' चूक नेहेमी पुरुषाचीच? या ९ गोष्टीत स्त्रिया कमी पडल्या तर घरी कटकटी होणारच ना!

चूक नेहेमी पुरुषाचीच? या ९ गोष्टीत स्त्रिया कमी पडल्या तर घरी कटकटी होणारच ना!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आमच्या ह्यांना काही कळतच नाही, माझा नवरा जराही रोमॅन्टिक नाही, आमच्या घरात तर आम्हा सासु सुनांच्या भांडणात माझा लेक कायमच बायकोचीच बाजु घेतो…  पार्टी असो वा भिशी, मैत्रिणी एकत्र जमल्या की हमखास हे संवाद कानांवर पडतात. स्थळ, काळ, वेळ कोणतीही असो, महिला एकत्र आल्या की गा-हाणी ठरलेली.

 

girls party inmarathi

 

प्रत्येकीची तक्रार वेगळी असली तरी ‘दोषी ठरणारा पुरुषवर्ग’ ही एक बाब समान असते. पुरुषांच्या नावाने ठणठणाट करणा-या महिलांकडे थकलेला, त्रस्त पुरुषवर्गही कानाडोळा करतो.

समाजातील फेमिनिझमचे सुर आता घराघरात ऐकू येत असल्याने स्त्रीराज्य किंवा ‘तु म्हणशील तसं’ म्हणत वाद टाळण्यासाठी अनेकदा पुरुषही न केलेल्या चुकांची जबाबदारी स्विकारतात.

घर म्हटलं की वाद होणारचं हे निश्चित असलं, तरी प्रत्येक कौटुंबिक वादात केवळ पुरुषवर्ग चुकतो, असा सरसकट आरोप करणं योग्य नाही. कारण कोणतीही व्यक्ती शंभऱ टक्के बरोबर नसते.

कुटुंबासाठी खस्ता खाणारी, संसार, नोकरी अशी तारेवरची कसरत करणारी स्त्री संसारासाठी सर्वतोपरी मेहनत करते यात शंका नाही, स्त्रिशिवाय घराला घरपण नाही हे देखील खरं आहे, मात्र स्त्रियांचे कधीच चूकत नाही, असंही म्हणता येणार नाही.

 

fighting-couple-inmarathi

 

स्त्रियांनी आपल्या स्वभावात काही मुलभुत बदल केले, काही सवयी बदलल्या तर घरातील अनेक कटकटी, लहानसहान वाद, कुरबुरी या टाळता येतील. नातं टिकवण्यासाठी, जपण्यासाठी प्रत्येकालाच स्वतःच्या सवयी बदलाव्या लागतात.

स्त्रियांनी आपल्या स्वभावातील, सवयींमधील काही गोष्टी जाणीवपुर्वक बदलल्या, टाळल्या तर निश्चितच घरातील वादांना पुर्णविराम देता येईल.

१. सतत टोचून बोलणे

“मी आहे म्हणून निभावतीय, दुसरी असती तर केंव्हाच सोडून गेली असती” हा टोमणा ऐकला नाही असा पुरुष शोधूनही सापडणार नाही. एकंदरितच खोचकपणा, टोमणे मारणं हे कौशल्य महिलांमध्ये उपजत असतं, मात्र त्या कौशल्याचा वापर नवरा, सासुसासरे, मुले यांच्यावर केला नाही तर अनेक प्रश्न मिटतील.

 

 

 

fighting inmarathi

 

ज्याप्रमाणे स्त्रिया कुटुंबासाठी राबतात, त्याचप्रमाणे घरातील कर्ता पुरुषही आपआपल्या परिने अनेक आघाड्यांवर लढत असतो, असावेळी कष्ट करून दमूनभागून आलेल्या नवऱ्याला टोचून बोललात, टोमणे मारलेत, तर त्याचा पारा चढणारंच! यामध्ये अनेकदा वादाची ठिणगी पडते तर कधी कंटाळलेला पुरुष अबोला धरतो.

२. इतरांशी तुलना

मैत्रिणीला नवी साडी मिळाली किंवा शेजारणीला तिच्या नवऱ्याने काही गिफ्ट दिलं की तुम्हीही घरात तणतण करत असाल तर हे तातडीने थांबवा.

प्रत्येकीचं सुख वेगवेगळं असतं, त्याप्रमाणे प्रत्येकीच्या घरची, आर्थिक परिस्थितीही वेगळ असते, अशात तुम्ही सातत्याने दुस-यांशी तुलना करत त्याचे बोल आपल्या नवऱ्याला ऐकवले तर त्यांना सहन होणार नाही.

 

indian couple 2 inmarathi

 

तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडून, घराकडून जे काही मिळतं त्यात समाधान माना. यापुर्वी तुम्हालाही घरातल्या इतरांनी अनेक सरप्राईजेस दिली असतील, मग इतरांशी तुलना करण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्या आनंदी प्रसंगांना आठवा.

३. गॉसिप

मी गॉसिप करत नाही असं ठामपणे सांगणारी प्रत्येक महिला गॉसिप करते, अर्थात हे गॉसिप अनेकदा केवळ वेळ घालवण्यासाठी असतंं, यामध्ये इतरांचे वाईट चिंतले जात नाही. मात्र तुमची ही सवय कधी तुमच्याच अंगाशी येईल हे सांगता येणार नाही.

 

gossip inmarathi

 

माहेरी गेल्यावर, किंवा मैैत्रिणींना भेटल्यानंतर सासरच्या मंडळींविषयी हमखास चर्चा रंगते, मात्र तुम्ही अनवधानाने केलेल्या या गॉसिपमुळे सासरच्यांची मनं दुखावली जाऊ शकतात. तुमचं हे गॉसिप नवऱ्याच्या कानावर पडलं तर त्याचा भलताच अर्थ निघू शकतो, यामुळे नात्यात दुरावाही येऊ शकतो.

त्यामुळे घराच्या चार भिंतीतील चांगल्यावाईट गोष्टी सहसा चर्चेत येणार नाहीत याची काळजी घ्या.

हे ही वाचा – स्त्री साठी या साध्या गोष्टी असतात खूप रोमँटिक! बायकोला खुश करायचंय? मग हे वाचाचं

४. जुन्या वादांचे अस्त्र

नवरा-बायकोमध्ये झालेल्या वादावर पडदा पडतो, एकमेकांची माफी मागून पुन्हा राजाराणीमध्ये गोडी निर्माण होते, मात्र कालांतराने काही महिन्यांपुर्वी झालेला हा वाद पुन्हा एकदा नव्या वादात अस्त्र म्हणून वापरलाा जातो याचा अनुभव तुम्ही कधी घेतला आहे का?

अनेक कपल्सकडून याचे उत्तर होकारार्थी येईल.

 

couple inmarathi

 

पुरुषांना विसरण्याची सवय असते हा आरोप काहीअंशी खरा आहे, मात्र प्रबळ स्मरणशक्तीच्या जोरावर बायका हे वाद सहजासहजी विसरत नाहीत. काही महिन्यांपुर्वी पेटलेल्या वादाची ठिणगी पुन्हा एकदा पेटवून त्या चर्चा उगाळल्यामुळे अनेकदा तुम्ही तुमच्या जोडीदाराला नाराज करता.

त्यामुळे झालेले वाद तिथल्या तिथे मिटवून ते पुन्हा उगाळू नका.

५. जोडीदाराचेही कौतुक 

आपल्या रुपाचं, कलेचं, कौशल्याचं घरात कौतुक व्हावं, विशेषतः आपल्या जोडीदाराने आपलं भरभरून कौतुक करावं ही महिलांची अपेक्षा असते. ती पुर्ण न झाल्यास महिला रुसव्याचे किंवा अबोल्याचं अस्त्र उगारतात, मात्र पुरुषांचीही ही अपेक्षा असु शकते याचा मात्र विचार केला जात नाही.

 

couple shopping inmarathi

 

महिलांकडून कधीतरी आपलेही कौतुक व्हावे, चारचौघात आपली पाठ थोपटली जावी ही पुरुषांची अपेक्षा फारशी पुर्ण होत नाही, परिणामी नात्यात कालांतराने दुरावा येतो.

६. अनावश्यक धाक

माझा नवरा मला घाबरतो, तो माझ्या मुठीत, धाकात आहे हे सांगताना अनेक महिलांचा ऊर अभिमानाने भरून येतो, मात्र प्रत्यक्षात ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते.

 

couples inmarathi

 

आपला जोडीदार किंवा कुटुंबातील इतर व्यक्ती यांच्यावर तुमचा अनावश्यक धाक असणं योग्य नाही. घरातील सर्वांनी एकमेकांवर प्रेम करावं, आदर करावा हे योग्य आहे. मात्र प्रत्येकाने केवळ तुमचाच आदेश पाळावा, प्रत्येकाने तुमचा सल्ला घ्यावा, सगळ्यांनी तुमच्या मताप्रमाणे वागावं ही सक्ती करणं योग्य नाही.

७.  माझं तेच खरं

मी म्हणते त्याचप्रमाणे काम व्हावं अशी महिलांची इच्छा असते. आपलं तेच खरं करणा-या महिलांची हीच सवय पुरुषवर्गासाठी त्रासदायक ठरते.

 

sorry inmarathi

 

केवळ स्वतःचे घोडे न दामटवता, समोरच्याचं ऐकून घेणंं, त्याच्या शब्दाचा मान ठेवणं, वेळप्रसंगी आपली मतं बाजूला सारून जोडीदाराची आवड जपणं या गोष्टींची सवय लावली तर घरातील अनेक वाद आपोआप मिटतील.

हे ही वाचा – असं समजून घ्या तुमच्या बायकोला! वाद टळतील, प्रेमही वाढेल

८. माझीच बाजु घ्यावी

घर म्हटलं की वाद, कुरबुरी आल्याच, त्यातही सासुसुना, जावा-जावा, नणंद भावजय यांच्यातील वाद घराघरात ऐकू येतात. अशावेळी आपल्या नव-याने कायम आपलीच बाजू घ्यावी असा हट्ट करणाऱ्या महिलांचे पती अनकदा कात्रीत सापडतात.

 

family inmarathi

 

भांडणात ज्याचा मुद्दा योग्य त्याची बाजु घेणा-या नव-यांना अनेकदा बायकोच्या रागाला सामोरं जावं लागतं. मात्र अशावेळी महिलावर्गाने थोडा संयम दाखवला, धीर धरला तर हे वादही मिटतात, आणि बाजु घेण्यावरून रंगणारे नवे वाद सुरु होण्यापुर्वीच संपतात.

९. बोलण्यावर संयम

बायका म्हणजे भांडण हे समीकरणच आहे असा टोमणा पुरुषवर्गाकडून मारला जातो. मुळातच स्पष्टवक्त्या असलेल्या महिलांना भांडणात मागे राहणं मुळीच पसंत नसतं.

 

angry alia bhatt inmarathi

 

भांडणाचा मुद्दा निघाला की हिरीरीने त्यात सहभाग घेणा-या महिलांचा अनेकदा जीभेवरील ताबा सुटतो. आपला मुद्दा मांडताना अनेकदा जुन्या कुरबुरी उगाळल्या जातात, रागाच्या भरात बोललेल्या तुमच्या शब्दाने समोरच्याची मनं दुखावणार नाही ना याची काळजी घ्या.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?