' भारतीय रुपयाच्या चिन्हाविषयी या ५ रंजक गोष्टी तुम्हाला ठाऊक नसतील

भारतीय रुपयाच्या चिन्हाविषयी या ५ रंजक गोष्टी तुम्हाला ठाऊक नसतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतासह आशिया खंडातील इतर देश म्हणजेच श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ एकाच प्रकारच्या चलनाचा उपयोग करतात.

भलेही हे चलन दिसायला वेगवेगळे असले तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर आशिया खंडातील ह्या देशांच्या चलनाला रुपया म्हणूनच ओळखले जाते.

 

rupee-curency-countries-marathipizza
pinterest.com

इतर देशातील चलनाला म्हणजेच अमेरिका, रशिया, इंग्लंड, युरोपातील इतर देश ह्यांच्या चलनाला स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. एक वेगळे चिन्ह आहे.

जसे $ £ ¥ € ही चिन्ह पाहिल्यावर आपल्याला कोणते चलन आहे हे लगेच कळते. तसे आधी रुपयाविषयी नव्हते.

रुपया आपली अशी वेगळी ओळख नव्हती किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाला चिन्ह नव्हते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

म्हणूनच रुपयाला एक वेगळी ओळख देणे हे एक मोठे आव्हान भारतीय सरकारपुढे होते. हे आव्हान स्विकारण्यासाठी भारत सरकारने डिझायनर्सची मदत घेतली.

ह्याचाच परिणाम म्हणून ३००० चिन्हांपैकी उदय कुमार धर्मलिंगम ह्यांचे रुपयाचे डिझाईन निवडले गेले.

 

uday-kumar-dharmlingam-marathipizza
viralcocktail.com

परंतु इतक्या सहजासहजी हे डिझाईन निवडले गेले नाही. त्यामागे अनेक अशी कारणे होती ज्यामुळे हे डिझाईन सर्वात खास आणि वेगळे ठरले आणि त्याची निवड झाली.

आज आपण ह्या रुपयाच्या चिन्हाविषयी काही माहिती सांगणार आहोत जी बऱ्याच लोकांना माहित नाही.

  • रुपयाचे हे चिन्ह देवानागरी ‘र’ आणि रोमन लिपी ‘R’ चे मिश्रण आहे.
rupee-symbol-marathipizza01
slideshare.net

ह्या चिन्हाची विशेष ओळख अशी आहे की हे चिन्ह हिंदी मध्ये लिहिले जाणारे ‘रुपये’ व इंग्रजी मध्ये लिहिले जाणारे ‘Rupees’ हे दोन्ही दर्शवते.

 

  • देवनागरी लिपी मध्ये अक्षरांवर दिली जाणारी शिरोरेख

 

rupee-symbol-marathipizza02
igyan.org

देवनागरी लिपीमध्ये म्हणजेच हिंदी व मराठीमध्ये आपण कुठलेही अक्षर किंवा कुठलाही शब्द लिहिला तर त्यावर एक आडवी रेष देतो. त्या रेषेशिवाय शब्द पूर्ण होत नाही. देवनागरी लिपीची हीच ओळख आहे.

रुपयाच्या ह्या चिन्हामध्ये हीच शिरोरेखा जिला काही लोक क्षैतिज रेखा सुद्धा म्हणतात तिची झलक बघायला मिळते.

 

  • तिरंगा
rupee-symbol-marathipizza03
buzzativ.com

भारतीय रुपयाच्या ह्या चिन्हामध्ये दोन्ही क्षितीज रेखा समान अंतरावर आहेत. ह्या दोन्ही रेखा भारताच्या तिरंग्याची आठवण करून देतात.

 

  • समानता
rupee-symbol-marathipizza04
crazbo.blogspot.com

रुपयाचे हे चिन्ह भारताच्या अर्थव्यवस्थेची दशा आणि दिशा सूचित करते. ह्या चिन्हामधील क्षितीज रेखाच्याद्वारे असा संदेश जातो की भारताची अर्थव्यवस्था समानतेचा आग्रह धरते. हे चिन्ह असेही दर्शवते की भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरुपाची आहे.

 

  • इतर चलनाच्या डिझाईनशी मिळतेजुळते

 

rupee-symbol-marathipizza05
viralcocktail.com

भारतीय रुपयाचे डिझाईन हे इतर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या पौंड, युरो, येन, डॉलर ह्यांच्या चिन्हांशी मिळतेजुळते असले तरीही वेगळे आहे.

तर अशी आहे रुपयाच्या चिन्हाच्या सिलेक्शन मागची कारणे!

हे देखील वाचा: (भारतीय “रूपया”चा स्वातंत्र्या पूर्वीचा इतिहास)

खास टीप – जर तुम्हाला तुमच्या कीबोर्डने रुपयाचे हे चिन्ह टाईप करायचे असेल तर एकतर तुम्ही Rupee Foradian हा font install करू शकता किंवा 20B9 हे टाइप करून मग Alt+X टाइप करा किंवा ctrl+shift+$ ह्या कीज प्रेस कराव्या लागतील.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?