' बडोद्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी IPS ने केलेला साधा उपाय देशाला कोव्हिडपासून वाचवतोय – InMarathi

बडोद्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी IPS ने केलेला साधा उपाय देशाला कोव्हिडपासून वाचवतोय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“सेक्शन १४४ म्हणजे काय रे भाऊ? सध्या इतक्या बातम्या फॉरवर्ड होऊन राहिल्यात की काहीच कळेनासं झालंय बघ. त्यात लाईव्ह भाषण ऐकलं की तर, डोक्याचा पार भुगा होतोय. काय चालू , काय बंद? ही संचारबंदी तर नाहीये ना? संचारबंदी कधी, जमावबंदी कधी काहीच समजं ना झालंय…”

“हो ना राव. मला पण काहीच कळत नाहीये.”

दोन मित्रांच्या फोनवरील प्रश्न सध्या सर्वांनाच पडले आहेत. दाराच्या बाहेर पडण्या आधी प्रत्येक जण सध्या दबकतच बाहेर पडत आहे, तर काही जण सेक्शन १४४ म्हणजे काय? यावर चर्चा करण्यासाठी गर्दी करत आहेत.

===

हे ही वाचा लॉकडाऊन, कर्फ्यू , कलम १४४ यामधला फरक प्रत्येकाने नक्कीच समजून घ्यायला हवा

===

corona inmarathi

 

काय आहे सेक्शन १४४? त्याची कोणी सुरुवात केली? 

बडोदा या गुजरात राज्यातील शहरापासून धारा १४४ ची सुरुवात १८६१ मध्ये झाली होती. ई.एफ.डेबू हे सेक्शन १४४ चे शिल्पकार मानले जातात. वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसवणे हे सेक्शन १४४ ला अस्तित्वात आणण्याचा मूळ उद्देश होता.

सेक्शन १४४ ची नियमावली आणि अंमलबजावणी करण्यासाठी बदोड्याच्या तत्कालीन महाराजा ‘गायकवाड’ यांनी ई.एफ.डेबू यांना सुवर्ण पदक आणि ‘राज रत्न’ ही पदवी देऊन डेबू यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

 

section 144 inmarathi

 

ब्रिटिश राजवटीत क्रांतिकारी उठाव मोडून काढण्यासाठी सुद्धा सेक्शन १४४ ची अंमलबजावणी करण्यात आली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात सेक्शन १४४ हा कित्येक वेळेस देशातील वेगवेगळ्या भागात लागू करण्यात आला होता.

महात्मा गांधी यांनी सेक्शन १४४ रद्द करण्यासाठी सत्याग्रह सुद्धा केला होता. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

स्वातंत्र्योत्तर काळात सेक्शन १४४ चा वापर अधिक प्रमाणात सर्रासपणे केला जाऊ लागला. काँग्रेस सरकारने ‘गर्दी होईल’ असं कोणतंही प्रक्षोभक कृत्य, जसं की मोर्चा, सभा रोखण्यासाठी सेक्शन १४४ चा खूप वेळेस वापर केला होता.

कोणत्याही परिस्थितीत एका वेळी ५ पेक्षा जास्त लोक एकत्र दिसू नयेत, हत्यार बाळगू नयेत असे सेक्शन १४४ चे नियम आहेत.

आज एखादी चुकीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गर्दी करण्याची गरज नाहीये. केवळ एक ‘फॉरवर्डेड’ मेसेजच यासाठी पुरेसा आहे.

आपल्या सर्वांच्या हातातील मोबाईल हाच सध्या एखाद्या हत्यार असल्यासारखा आहे. इंटरनेट हे माध्यम चांगली, वाईट माहिती पसरवण्यासाठी सध्या इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा सुपरफास्ट आहे. जनता गोंधळलेल्या परिस्थितीत ‘इंटरनेट वर अंकुश लावणं’ हे सुद्धा सरकारचं वाढलेलं काम आहे.

५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू काश्मीर मधून ३७० कलम हद्दपार केल्यानंतर अफवा पसरवणं थांबवण्यासाठी सेक्शन १४४ चा अनिश्चित काळासाठी वापर करण्यात आला होता.

===

हे ही वाचा जम्मू-काश्मीर मधील घडामोडींनी गोंधळात पडला आहात? समजून घ्या संपूर्ण प्रकरण!

===

sec 144 in kashmir inmarathi

 

सेक्शन १४४ हे एकेकाळी फक्त प्रशासनाच्या फायद्यासाठी मानलं जायचं. आज कोरोना विरुद्ध लढतांना, त्याच्यावर अंकुश मिळवण्यासाठी सेक्शन १४४ लागू करण्यात येत आहे. हे सेक्शन लागू करण्यामागे तेव्हा उद्देश वेगळा होता. आज उद्देश वेगळा आहे.

भारताच्या राजकारणात सकारात्मक कारणासाठी सेक्शन १४४ चा वापर होण्याची सध्याची पहिलीच वेळ आहे.

संचारबंदी आणि सेक्शन १४४ मध्ये काय फरक आहे?

संचारबंदी म्हणजेच कर्फ्यु हा फक्त ठराविक वेळासाठी लावला जाऊ शकतो. या काळात दुकानं बंद ठेवणं, अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर न फिरणे हे अपेक्षित असतं. कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला या काळात तुम्हाला तुमचं फिरण्याचं कारण विचारण्याचा अधिकार असतो.

सेक्शन १४४ हा संचारबंदी पेक्षा ‘जमावबंदी’ च्या जवळ जाणारा आहे. २०१२ मध्ये सुप्रीम कोर्टाने दिल्ली पोलिसांना सेक्शन १४४ चा गैरवापर करण्यावरून फटकारलं होतं.

रामलीला मैदानावर सुरू असलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलन रोखण्यासाठी कोणताही गोंधळ होण्याआधी सेक्शन १४४ चा गैरवापर केला होता.

आपल्या निकालात सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं की, “कोणतीही परिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन सेक्शन १४४ ची अंमलबजावणी केली जाऊ नये. लोकांना एकत्र न येऊ देण्यासाठी काही ठोस कारण असणं अत्यंत आवश्यक आहे. “

 

ramlila maidan inmarathi

 

‘कोरोना चा प्रादुर्भाव न वाढू देणं’ हे आज सरकारकडे सेक्शन १४४ लावण्यासाठी ठोस कारण आहे.

सेक्शन १४४ लावण्याचा काळ हा २ महिने इतका असू शकतो. सेक्शन १४४ चा काळ हा २ महिन्यावरून ६ महिन्यांपर्यंत वाढवण्याचा अधिकार राज्य सरकार कडे असतो. राज्य सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेण्याचा अधिकार हा राज्यपालांकडे राखीव असतो.

सेक्शन १४४ चा सध्या होणारा वापर हा जर कोरोना थांबवण्यास उपयुक्त होणार असेल तर यावेळी पूर्ण जनता सरकारच्या पाठिशी उभी रहायला तयार आहे. सामान्य माणसाला सेक्शनच्या नंबर पेक्षा कोरोनाचे वाढते आकडे हे जास्त त्रासदायक वाटत आहेत.

“कसंही करा आणि हाताबाहेर चाललेली कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणा” हेच सध्या त्रस्त नागरिकांच्या मनात आहे.

 

uddhav thackrey inmarathi 2

===

हे ही वाचा भारत अजूनही ब्रिटिशांच्या मनाप्रमाणेच चालतोय का? ह्या गोष्टींवरून तसंच वाटतं!

===

१४ एप्रिल पासून ते १ मे या काळासाठी महाराष्ट्रात लागू झालेल्या सेक्शन १४४ चा अर्थ रात्री ८ वाजल्या पासून सकाळी ७ पर्यंत घराबाहेर न पडून सरकार, पोलीस आणि आरोग्य खात्याला कोरोना रोखण्याच्या कामात मदत करूयात आणि कोरोनाला लवकरच हद्दपार करूयात!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?