' या देशांमध्ये नागरिकांना घर बांधण्यासाठी फुकट जमीन दिली जाते!

या देशांमध्ये नागरिकांना घर बांधण्यासाठी फुकट जमीन दिली जाते!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

दो दीवाने शहर में …
रात में या दोपहर में…
आबोदाना… ढूंढते है एक आशियाना…ढूंढते है…

ह्या गाण्याप्रमाणे सर्वांनाच आपल्या हक्काचे छोटे का होईना एक घर असावे असे वाटते आणि प्रत्येक जण आपापल्या बजेट प्रमाणे घर घेण्याचे स्वप्न पाहत असतो. पण आजकाल महागाई इतकी वाढली आहे की घर घ्यायचे म्हणजे सामान्य माणसाचे कंबरडे मोडते. स्वतःचे बैठे घर तर लांबच राहिले पण मोठ्या शहरांत छोटासा वन रूम किचनचा ब्लॉक घ्यायचा म्हटला तरी परवडत नाही.

 

mumbai-house-marathipizza
qz.com

घरांच्या किमती आकाशाला भिडल्यामुळे सामान्य माणसाचे स्वतःचे घर घ्यायचे स्वप्न पूर्ण होणे अशक्यप्राय झाले आहे आणि जरी हिंमत करून घर घेतलेच तरी त्याचे हप्ते फेडता फेडता सगळे आयुष्य निघून जाते. अशा वेळी वाटते काहीतरी चमत्कार व्हावा आणि घरांच्या किमती कमी होऊन आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे. एकीकडे आपल्या देशात अशी गंभीर परीस्थिती आहे तर दुसरीकडे काही देशात सरकार लोकांना घर बांधायला जमीन फुकट देते आहे. विश्वास नाही ना बसत? चला आम्ही तुम्हाला ह्या देशांची नावंच सांगतो म्हणजे तुम्हाला चौकशी करायला बरं! 😉

Marne, Iowa

 

Marne-Iowa-marathipizza
offgrid-life.blogspot.in

ह्या देशात सध्या फक्त १४९ घरे आहेत. आणि ह्या ठिकाणी लोकांनी येऊन राहावे म्हणून येथील सरकार खूप प्रयत्न करीत आहे. त्यातील एक प्रयत्न आहे लोकांना राहायला आणि घर बांधायला जमीन फुकट देणे म्हणजे येथील लोकसंख्या वाढेल! ‘To Deal The Seal’ ह्या योजने अंतर्गत Marne Housing & Development Corporation लोकांना १२०० स्क्वेअर फुट जमीन फुकट देत आहे. अट फक्त एकच ! तुम्ही त्या जमिनीवर घर बांधून तिथे राहायचे. (१२०० स्क्वेअर फुट म्हणजे गंमत आहे का भौ! मुंबईचे बिल्डरलोक तर १२०० स्क्वेअर फुट मध्ये एक काय ३-४ घरं बांधून देतील.)

Marquette, Kansas

 

Marquette-Kansas-marathipizza
observers.france24.com

स्वत:चं घर घेण्याचं ज्याचं स्वप्न आहे त्या सर्व लोकांसाठी Marquette म्हणजे स्वर्गच आहे. इथे आधीच राहणारे लोक स्वत:हून इथे घर बांधून राहू इच्छिणाऱ्यांना आमंत्रण देतात. मग फ्री मिळणाऱ्या जमिनीच्या हव्यासापोटी लोक इथे येतात. आणि जमीन घेतल्यावर लगेच घर बांधणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरते.

Lincoln, Kansas

 

Lincoln-Kansas-marathipizza
indiabbc.com

ह्या देशाची लोकसंख्या केवळ ३२४१ आहे. ह्या देशातील लोक तिथे जाणाऱ्यांचे अतिशय प्रेमाने स्वागत करतात. हे लोक स्वत:च्या संस्कृती आणि परंपरेविषयी अतिशय सजग आहेत आणि ती संस्कृती टिकून राहावी, नामशेष होऊ नये म्हणून येथील सरकार तिथे राहू इच्छिणाऱ्या लोकांना घर बांधण्यासाठी फ्री जमीन व अनेक मुलभूत सुविधा देते.

Muskegon, Michigan

 

Muskegon-Michigan-marathipizza
trueactivist.com

एकीकडे इतर देश वाढत्या लोकसंख्येला आळा कसा घालता येईल ह्या चिंतेत असताना ह्या देशात मात्र परिस्थिती उलट आहे. इथले लोक आपल्या देशाची लोकसंख्या वाढावी म्हणून प्रयत्नशील आहेत आणि त्यासाठी ते बाहेरील देशातल्या लोकांना तिथे येऊन राहण्याचे सस्नेह निमंत्रण देत आहेत. तिथले लोक बाहेरच्या देशातील लोकांनी तिथे येऊन घर बांधून राहावे म्हणून प्रयत्न करीत आहेत. तसेच तिथे राहून लोकांनी व्यवसाय व उद्योग वाढवावेत ह्यासाठी सुद्धा तेथील सरकार लोकांना जमीन वाटप करीत आहे.

New Richland, Minnesota

 

New Richland-Minnesota-marathipizza
realtor.com

प्रत्येकाला वाटतं की आपलं एक सुंदर घर असावं ज्याच्या खिडकीतून आपल्याला सकाळी सकाळी गरमागरम कॉफी पिताना सुंदर सूर्योदय बघता यावा व संध्याकाळी निवांत बसून घरच्यांबरोबर सूर्यास्ताचे दर्शन घेता यावे. पण आजच्या काळात हा अनुभव रोज घेता येणे म्हणजे स्वप्नच राहतं. पण तुम्हाला रोज असा अनुभव घ्यायचा असेल तर New Richland तुमच्यासाठी अगदी स्वप्नवत जागा आहे. ह्या ठिकाणी जमीन मिळणे अगदी सोपे आहे. इथेही अट मात्र एकच आहे की एका वर्षाच्या आत त्या जमिनीवर तुम्हाला घर बांधावे लागेल.

Beatrice, Nebraska

 

beatrice-nebraska-marathipizza
journalstar.com

घरमालकाची किंवा शेजारच्यांची अनलिमिटेड कटकट ऐकून कधी कधी असे वाटते कि “काश ऐसी कोई जगह होती जहां कभी कोई टेन्शन नही होता!” तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण पृथ्वीवर एक अशी जागा नक्कीच आहे जिथे ना तुम्हाला कामाचे टेन्शन असेल ना जागेचे! आहे ना अनबिलीव्हेबल? Beatrice मध्ये तुम्हाला एका अटीवर जमीन मिळते की ५ वर्षांपर्यंत तुम्हाला त्या जमिनीची देखभाल करावी लागेल. शिवाय ह्या जमिनीपासून काहीतरी उत्पन्न मिळवावे लागेल. ह्या उत्पन्नाचा उपयोग तिथले सरकार शहराचा खर्च चालवण्यासाठी वापर करेल.

Camden, Maine

 

Camden-Maine-marathipizza
me.usharbors.com

तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी जागा मिळत नसेल तर Camden ला जा. कारण तिथले सरकार तुम्हाला हवी तेवढी जागा उपलब्ध करून देईल. तुम्ही तिथे तुमचा व्यवसाय किंवा इंडस्ट्री सुरु करू शकाल. मात्र त्यासाठी एका अटीचे पालन तुम्हाला करावे लागेल.

तिथल्या कमीत कमी २५ लोकांना तुम्हाला तुमच्या व्यवसायाद्वारे रोजगार द्यावा लागेल.

Alaska, USA

 

Alaska-USA-marathipizza
dreamdictionary.online

अमेरिकेसारख्या देशात जमीन फुकट मिळणे केवळ कठीणच नाही तर अशक्य आहे असे आपल्याला वाटते. पण हा आपला गैरसमज आहे. अलास्काचे Department of Natural Resources त्या भागात लोकांनी राहावे म्हणून प्रयत्न करीत आहे आणि ह्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्या भागात लोकांना राहायला जमीन फ्री मध्ये उपलब्ध करून देण्यात येते.

चला तर मग आम्ही तुम्हाला इतके ऑप्शन्स दिलेत. तुम्ही कुठे कुठे जाणार प्रशस्त आणि सुंदर घर बांधायला?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

One thought on “या देशांमध्ये नागरिकांना घर बांधण्यासाठी फुकट जमीन दिली जाते!

  • July 23, 2017 at 2:02 pm
    Permalink

    These are not countries. These are states in USA.
    Its not easy to settle there

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?