' पश्चिम बंगालवर येऊ घातलंय कोव्हिड विषाणूचं “ट्रिपल” संकट….! – InMarathi

पश्चिम बंगालवर येऊ घातलंय कोव्हिड विषाणूचं “ट्रिपल” संकट….!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

संपूर्ण जगातच परिस्थिती जैसे थे होऊ लागली आहे. कोरोनाने त्याचं आणखी एक भयावह रूप आपल्यासमोर आणलं आहे हे आपण सतत न्यूज चॅनल्स आणि इतर माध्यमातून वाचतोच आहोत!

पहिल्या लाटेपेक्षाही कोरोनाची ही दुसरी लाट फार घातक ठरत आहे आणि गेल्या वर्षापेक्षाही या वर्षी रुग्ण आणि मृतांच्या बाबतीत आपला देश रोज नवनवे उच्चांक गाठताना दिसत आहे!

उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. महाराष्ट्र तर या बाबतीतही अग्रेसर आहे. महाराष्ट्रातसुद्धा टोटल लॉकडाउनचा निर्णय घेतला गेलेला असून लोकांवर कारवाईदेखील करण्यात येणार आहे!

 

covid lockdown inmarathi

 

महाराष्ट्रातील जनता हे नवीन निर्बंध किती पाळतीये आणि ‘ब्रेक द चेन’ म्हणत सरकारला ही कोरोनाची साखळी तोंडता येतीये का ते येणारी वेळच सांगेल!

===

हे ही वाचा ‘‘कृपया राजकारण करू नये’… : राज्यसरकारची लाचारी लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न!

===

पण बंगालमधली एक वेगळीच बातमी आता आपल्यासमोर येतीये ती म्हणजे पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा तिसरा स्ट्रेन सापडला आहे, आणि याला शास्त्रज्ञांनी ‘बंगाल स्ट्रेन’ असंही संबोधलं आहे!

बंगालमध्ये कोविड -१९ विषाणूचा वाढता प्रभाव बघता आता हे त्याचे ट्रिपल-म्युटेशन (बी .१.११८१))  होत असल्याचे आढळले आहे. शास्त्रज्ञांच्या मते हा तिसरा स्ट्रेन फार घातक आहे आणि याचे भयावह परिणाम येणाऱ्या काळात बघायला मिळतील.

 

covid new strain inmarathi

 

हे ऐकल्यानंतर सोशल मीडियावर, न्यूज चॅनल्सवर लोकांचा एकच सूर आहे तो म्हणजे बंगाल निवडणुकीचा अट्टहास कशासाठी? कुणी सरकारला जवबदार ठरवत आहेत तर कुणी जनतेला.

बंगालमध्ये कोरोनाचा वाढता कहर लक्षात येऊनसुद्धा कशाप्रकारे त्याकडे जाणूनबुजून कानाडोळा केला गेला हे आपल्याला माहीत आहेच.

निवडणुकीच्या नावाखाली भरगच्च गर्दी करून घेतलेल्या सभा मग त्या सत्तेतल्या पक्षाच्या असो किंवा विरोधी पक्षाच्या, त्यावेळेस योग्य खबरदारी का घेतली गेली नाही? असा सवाल आता उभा राहतोय.

 

west bengal election inmarathi

 

बंगालमध्ये सापडलेल्या या नव्या स्ट्रेनवर आपण लवकरात लवकर मात करून जीवितहानीचे प्रमाण कमीत कमी ठेऊ आणि आपला देश कोरोनामुक्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

===

हे ही वाचा इथून, तिथून शेवटी मिथुन भाजपमध्ये: नक्षलवादी ते नेता, वाचा एक भन्नाट राजकीय प्रवास

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?