' पालघरचे साधू, हिंदूंचा थंडपणा आणि खोटा सर्वधर्मसमभाव!

पालघरचे साधू, हिंदूंचा थंडपणा आणि खोटा सर्वधर्मसमभाव!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : मल्हार पांडे

===

मागील वर्षी १६ एप्रिल २०२० या दिवशी एक बातमी आली, ज्या बातमीने संपूर्ण देश हादरून गेला. महाराष्ट्राच्या पालघर येथे दोन हिंदू साधूंची निघृण हत्या करण्यात आली. अनेकांनी या हत्येला अपघात किंवा गैरसमज सिद्ध करण्याचा प्रयत्न केला पण सगळे प्रयत्न निष्फळ ठरले.

येत्या काळात सत्य उघडकीस आले की, ज्या भागात या दोन्ही जुना आखाडा साधूंची हत्या झाली आहे; तो भाग ख्रिश्चन मिशनीरजचा एक अड्डा असू इथे हिंदू विरोधी भावना निर्माण करण्याचे काम केले जात होते.

ही बातमी कळताच ट्विटर आणि इतर समाज माध्यमांमध्ये वातावरण चांगलेच तापले आणि लगेच हॅशटॅग सुरु झाले. #justiceforpalgharsadhus , #hindulivesmatter वगैरे अश्या हॅशटॅग अंतर्गत लाखो ट्विट्स पडले.

पण नेहमी प्रमाणे डाव्या विचारसरणीचे, वामपंथी, तथाकथित उदारवादी किंवा ‘सेक्युलर’ लोकांनी या गोष्टीवर मौन धारण केले. हिंदूंनी त्यांना नेहमी प्रमाणे प्रश्न विचारले की ते आता का बोलत नाहीत आणि या बुद्धिजीवी लोकांनी त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून पुन्हा एकदा हिंदूंना हिंदूंची जागा दाखवून दिली.

Palghar Hindu Sandhu incident
पालघर येथील हिंदू साधूंच्या हत्याकांडाचे भयानक दृश्य

मी असे का म्हणालो आहे हे ते पुढे स्पष्ट करेन. कोणतीही हिंदू विरोधी घटना घडली की तात्पुरते हिंदू एकत्र येतात; सोशल मीडियावर आवाज उठवतात; पण जेव्हा रस्त्यावर उतरून निदर्शनं करायची असतात, तेव्हा मात्र कोणीही तयार होत नाही आणि मुळात हिंदू समाजाचा इतिहासाचा अभ्यासच कमी आहे.

हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांची अशी हत्यांची गोष्ट ही नवीन नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात आर्य समाजाच्या स्वामी श्रद्धानंद यांनी घरवापसी किंवा शुद्धी चळवळ सुरु केली. या चळवळीचा उद्देश म्हणजे ज्या ज्या हिंदूंचे दुसऱ्या धर्मांमध्ये सक्तीने धर्म परिवर्तन केले गेले आहे त्यांना पुन्हा एकदा हिंदू करून घेणे.

या चळवळीला मोठा पाठिंबा मिळाला आणि म्हणावे तसे यश सुद्धा मिळाले. काही दिवसांनी स्वामीजींना भेटायला म्हणून अब्दुल रशीद नावाचा युवक आला. स्वामीजींना कामानिमित्त भेटायचे आहे, म्हणून तो त्यांच्या घरात गेला आणि त्याने स्वामीजींना गोळ्या झाडून मारले.

==

हे ही वाचा –

मुस्लिम साधूंपासून हिंदू धर्माचं रक्षण करणाऱ्या ‘‘नागा साधूंचा’’ इतिहास वाचा –

कुराणातील ‘त्या’ २६ आयत : पुरोगामी प्रांतातील धर्मनिरपेक्षतेच्या भयाण मौनाचं गूढ!

==

ह्या नंतर पुन्हा आजच्या सारखीच निदर्शनं झाली, हिंदू तात्पुरते एकत्र आले; पण पुन्हा एकदा हिंदूंचा घात झाला. अब्दुल रशीदचे पुढे काय झाले याची काही कल्पना नाही. हिंदूने तात्पुरते धारण केलेले क्षात्रतेज पुन्हा एकदा गळून पडले.

Swami Shraddhanand
स्वामी श्रद्धानंद,  दिल्लीमधील टाऊन हॉल येथील स्वामींचा पुतळा

इ.स. १९२१ मध्ये केरळमधील मोप्लाहमध्ये सुद्धा असेच घडले. ५००० पेक्षा जास्त हिंदूंना तिथल्या मुसलमानांनी मारले. या प्रसंगाविषयी कोणीही बोलताना दिसत नाही. मला अपेक्षा बाकीच्यांकडून नाहीच; पण कमीत कमी हिंदूंनी तरी या गोष्टीचा विचार करावा.

कलकत्तामध्ये करवून आणलेला ‘डायरेक्ट ऍक्शन डे’ ज्यामध्ये सुद्धा अनेक हजारो हिंदूंची हत्या झाली त्या विषयी तुम्ही कोणत्याही हिंदूला विचार तो निरुत्तर असेल. असे अनेक प्रसंग आहे, जिथे केवळ द्वेषापोटी हिंदूंची हत्या करण्यात आली आहे.

अगदी आत्ताचे उदाहरण घेतले तर कमलेश तिवारी यांचे. ज्या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाच्या गोष्टीवरून हे उदारवादी लोक दिवसरात्र टाहो फोडत असतात; ते मात्र कमलेश तिवारीच्या मृत्यूबद्दल एक चकार शब्द बोलले नाहीत; कारण इथे हत्या करणारा मुसलमान होता आणि ज्याची हत्या झाली तो हिंदू!

या सगळ्यात चूक कोणाची असेल तर ती केवळ आणि केवळ हिंदूंची आहे, कोणत्याही सरकारची नाही. कारण हिंदूंनीच सगळ्या सरकारांना ‘गृहीत’ धरण्याची मुभा दिली आहे. पालघर साधूंच्या हत्येने खरंतर सगळे हिंदू जागे झाले पाहिजे होते.

1921 moplah rebellion

आजही तो पोलिसांकडे आशेने पाहणारा चेहरा मला आठवतो, ते व्याकुळ साधूंचे डोळे पोलिसांकडे मदतीची अपेक्षा करत होते; पण त्या लोंढ्यासमोर पोलीस काहीही करू शकले नाहीत, आणि हेच आपल्या शासनाचे अपयश आहे. याहून मोठी शोकांतिका काय असू शकते की, हिंदू बहुसंख्य देशात, हिंदूच सुरक्षित नाहीत?

जर इतिहासामध्ये डोकावून पहिले तर लक्षात येईल की जगात सर्वांत निरंतर चालू असलेला, शिस्तबद्ध नरसंहार जर कोणाचा असेल तर तो हिंदूंचा आहे. इस्लामिक आक्रमणकारी येण्या आधीपासून हिंदूंची हत्या सुरु आहे, जी आजही सुरूच आहे आणि जो पर्यंत हिंदू एक समाज म्हणून जागे होणार नाहीत तो पर्यंत पालघर सारख्या घटना घडत राहतील.

या १६ एप्रिलला पालघर साधू हत्याकांडाला होऊन एक वर्ष झालं. त्या साधूंच्या आत्म्याला न्याय मिळाला नाही किंवा ज्यांनी ही हत्या केली त्यांना कठोर शिक्षा मिळाली नाही. हेच जर एखाद्या इतर धर्मातल्या धर्मगुरूंबद्दल घडले असते; तर कदाचित विपरीत घडले असते.

देशातल्या तमाम विचारकांनी, बुद्धिजीवींनी त्यांचे पुरस्कार दिले असते, फलक घेऊन फोटो काढले असते, लांब लचक पोस्ट लिहिल्या असत्या किंवा निदर्शनं केली असती, पण दुर्दैव आणि सत्य हे आहे की हिंदूंच्या विषयी एखादी गोष्ट घडली की त्याबद्दल बोलायला कोणीही येत नाही.

Palghar Hindu Sandhu incident

ना हिंदू येतात, ना इतर. मी साधूंच्या हत्येला कोणत्याही सरकार ला जबाबदार ठरवत नाही, मी हिंदू समाजातला एक घटक म्हणून हिंदूंनाच दोष देतो. त्या दोन्ही व्यक्तींचे आणि या आधी घडलेल्या लाखो हिंदूंच्या हत्या या तुमच्या षंढपणामुळे घडल्या आहेत. सोशल मीडियावर हॅशटॅग चालवून जर एखाद्याला न्याय मिळाला असता, स्वतःची बाजू बुलंद करता आली असती तर गोष्ट काही औरच असती.

असो, पालघर हत्याकांड होऊन एक वर्ष झालं आणि माझी अपेक्षा आहे की देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक वर्गाने जो सर्वधर्म समभाव याची परिभाषा जाणतो त्याने त्यांना न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला पाहिजे. तुम्ही तसे करत नसाल तर संविधानातील पानांना तुमच्या लेखी काहीही अर्थ नाही! आणि हो हिंदूंनो, आता तरी जागे व्हा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?