' दर १२ वर्षांनी मंदिरावर पडते वीज...!! भंग पावते फक्त तीच एक गोष्ट...

दर १२ वर्षांनी मंदिरावर पडते वीज…!! भंग पावते फक्त तीच एक गोष्ट…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिमाचल प्रदेश हा देवभूमी म्हणून ओळखला जाणारा भारतातील एक प्रांत आहे. हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगा, निसर्गाच्या सौंदर्याची मुक्त उधळण, खळाळत वाहणाऱ्या नद्या, बर्फाच्छादित डोंगर, मन प्रसन्न करणारी हवा, प्रदूषण कमी अशा या देवभूमीमध्ये तपश्चर्या करणारे बरेच साधू असतात.

पर्यटकांची वर्दळ असणारी शिमला, कुल्लू मनाली, लेह-लडाख अशी स्थळं आहेत. ट्रेकिंग करायला खुणावणारे पर्वत आहेत आणि देवादिकांच्या विविध कथांनी समृद्ध असणारी संस्कृती आहे ती देवभूमी हिमाचलमध्ये!!!

 

beauty of himachal pradesh inmarathi

 

मग ते जुने रीतीरिवाज सोवळं ओवळं पाळणारं मलाना गाव असेल, तो गूढ बेट असलेला तलाव असेल, हिडींबा मंदिर, किंवा साहसी खेळांच्या स्पर्धा आयोजित करणारं कुफरी गाव असेल… हिमाचलच्या प्रत्येक गोष्टी वेगळ्या आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – हिमालयातील या गावाबद्दलच्या काही गोष्टी तुम्हाला कदाचित माहित नसतील! वाचा

===

डलहौसीचं रमणीय सृष्टी सौंदर्य, धर्मशाला येथील दलाई लामा यांचा मठ, रोहतांग पासला असणारा बर्फाचा रस्ता आणि तिथे चालणारे बर्फातील खेळ हिमाचलची ती खासियत आहे. हिमाचल प्रदेश हे राज्य पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.

तिथे अजून काही वेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहेत. अनेक रहस्यं पोटात घेऊन हिमाचल वर्षानुवर्षे उभा आहे. अशा मानवाला अनेक न उलगडलेल्या रहस्यांपैकी एक रहस्यमय ठिकाण आहे ते म्हणजे कुल्लू मधील बिजली शिवमंदिर!!!

 

bijli mahadev temple inmarathi

 

मंदिराविषयी थोडंसं

कुल्लूमध्ये बियास नदी आहे. बियास म्हणजे व्यास. तर या ठिकाणी बियास आणि पार्वती नदीच्या संगमावर एक प्राचीन शिवमंदिर आहे. या शिवमंदिरावर १२ वर्षातून एकदा वीज पडते. पण गेली कित्येक वर्षे अशी वीज पडूनही या मंदिराला काहीही नुकसान झाले नाही.

म्हणूनच या शिवमंदिराला ‘बिजली शिवमंदिर’ असं म्हणतात.

कुल्लूपासून १८ किमी अंतरावर मथान या नावाची एक जागा आहे. या ठिकाणी हे शिवमंदिर आहे. स्थानिक लोक याला मख्खन शिवमंदिर असेही म्हणतात. कारण वीज पडल्यानंतर शंकराची पिंड दुभंगते आणि स्थानिक लोक त्याला लोणी लावतात. म्हणून हे मख्खन शिवमंदिर!!

दंतकथेत मांडलेला मंदिराचा इतिहास

या मंदिराच्या बाबतीत एक कथा अशी सांगितली जाते, की ज्या ठिकाणी हे शिवमंदिर आहे त्या ठिकाणी कुलांत नांवाचा एक राक्षस राहत होता. तेथे राहणाऱ्या सगळ्या लोकांना मारुन टाकायचा पण त्याने केला. त्यासाठी त्याने बियास नदीचं पाणी अडवून धरलं.

पाणी हे जीवन आहे. ते नाहीये म्हटल्यावर लोकांचं जीवन संपायला किती वेळ लागतो? लोकांना भयंकर त्रास होऊ लागला. ते पाहून शंकराला अतिशय संताप आला.

कुलांत एक मायावी राक्षस होता. त्याने अजगराचं रुप धारण केलं आणि तो हिमाचलमध्ये आला होता. मग शंकरांनी सुद्धा मायावी राक्षसाशी लढण्यासाठी मायेचाच वापर केला. कुलांताकडे जाऊन त्यांनी त्याला सांगितलं, तुझ्या शेपटाला आग लागली आहे.

कुलांत ती आग बघण्यासाठी वळला आणि महादेवांनी त्रिशूळाने कुलांताचं मुंडकं उडवलं. कुलांत जागेवरच मरण पावला. आणि त्याचं अजस्त्र शरीर दगडाचं बनलं. त्याचं रुपांतर पहाडात झालं. हा पहाड म्हणजेच कुल्लूचा पहाड.

 

bhagvan shankar and trishul inmarathi

===

हे ही वाचा – हवामान खातंही अचंबित…!! मंदिर अचूकरित्या वर्तवते पावसाचा अंदाज…

===

नंतर महादेवांनी इंद्राला सांगितलं, की दर बारा वर्षांनी या ठिकाणी वीज पाडत जा. त्या आज्ञेनुसार इंद्र दर बारा वर्षांनी या शिवमंदिरावर वीज पाडतो. परंतु आश्चर्य म्हणजे त्या वीजेच्या प्रहारामुळे फक्त मंदिरातील शिवलिंग तडकते इतर कुणालाही कसलीही हानी पोहोचत नाही.

या तडकलेल्या शिवलिंगाला स्थानिक लोक लोणी लावतात. लोणी हे शीतल असते. त्यामुळे महादेवाच्या शरीराचा दाह कमी व्हावा यासाठी हे लोण्याचं लेपन केलं जातं. हे तडकलेलं शिवलिंग काही महिन्यांनी आपोआपच जुळून येतं आणि पुन्हा पहिल्यासारखं होतं.

उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही अवस्था मानवी जीवनातील अविभाज्य भाग आहेत. यापैकी उत्पत्ती ब्रम्हदेव करतो, स्थिती म्हणजे पालनपोषण विष्णू करतो तर लय म्हणजे विनाश करायचं काम शंकराकडे असतं. परंतु हा विनाश महादेव काही सरसकट सर्वच जणांचा करतात असं नाही तर मानवी जीवन जे नष्ट करण्यासाठी वाईट मार्गाने प्रयत्न करतात त्यांचाच विनाश शिवाकडून केला जातो.

बारा वर्षांनी शिवलिंगावर वीज पडली तरी त्याचा त्रास इतर सामान्य मानवाला होऊ नये याचसाठी हे शंकराने घेतलेलं व्रत आहे. त्यानुसार जरी बारा वर्षांनी वीज पडली तरी ती फक्त शिवमंदिरात पडते. शिवलिंगाच्या ठिकऱ्या उडतात.

बाकी कुणाला मात्र कसलाही धोका पोहोचत नाही. समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल हे भयंकर विष पचवणाऱ्या महादेवासाठी विजेचा धक्का फार मोठा आहे का? पण तरीही तो सोसून महादेव लोकांचं रक्षण करतात आणि नंतर लोकही त्या शिवलिंगाला लोण्याचा लेप देतात हेच भक्ती आणि शक्तीचं रुप.

 

shiva 6 InMarathi

 

थोडक्यात हिमाचलमध्ये शंकराची अनेक रुपं पहायला मिळतात. पण या मख्खन महादेवाचे रुप दर बारा वर्षांनी तुटून पुन्हा एकसंध होणारं, भक्तांना पुनःपुन्हा शंकराच्या चरणी भक्तीनं लीन करणारं आहे यात शंका नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – हे मंदिर बंद असतानासुद्धा यातून होणारा प्रचंड घंटानाद जगाला बुचकळ्यात टाकतो…

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?