' नवस, प्रार्थना नव्हे, लग्न नं होणारे तरुण या मंदिरात जाऊन करतात काहीतरी भलतंच!

नवस, प्रार्थना नव्हे, लग्न नं होणारे तरुण या मंदिरात जाऊन करतात काहीतरी भलतंच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण भारतीय लोक अतिशय श्रद्धाळू आणि धार्मिक आहोत. रोजच्या जीवनात पण सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करुन मगच पुढची कामं सुरू करणारे लोक आहेत. अंघोळ करून देवपूजा केल्याशिवाय पाणीही न पिणारे लोक आहेत. आपल्या विविध अडचणी निवारण करण्यासाठी नवस सायास केले जातात.

थोडक्यात काय तर आयुष्यातील कोणत्याही परिस्थितीत देव हा मोठा आधार आहे असं मानणारे भरपूर लोक आहेत.

 

people in temples inmarathi

 

लग्न ठरावं म्हणून..मग मूल व्हावं म्हणून..मुलाचं सारं नीट शिस्तीत व्हावं म्हणून लोक देवाला नवस बोलतात. तो वेळेत फेडावा लागतो. नवरा माझा नवसाचा.. अष्टविनायक या सिनेमांनी नवस वेळेत न फेडण्याचे परिणाम परिणामकारकरित्या दाखवले आहेत.

===

हे ही वाचा हिंदू धर्मद्वेष्ट्यांनी हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही या मंदिरातल्या बाप्पाला धक्का लावू शकले नाहीत!

===

आपल्या देशात असंही एक मंदिर आहे जिथं लग्न व्हावं म्हणून एक वेगळीच प्रथा पाळली जाते..

राजस्थान मधील बुंदी जिल्ह्यातील हिंडौली या गांवात एक शंकराचे मंदिर आहे. या मंदिरात शंकरासोबत पार्वतीची मूर्तीपण आहे. सहसा फक्त शंकराची पिंड असते मात्र या मंदिरात मात्र शंकराची आणि पार्वतीचीपण मूर्ती आहे.

याचं वैशिष्ट्य म्हणजे ही पार्वतीची मूर्ती लग्न व्हावं म्हणून चक्क चोरुन घरी नेली जाते. यावर पुजारी पण तक्रार करत नाही. वर्षानुवर्षे ही प्रथा हिंडौली गावात सुरू आहे.

 

hindoli temple inmarathi

 

मुलांचं लग्न योग्य वयात, योग्य वेळेत होणं ही समाजाची मानसिकता आहे. ते गरजेचे पण आहे. पूर्वी लग्न जमणं फार त्रासदायक नव्हतं. ओळखीपाळखीच्या ठिकाणी आपला मुलगा मुलगी लग्नाची आहे असं सांगितलं की स्थळं सुचवली जात. लग्नंही ठरत असत!

त्यातही कुणाचं बाशिंगबळ जड आहे, लवकर लग्न ठरत नाही, ठरता ठरता मोडलं असं काही झालं की काळजी वाटायची. मग काही दैवी उपाय सुचवले जात.

अशाच काही उपायांपैकी एक म्हणजे या हिंडौलीच्या शिवमंदिरात असलेली पार्वतीची मूर्ती पळवून नेणं. एखाद्या तरुणाचा विवाह ठरत नसेल तर तो तरुण या शिवमंदिरात असलेली पार्वतीची मूर्ती चोरुन घरी नेतो आणि दोन तीन महिन्यांत लग्न हमखास ठरतं असा तेथील लोकांचा विश्वास आहे.

लग्न ठरलं की तो तरुण ती मूर्ती जशी गुपचूप घेऊन जातो तशीच गुपचूप परत आणून ठेवतो. परत कुणीतरी लग्न न ठरणारा होतकरू तरुण ती पार्वतीची मूर्ती पळवून नेतो.

 

parvati temple inmarathi

 

बरं, हे घरी नेऊन त्या मूर्तीची पूजा करतात. आजवर ३५ वर्षात ही मूर्ती १५-२० वेळा चोरीला गेली आहे असं या मंदिराचे पुजारी रामबाबू सांगतात. म्हणजे यापूर्वी कितीतरी वेळा ही मूर्ती चोरीला गेली आणि पुन्हा परत आणली गेली आहे.

पण गेल्या वर्षी फार विचित्र अवस्था झाली होती. लाॅकडाऊन सुरू झाला. सगळी मंदिरे बंद झाली. अगदी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पण एकही विवाह संपन्न झाला नाही. आणि पार्वतीची मूर्ती ज्याने कुणी नेली होती त्याच्याकडेच राहीली. ती पण बिचारी होम क्वारंटाईन झाली. इकडं मंदिरात महादेव पण क्वारंटाईन. ते पण एकटेच पार्वतीची वाट बघत राहीले.

===

हे ही वाचा ना सोनं-नाणं, ना अन्नदान…चक्क ‘दगड’ देऊन या मंदिरात नवस फेडला जातो!

===

देवशयनी म्हणजे आषाढी एकादशीला पण कोणतेही मंदिर उघडले नव्हते. त्यामुळे पार्वतीची मूर्ती परत आणली तरी ती काही गाभाऱ्यात ठेवता येणार नव्हती. कारण आषाढी एकादशीला देव झोपतात ते चातुर्मास पूर्ण झाला की मगच उठतात अशी आपल्या हिंदू धर्मात श्रद्धा आहे.

विवाहेच्छुक तरुणांच्या रांगा लागल्या. पण लाॅकडाऊनमुळे सगळंच अवघड होऊन गेलं. आताही परिस्थिती फारशी वेगळी नाही. परत एकदा धार्मिक स्थळं बंद केली आहेत.

 

marriage inmarathi

 

कोविडनं पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. परत एकदा पार्वती कुणा विवाहेच्छुक तरुणाच्या देवघरात अडकून पडली आहे आणि हिंडौलीच्या शिवमंदिरात महादेव एकटेच तिची वाट पहात आहेत.

या कोविडनं माणसांनाच नव्हे तर देवांना देखील क्वारंटाईन होण्याची वेळ आणली आहे.

===

हे ही वाचा शिवलिंगाची पूजा माहीत आहेच – पण आसाम मधल्या मंदिरात आजही ‘योनीची’ पूजा होते!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?