिब्रिटी पहिले. नेमके मालदीवलाच का जातात चला जाणून घेऊयात.

 

 

soneva-jani-maldives-inmarathi

 

शांत समुद्रकिनारे, नितळ समुद्र, सोबतीला स्पा बॉडी मसाज आणि वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी यासारख्या परफेक्ट वेकेशनच्या गोष्टी कोण सोडणार ,आणि या सर्व गोष्टी मालदीव सारख्या देशात सहज उपलब्ध असल्याने साहजिकच अनेकांचा ओढा तिकडे आहे.

मालदीवला जाणायमागचं असेहि कारण बोलले जाते की, सेलिब्रिटी लोकांना हे व्हेकेशनचे पॅकेजेस फुकटात देतात व त्याबदल्यात आमच्या इथे येऊन आमच्या हॉटेलचे, जागेचे तुम्ही फोटो पोस्ट करून एक प्रकारे ब्रॅण्डिंग करा. सेलेब्रेटींचे करोडो फॉलोवर्स सोशल मीडियावर असल्याने साहजिकच अनेक चाहते ते फोटो बघतात आणि त्यांना ही असे वाटणार की आपण पण अशा ठिकाणी भेट द्यायला पाहिजे.

 

mald inmarathi

 

जगात पर्यटन क्षेत्र ठप्प असल्याने मालदीव सरकराने मात्र पर्यटनाचे दार सर्वांसाठी खुले केले आहे. तसेच आमच्या इथे या, लस घ्या काम करा आणि व्हेकेशन एन्जॉय करा अशी पर्यटकांना आकर्षित करणारी स्कीम ठेवल्याने साहजिकच जगभरातील पर्यटकांचा ओढा मालदीवकडे वाढणार.

मुळात मालदिवसारखे देश हे पर्यटनवर अवलंबून असल्याने त्यांची रोजरोटी, स्थानिकांचा इवजगार हा सर्व त्यावर अवलंबून आहे त्यामुळे पर्यटनच  बंद केले तर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होईल, यावर उपाय म्हणून तिकडच्या सरकारने ही शक्कल लढवली आहे.

राहता राहिला प्रश्न  बॉलीवूड सेलीब्रेटींचा तर आपल्या देशात  त्याच सेलीब्रेटींना डोक्यावर घेणारे आपण आपत्कालीन परिस्थिती मध्ये मदत करा नाही म्हणून टीका करतो. त्यांनी जावे न जावे ,मदत करावी न करावी हा त्यांचा प्रश्न आहे. पण एक भारताचा जवाबदार नागरिक म्हणून आपली काही कर्तव्ये नक्कीच पार पडायला हवीत.

 

sonu sood inmarathi

हे ही वाचा – चित्रपटात वापरलेल्या ‘महागड्या’ कपड्यांचे तसेच दाग-दागिन्यांचे पुढे काय होते?

सोनू सूद सारखे काही मोजके सेलिब्रिटी गेल्या वर्षभरापासून मोठ्या प्रमाणवर मदत करत आहेत. सध्या लसीचा पुरवठा कमी अधिक प्रमाणात होत असल्याने तसेच देशातील एकूणच परिस्थिती पाहता सेलेब्रेटींना मालदीव सरकारच जास्त जवळचे  वाटत असेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?