' अमिरेकेचा “मदर” तर रशियाचा “फादर”…! – InMarathi

अमिरेकेचा “मदर” तर रशियाचा “फादर”…!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

अमेरिकेने अफगाणिस्तानवर नुकताच बॉम्ब हल्ला केला आणि सगळीकडे एकाच बातमी पसरली की ‘अमेरिकेने अफगाणिस्तानवर टाकलेला नॉन न्युक्लीयर GBU-43/B बॉम्ब म्हणजे आजवरचा सर्वात शक्तिशाली बॉम्ब आहे.’

 

america-attack-afghanistan-marathipizza
bnonews.com

रशियाचा जागतिक राजकारणावरचा वाढता प्रभाव, उत्तर कोरियाचे अमेरिकेला उघड आव्हान, चीनचा प्रत्येक गोष्टीमधला हस्तक्षेप यांमुळे कुठेतरी अमेरिकेची लंगडी बाजू उघड पडत चालली होती आणि आंतरराष्ट्रीय पटलावर अमेरिकेचा दबदबा कमी होत चलला होता. त्यामुळेच “आम्ही गप्प आहोत म्हणजे आम्ही सहनशील नाही” जणू हाच सल्ला आपल्या प्रतिस्पर्ध्यांना देण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानला खेळणे बनवत, त्याच्या प्रदेशावर आपल्या सर्वात शक्तिशाली बॉम्बचा प्रहार केला. आता तर ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असल्याने अमेरिकेचे सामोपचाराचे युग जवळपास संपुष्टात आले आहे. हा माणूस काहीतरी मोठा धमाका करणार हे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर अनेक तज्ञांच्या तोंडून निघालेले उद्गार आज काही अंशी खरे ठरले, येत्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांच्या अजून काही बेधडक कारवाया दिसल्यास त्यात नवल वाटण्याचे कारण नसावे.

असो, तर GBU-43/B बॉम्बचा अफगाणिस्तानवरील प्रहार म्हणजे आम्हाला अमेरिकेने दिलेली तंबी आहे असे म्हणत रशियाने हे प्रकरण स्वत:वर ओढून घेतले आहे.

 

GBU-43-B-marathipizza
deagel.com

रशियाने पुढे म्हटले की,

पण अमेरिकेच्या या बॉम्बहल्ल्याने आम्हाला जास्त काही प्रभावित केले नाही. कारण उगाच ज्याचा सर्वात शक्तिशाली बॉम्ब असा गाजावाजा होतो आहे तो मुळात सर्व शक्तिशाली नाहीच. अमेरिका उगाच वाहत्या पाण्यात हात धुवून घ्यायचा प्रयत्न करते आहे.

हे देखील वाचा: (पुतीनच्या मतानुसार: रशिया अर्ध्या तासाच्या आत अमेरिकेला संपवू शकते)

आता तुम्ही विचार करत असाल की रशिया असं का बरं म्हणतो आहे? त्याचं उत्तर असं आहे की अमेरिकेचा GBU-43/B हा बॉम्ब जो सर्वात शक्तिशाली म्हणून आजकाल सगळीकडे नाव मिळवू पाहतो आहे त्यापेक्षाही वरचढ बॉम्ब रशियाकडे आहे. जो destructive power आणि the blast radius दोन्हीमध्ये अमेरिकेच्या बॉम्बपेक्षा सरस आहे. काय ऐकून आश्चर्य वाटलं ना? आता तुम्हीही म्हणत असाल, “रशिया तर छुपा रुस्तम निघाला!!”

 

russia-bomb-marathipizza
रशियन सरकारद्वारे प्रसारित केलेला फोटो

रशियाने ११ सप्टेंबर २००७ रोजी म्हणजे तब्बल ८ वर्षांपूर्वीच घोषणा केली होती की,

आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली नॉन न्युक्लीयर बॉम्ब आहे ज्याची आम्ही यशस्वी चाचणी केली आहे.

अमेरिका आपल्या बॉम्बला “Mother of all Bombs” म्हणत असताना रशियाने “Father of all Bombs” हे विशेषण लावीत पुन्हा एकदा आपल्याकडेच जगातील सर्वात शक्तिशाली बॉम्ब असल्याची आठवण आज जगाला करून दिली.

अमेरिकेच्या GBU-43/B बॉम्बपेक्षा रशियाच्या बॉम्ब मध्ये चार पट अधिक हाहाकार उडवण्याची क्षमता आहे.
अमेरिकेच्या GBU-43/B ची blast radius क्षमता केवळ १४० मीटर असून रशियाच्या सर्वात विनाशकारी बॉम्बची blast radius क्षमता ३०० मीटरची आहे.

russia-bomb-marathipizza01
youtube.com

रशियाकडे असलेला सर्वात विध्वसंकारी बॉम्ब हा एक thermobaric bomb आहे. हा बॉम्ब एखाद्या प्रदेशावर पडला तर तेथे मोठ्या प्रमाणत उष्णता निर्माण होईल जी मनुष्य प्राण्याच्या शरीराला मानवणारी नसेल. तसेच आसपासची जमीन पूर्णपणे विरघळून जाईल. एकप्रकारे त्या प्रदेशाचा भूभाग चंद्राच्या पृष्ठभागासारखा होईल.

russia-bomb-marathipizza02
youtube.com

पण मुख्य म्हणजे रशियाकडे असलेल्या या बॉम्बमुळे पर्यावरणाला जास्त धोका नाही.

एका वाक्यात सांगायचं झालं तर रशियाकडे असा नॉन-न्युक्लीयर बॉम्ब आहे जो अणु बॉम्बच्या क्षमतेएवढी वाताहत करू शकतो.

याच कारणामुळे रशियाच्या संरक्षण काट्याने अमेरिकेच्या हल्ल्यावर उत्तर देताना म्हटले आहे की,

अमेरिकेने जरा सबुरीने घ्यावं, नाहीतर ते उगाच स्वत:ला एखाद्या संकटात ओढावून घेतील.

रशियाने अमेरिकेला दिलेला हा संदेश म्हणजे उघड उघड धमकी आहे. आपण जर रशियाचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की रशियासारखा बेभरवश्याचा देश नाही. त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे आपली देश, प्रजा आणि स्वाभिमान! जर अमेरिकेने तो डिवचण्याचा प्रयत्न केला, तर येणाऱ्या काळात रशिया-अमेरिका यांच्यात उघड उघड संघर्ष पाहायला मिळेल आणि त्यांच्या या संघर्षात उर्वरित जग देखील इच्छा नसताना ओढले जाईल हे मात्र नक्की!

हे देखील वाचा: (झार बॉम्ब: रशियाच्या सर्वात मोठ्या अणुबॉम्ब ची कथा)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?