' ऑक्सिजन एक्सप्रेस आधी तहानलेल्या लातूरकरांसाठी ही ट्रेन धावली होती...

ऑक्सिजन एक्सप्रेस आधी तहानलेल्या लातूरकरांसाठी ही ट्रेन धावली होती…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘सध्या भारतातील परिस्थिती युद्धजन्य आहे’, अशी प्रतिक्रिया एक नेत्यांनी दिली आहे. एकीकडे देशभरात निवडणुकांचे वातावरण तर दुसरीकडे कोरोना थैमान घालत आहे. या सर्व परिस्थतीमध्ये सामान्य माणूस मात्र भरडला जात आहे. त्याच्यासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत.

कोरोना सारख्या आजारामुळे आज आपल्याकडील वैद्यकीय यंत्रणा किती सक्षम आहे ते वेळोवेळी दिसून येत आहे. त्यातच रेमडीसार इंजेक्शन वरून चालले राजकारण त्यातून उदभवणारे राज्यसरकार आणि केंद्रातले वाद हे आता जग जाहीर झालेलं आहेत.

इंजेकशनचे साठेबाजीकरण होत आहे असा आरोप असतानाच आता आपल्याकडे ऑक्सिजनचासाठा देखील संपत चालला आहे. अनेक हॉस्पिटल ऑक्सिजनच्या अभावापोटी पेशंटना ऍडमिट सुद्धा करून घेत नाहीयेत. ऑक्सिजन अभावी अनेकांनी आपल्याकडे प्राण गमावला आहे.

 

oxygen inmarathi

 

काही जणांना हॉस्पिटलमध्ये जागा शिल्लक नसल्याने घरीच ऑक्सिजन सिलेंडर लावण्यात आलेला दिसून येत आहे. याच ऑक्सिजनसाठी महाराष्ट्र सरकारची ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणम येथे रवाना झालेली दिसून येते.

देशात आणि महाराष्ट्रात काय, आपत्कालीन परिस्थती ओढवत असतेच तेव्हा मदतीसाठी भारतीय रेल्वे दाखल होतेच. काही वर्षांपूर्वी अशीच एक रेल्वे सांगलीहून लातूरला रवाना करण्यात आली होती तीच नाव होते ‘वॉटर एक्सप्रेस’.

मराठवाडा कायमच दुष्काळाच्या छायेत असलेला प्रदेश. पावसाचा नेम नाही त्यामुळे लोकांना  पाण्यासाठी अनेक कि.मी पायपीट करावी लागते. त्यातच अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने अनेकांना पुढे रोजीरोटीचा सवाल देखील निर्माण होत आहे.

 

dushkal inmarathi

हे ही वाचा – कोकण रेल्वे बांधणाऱ्या ‘हातांनी’ जगातील सर्वात उंच अशा रेल्वे मार्गावरचा पूल बांधला

२०१५ पासूनच दुष्काळ मराठवाड्यवर ओढवला होता. त्या वेळच्या महसूलमंत्री असलेले एकनाथ खडसे यांनी घोषणा केली होती की, लातूरला १५ दिवसात पाणी पुरवठा करू. तसेच तत्कालीन मुखमंत्री यांनी देखील  लोकांना या परिस्थतीमध्ये नक्कीच मदत करू, असे आश्वासन दिले होते. 

 

वॉटर एक्सप्रेस मार्ग : 

लातूर ला पाणी पाठवायचे पान ते नेमके कुठून यावर मंत्रीमंडळात बैठक झाली. पंढरपूरच्या उजनी धरणातून पाणी नेता येईल, कारण ते अंतर कमी होते (१९० किमी) पण शेवटी सरकारने सांगली मिरज वर शिक्कमोर्तब करून ३४२ किमी चा प्रवास करणारी भारतातील ही पहिली विशेष ट्रेन ठरली. 

 

water express 5 inmarathi

 

सांगली मिरज का ?

सांगली मिरज कोल्हापूर पट्ट्याला कृष्णेचे वरदान लाभले आहे. त्यामुळे कृष्णेच्या या खोऱ्यात जसे सढळ हाताने मदत करतात तसेच सढळ हातांनी पाण्याची सोय देखील केली.असल्यास वारणा पाटबंधारे प्रकल्पात ३४ दशलक्ष घनफूट इतकी पाणी साठवण्याची क्षमता असल्याने तिकदे दुष्काळाचा कधीच प्रश्न निर्माण होत नाही.

 

water express 4 inmarathi

 

रेल्वे कोणती ?

पाच लाख लिटर इतक्या मोठ्या प्रमाणवर पाण्याची वाहतूक करायची असल्यास तितक्याच दर्जाची रेल्वे हवी यासाठी रेल्वे विभागाने खास कोटा रेल्वे स्थानाकातून विशेष र्लेवे मागवली ज्यामधून एकट्या मोठ्या प्रमाणवर जाणारे पाणी शुद्ध राहू शकेल. 

 

water express inmarathi

 

या एक्सप्रेस ला एकूण १० वॅगन जोडण्यात आले होते. प्रत्येक वॅगनमध्ये ५० हजार लिटर पाणी होते. मिरज रेल्वे स्थानकात हे पाणी भरण्यात आले होते.

 

water express inmarathi 3

 

सकाळी ११च्या सुमारास निघालेली ही जलपरी रात्री १.३० सुमारास लातूरला पोहचली. ट्रेनमधून पाणी विहीरीपर्यंत पोहचवण्यासाठी पाईपलाईनची सोय करण्यात आली होती. विहिरीत जमा होणाऱ्या पाण्यातून लातूर प्रशासनाने टँकर मार्फत पाणी पुरवले.

गेल्या वर्षभरापासून रेल्वे असो किंवा आपली लाल परी असो लोकांच्या सहकार्यासाठी कायमच तत्पर राहिल्या आहेत. मागच्या वर्षी लोकडाऊन मध्ये अनेक मजुरांना रेल्वे प्रशासनाने आपापल्या गावी सुखरूप पोहचवले.

===

हे ही वाचा – कित्येक वर्षांपासून मोफत सेवा देणारा जगातील एकमेव रेल्वेमार्ग भारतात आहे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?