' वाघ बकरी चहा: वर्णद्वेषाने वैतागून भारतात आलेल्या गांधीजींच्या शिष्याचं अपत्य! – InMarathi

वाघ बकरी चहा: वर्णद्वेषाने वैतागून भारतात आलेल्या गांधीजींच्या शिष्याचं अपत्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महात्मा गांधीजींनी वर्णद्वेषाविरूध्द दिलेला लढा इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या एका शिष्यालाही या वर्णद्वेषाचा सामना करावा लागला होता. मात्र भारतात परतल्यावर त्यानं एक असा व्यवसाय सुरू केला की ज्याची दखल मॅनेजमेंट अभ्यासक्रमालाही घ्यावी लागली.

आज हा ब्रॅण्ड अव्वल स्थानावर असून बिझनेस स्कूलमधे तो अभ्यासला जातो. या ब्रॅण्डचं नाव आहे, बाघ बकरी चाय…

 

wagh bakri chai inmarathi

 

भारतातील अग्रगण्य असा चहाचा ब्रॅण्ड बाघ बकरी. या ब्रॅण्डचे संस्थापक हे गांधीजींचे अनुयायी होते आणि त्यांनाही गांधीजींप्रमाणेच वर्णद्वेषाचा सामना करावा लागला होता. या संस्थापकांचं नाव आहे, नरनदास देसाई.

१८९२ मध्ये ते दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे गेले. त्याठिकाणी त्यांनी चहाच्या लागवडीबाबत रितसर शिक्षण घेतलं. यातल्या सर्व खाचाखोचा शिकल्यानंतर त्यांनी ५०० एकरात पसरलेला चहाचा मळा विकत घेतला. आता सर्वकाही ठरवल्यानुसार होणार असं वाटत असतानाच तिथल्या वर्णद्वेषाला त्यांना तोंड द्यावं लागलं.

===

हे ही वाचामुहम्मद अली जिनांना तोंडावर थेट नकार – भारतात विप्रो जन्मण्याची मुहूर्तमेढ!

===

हा त्रास इतका पराकोटीला पोहोचला की त्यांना तिथला व्यवसाय गुंडाळून भारतात परतावं लागलं. इतके महिने शिक्षण आणि व्यवसायासाठी घेतलेली मेहनत वाया जाणार अशी चित्रं दिसत होती.

साबरमतीकाठी ते एकटेच गहन विचारात बसत असत. त्यांच्याकडे दक्षिण आफ्रिकेतील सर्वात प्रामाणिक आणि अनुभवी चहामळा मालक अशा गांधीजींच्या प्रमाणपत्राव्यतिरिक्त काहीच उरलं नव्हतं.

 

sabarmati riverfront inmarathi

 

महात्मा गांधींची मदत

पुढे काय? हा अंधारच असतानाच गांधीजींच्या विचारांनी त्यांना यातूनही बाहेर काढलं. डरबन येथील वास्तव्यादरम्यानच ते गांधीजींच्या सहवासात आले होते आणि देसाई गांधीजींच्या विचारांनी प्रभावितही झाले होते. त्यांच्या व्यवसाय आणि व्यक्तिगत जीवनावर या विचारांचा परिणाम खोलवर झाला.

भारतात परतल्यावर गांधीजींनी त्यांना पुन्हा उभं रहाण्याचं बळ तर दिलंच शिवाय त्यांच्या व्यवसायात काही काळ लक्षही घातलं.

एका दिशादर्शकासारखी भूमिका त्यांनी निभावली. उद्देश्य एकच, एत्तद्देशिय व्यावसायिकांनी वर्णद्वेषाला बळी पडून खचू नये उलट स्वदेशी चळवळीत याची भर पडावी. यातूनच गुजरात टी डेपोची स्थापना झाली.

 

gandhiji inmarathi

 

चहाच्या ब्रॅण्डसाठी नाव आणि लोगोचा विचार करतानाही वर्णद्वेष, वंश भेद यांचा विचार केला गेला. या लोगोमधील वाघ हा उच्च वर्णियांचा प्रतिनिधी आहे तर बकरी ही समाजातील उपेक्षितांचा. या दोघांसाठीही एकच पेय निर्माण करुन एकप्रकारची समानतेची भावना चहाच्या माध्यमातून समाजात रुजविण्याचा हा प्रयत्न होता.

हा प्रयत्न बर्‍याच अंशी सफलही झाला म्हणावं लागेल. आज घराघरात पोहोचलेला हा चहा समाजातील उच्च-नीच हा भेद मिटवणारा आहे.

===

हे ही वाचा – एका स्पर्धेतून जन्म झालेल्या, गांधीजींच्या प्रिय ‘सत्याग्रह’मागचा अज्ञात इतिहास!

===

वाघ बकरी ठरलाय पिढीजात व्यवसाय

नरनदास यांचे तीनही सुपूत्र, रामदास देसाई, ओछावलाल देसाई आणि कांतीलाल देसाई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत याच व्यवसायात उतरले आणि वडिलांची विचारसरणीही पुढे घेऊन गेले.

१९८० पर्यंट गुजरात टी डेपो सात आऊटलेटच्या माध्यमातून चहाची घाऊक आणि किरकोळ विक्री करत होता. पाकिटबंद चहाची विक्री करणारा हा पहिलाच चहा डेपो होता.

१९८० साली कंपनीनं कोलकत्यात ऑफिस थाटलं आणि लिलावात चहाची खरेदी चालू केली. आजच्या घडीला १५०० कोटींहून अधिक उलाढाल असणारा आणि जगभर ४ कोटी किलोग्रॅमहून अधिक विक्री होणारा असा हा ब्रॅण्ड आहे.

आज हा व्यवसाय देसाई कुटुंबाची तिसरी पिढी सक्षमपणे पेलते आहे आणि नव्या पिढी सोबतच नवीन व्यवसाय विचारांचं वारंही आलं आहे.

 

desai family wagh bakri group inmarathi

 

चहाची विक्री करून हा ब्रॅण्ड थांबला नाही तर व्यवसायाची नवी क्षितीजं सुद्धा या ब्रॅण्डनं विस्तारली आणि अनेक चहा कंपन्यांना अभिनव असा व्यवसाय उपलब्ध करून दिला.

कॉफीची मक्तेदारी असणार्‍या कॅफे क्षेत्रात वाघबकरीनं पाऊल टाकत टी लाऊंजची साखळी निर्माण केली. अहमदाबाद, मुंबई, दिल्ली, पुणे आणि गोव्यात वाघ बकरी टी लाउंजचा यशस्वी प्रकल्प राबविला गेला.

चहाप्रेमींची आवडती जागा या टी लाऊंजनं बनविली आहे. यांच्या मेन्यूत ४५ हून अधिक प्रकारचे चहा उपलब्ध आहेत. चहासोबत स्नॅक्सही उपलब्ध करून एक परफेक्ट टी लाउंज निर्माण केला गेला.

कॅफेमधे कॉफीसोबत कुकीज देण्याचा प्रघात आहे वाघ बकरी टी लाऊंजमधे मसाला चाय सोबत खाकरा दिला जातो.

हे टी लाऊंज बनविण्यामागचा उद्देश एकच की चहाप्रेमींना चहाच्या घोटांसोबत मनसोक्त गप्पा मारता याव्यात. आज अनेक बिझनेस मिटींगसाठी वाघ बकरी टी लाऊंजची निवड केली जाते, याचं कारण इथली उत्तम सेवा आणि फक्कड चहा…!!

===

हे ही वाचा – मिडलक्लास वर्गाला परवडणारी कार बनवण्यात संजय गांधी यांचा सिंहाचा वाटा होता!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?