' शाहु महाराज आणि टिळकांमधील 'या' वादानंतर ब्राह्मणेतर चळवळींची ठिणगी पडली...

शाहु महाराज आणि टिळकांमधील ‘या’ वादानंतर ब्राह्मणेतर चळवळींची ठिणगी पडली…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जी कधीच जात नाही ती म्हणजे ‘जात’ हे वाक्य आपण नक्कीच ऐकलं असेल. कोणतं शिक्षण घ्यायचं? कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं? कोणाशी मैत्री करायची? हे तुम्ही निवडू शकतात. पण, तुम्ही कोणत्या जातीत जन्म घ्यायचा हे तुम्ही ठरवू शकत नाहीत.

भारतासारख्या देशाचं राजकारण हे आजही धर्म या संकल्पनेभोवती फिरतं आणि राज्यांचं राजकारण हे जाती भोवती फिरतं हे सगळेच मान्य करतील.

 

politics inmarathi

 

प्रगत महाराष्ट्रापेक्षा जातीच्या राजकारणाचं प्रमाण हे उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यात अधिक आहे असं म्हणता येईल. आपल्या महाराष्ट्रातसुद्धा काही वर्षांपासून जातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न काही राजकारणी करत आहेत हे आपल्याला सुद्धा जाणवलं असेलच.

जातीय आरक्षणाला समर्थन म्हणजे आपली ‘व्होट बँक सुरक्षित’ असं एक सत्ता सूत्र सध्या बघायला मिळत आहे.

ब्राम्हण आणि मराठा या दोन जातींमध्ये मतभेद आहेत असं एक चित्रसुद्धा मागच्या काही वर्षांपासून तयार करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मराठी माणसात असा कुठलाही वाद नाहीये. मतभेद असू शकतात, पण मनभेद अजिबात नाहीयेत.

इतिहासात एक असाच प्रसंग घडून गेला आहे जेव्हा लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज यांच्यात मतभेद झाले होते असं सांगितलं जातं. या प्रसंगानंतर महाराष्ट्रात ‘ब्राम्हणवाद’ची सुरुवात झाली असं बोललं जातं. नेमकं काय झालं होतं? जाणून घेऊयात.

===

हे ही वाचा रयतेचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ करणारा राजा!

===

shahu maharaj and tilak inmarathi

वेदोक्त प्रकरण :

‘वेदोक्त’ या शब्दाचा अर्थ ‘वेदात सांगितल्याप्रमाणे’ असा होतो. ‘वेदोक्त’ वाद हा कोणतेही धार्मिक विधी हे फक्त वैदिक पद्धतीनेच व्हावेत अशी इच्छा. सनातनी, कर्मठ ब्राम्हणांमध्ये ही इच्छा नेहमीच असायची.

शुद्र जातीतील लोकांनी वैदिक पद्धतीने आपले धार्मिक विधी करू नयेत, तो अधिकार फक्त ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य लोकांनाच आहे हा समज तेव्हा समाजावर बिंबवला गेला होता.

शाहू महाराजांच्या काळात हा वाद वाढला होता. पण, याचं मूळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होतं असं सांगितलं जातं.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास काही ब्राम्हणांनी नकार दिला होता आणि त्यामुळेच काशीच्या गागाभट्ट यांना राज्याभिषेकासाठी बोलावण्यात आलं होतं असं सांगितलं जातं.

 

rajyabhishek inmarathi

 

वेदोक्त वृत्तीला लोकमान्य टिळकांचा पाठींबा असायचा असं इतिहासाचे जाणकार सांगतात.

लोकमान्य टिळकांबद्दल असं मत होण्याचं कारण असं की, ‘केसरी’ या मुखपत्रातील ‘वेदोक्ते खुळा’ या एका लेखमालेत लोकमान्य टिळकांनी असा उल्लेख केला होता की, “वेद मंत्र म्हणून त्यातून सिद्धी मिळवण्यासाठी तुमची जात महत्वाची असते.”

हे विधान त्यांच्याबद्दल ‘जातीयवादी’ अशी प्रतिमा तयार करण्यासाठी पुरेसं होतं.

===

हे ही वाचा टिळकांवरचा देशद्रोहाचा खटला लढला होता दस्तुरखुद्द ‘कायदे आझम’ जिनांनी!

===

शाहू महाराजांसोबत नेमका वाद काय झाला होता?

शाहू महाराज हे शिव भक्त होते. त्यांच्या हातावर शंकराचा फोटो गोंदवलेला होता. दरवर्षी कार्तिक महिन्यात शाहू महाराज दररोज पंचगंगा नदीच्या स्नानाचा लाभ घ्यायचे. एके दिवशी शाहू महाराजांसोबत त्यांचे भाऊ बापूसाहेब घाडगे, मामासाहेब खानविलकर आणि रामशास्त्री भागवत हे सुद्धा होते.

 

shahu maharaj inmarathi

 

त्यावेळी नदीवर नारायण भट्ट हे सुद्धा होते. त्यांचा मंत्रोच्चार त्यावेळी सुरू होता. शाहू महाराजांनी नारायण भट्ट यांना मंत्राबद्दल विचारणा केली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की, “तुम्ही क्षुद्र आहात. तुम्हाला जर नदीवर आंघोळ करायची असेल तर तुम्हाला पुराणोक्त मंत्राचा अभिषेक करूनच तसं करता येईल. हा अभिषेक केल्यानंतर ब्राम्हण समाज तुम्हाला ‘क्षत्रिय’ म्हणून मान्यता देईल.”

नारायण भट्ट यांनी उद्धटपणे बोललेल्या या विधानानंतर ‘वेदोक्त’ वादाला सुरुवात झाली होती.

टिळकांचा या वादाशी काय संबंध होता?

शाहू महाराजांच्या दरबारात अप्पासाहेब राजोपाध्याय हे पौरोहित्य करायचे. नारायण भट्ट यांचे शिष्य असलेल्या राजोपाध्याय यांनीसुद्धा नारायण भट्ट यांची रि ओढत पुराणोक्त मंत्राचा अभिषेक वैदिक पद्धतीने नारायण भट्ट यांच्या हस्ते व्हावा असा प्रस्ताव दरबारात ठेवला होता.

शाहू महाराजांनी या प्रस्तावाला नकार दिला होता. त्यांनी हा अभिषेक नारायण भट्ट कडून न करता अप्पासाहेब राजोपाध्यय यांनीच वैदिक पद्धतीने करावा असा निर्णय जाहीर केला.

अप्पासाहेब राजोपाध्याय यांनी हा निर्णय मानण्यास नकार दिला. त्यासाठी राजोपाध्याय यांना वेतन कपातीला सामोरं जावं लागलं.

शाहू महाराजांनी तेव्हा लोकमान्य टिळक यांचं मत विचारलं होतं. तेव्हा लोकमान्य टिळकांनी राजोपाध्याय आणि इतर सनातनी ब्राम्हणांच्या बाजूने आपलं मत नोंदवलं होतं. पुरोगामी विचारांना समर्थन करत नसल्याचा आरोप तेव्हा टिळकांवर झाला होता.

 

tilak inmarathi

 

‘वेदोक्त’ वाद इथेच संपला नाही तर तो ब्रिटिशांच्या कोर्टापर्यंत पोहोचला. दोन्ही पक्षांनी इतिहासातील दाखले देत आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला. हा खटला शाहू महाराजांनी जिंकला आणि मग त्यांना ‘क्षत्रिय’ म्हणून सकळ ब्राम्हण समाजाने मान्यता दिली.

ब्रिटिश न्यायालयाच्या या निर्णयानंतर ‘ब्राम्हणवादी’ विचारांची सुरुवात झाली आणि समाजात फुट पडली असं इतिहासकार सांगतात.

शूद्रांना समाजात समान स्थान मिळवून देण्यासाठी ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना करण्यात आली होती. १८७३ मध्ये शूद्र मंडळद्वारे स्थापित करण्यात आलेल्या या समाजाचं मुख्य कार्य हे शूद्र, कमी शिकलेल्या लोकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे हे होतं.

शूद्रांना ब्राम्हणांच्या नियमातून मुक्त करून त्यांची प्रगती करावी हा सुद्धा सत्यशोधक समाजाचा उद्देश होता. राजकारणाचा कुठेही उल्लेख न होता केवळ समाजाचा विकास हे आपलं ध्येय असेल असं शाहू महाराजांनी स्थापनेच्या वेळी घोषित केलं होतं.

ब्राम्हणवाद योग्य नव्हताच. पण, त्यावरून आजपर्यंत पूर्ण ब्राह्मण समाजाला नावं ठेवण्याचंसुद्धा समर्थन होऊ शकत नाही. कारण, ज्यांनी त्रास दिला आणि ज्यांनी त्रास सोसला त्यातील कोणीतीही व्यक्ती आज हजर नाहीये.

===

हे ही वाचा १९१९ सालीच ‘मेड इन इंडिया’ संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न करणारे “लोकमान्य” नेते!!

===

castism inmarathi

 

शाळेत एकत्र शिकतांना, ऑफिसमध्ये काम करतांना, एकत्र डबे खाताना, लोकलमध्ये एकत्र प्रवास करतांना, सध्या एकमेकांना प्लाझ्माची मदत करतांना आपण सगळे फक्त भारतीय आहोत, तसेच राहू या.

इतिहासात घडलेल्या या काही गोष्टींचं केवळ वाचन करावं, त्यामुळे आपल्या मनात कोणतीही अढी निर्माण होऊ नये अशीच आमची इच्छा आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?