' अंबानींचं महागडं कंत्राट नाकारून गडकरींनी कमी खर्चात एक्सप्रेसवे बांधून दाखवला

अंबानींचं महागडं कंत्राट नाकारून गडकरींनी कमी खर्चात एक्सप्रेसवे बांधून दाखवला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मुंबई पुणे एक्प्रेसवेवर प्रवास करणं म्हणजे सुखावह प्रवास. काळाच्याबरोबरीने जायचे असेल तर आपल्याला देखील प्रगत व्हायला हवेच. मुंबई पुणे हा प्रवास पूर्वी फार कंटाळवाणा आणि त्रासदायक असायचा. तेव्हाही घाटात अनेकदा अपघात होऊन तासंतास लोकांचा वेळ मोडला जायचा.

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाल्यापासून अवघ्या अडीच तीन तासात आपण मुंबईहून पुण्याला जाऊ शकतो. असं म्हंटल जात मुंबई पुणे एक्सप्रेसवे होणे हे स्व. बाळासाहेबांचे स्वप्न होते. शिवसेना भाजप सरकीची जेव्हा युती होती आणि त्यांचे सरकार जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी या स्वप्नांचा सत्यात उतरवण्याचा घाट घातला.

 

expressway inmarathi

 

नुसतेच स्वप्न बघणे आणि कागदोपत्री ठेवणे याला काहीच अर्थ नसतो. आपण बघतो परेदशातील अनेक मोठमोठाले फ्रीवे असतात ज्यामुळे काही मैलोनचे अंतर आपण काही तासात कापू शकतो त्याच धर्तीवर आपल्याकडे देखील असा रास्ता हवा असे त्यावेळीच बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी ठरवले आणि ते कामाला  लागले.

साधं ग्रामपंचायतीचा रास्ता बांधायचा म्हंटलं तरी दहा परवानग्या, इंजिनियर लागतात इथे तर अक्खा हायवेच बांधायचा आहे ज्यात मोठ्या प्रमाणावर पैसे, साधनसामुग्री लागणार, वृक्षतोड होणार, या सर्व बाबींचा विचार करण्यात आला.

रस्ता बांधायचा म्हणजे कंत्राट देणे आले, त्याप्रमाणे त्या कामाची कंत्राटे देण्यात आली आणि इच्छुक लोकांनी ती भरली देखील होती. त्याकाळात सर्वात जास्त कोटेशन भरणारे  व्यक्तिमत्व होते ते म्हणजे स्व. धीरूभाई अंबानी. होऊ, आज आपण फोन पासून सुपरमार्केट पर्यंत ज्यांच्या गोष्टी वापरतो तेच रिलायन्स समूहाचे संस्थापक.

 

nitin inmarathi

हे ही वाचा – …आणि “महिंद्रा अँड महिंद्रा” कंपनीचा “फाऊंडर” चक्क पाकिस्तानचा अर्थमंत्री झाला…!

ठरल्याप्रमाणे सर्वांची  कोटेशन्स मागवण्यात आली अर्थात सर्वात जास्त होते ते अंबानी यांचेच, नितीनजी आणि त्यांच्या सहकार्यांनी  तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेऊन सर्व प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला.

‘सर्वात जास्त कोटेशन भरलेल्या अंबानी समूहाचे कंत्राट रद्द करा आणि ज्याने कमी भरले आहे त्यांना हे कंत्राट द्या’, असे त्या मीटिंग मध्ये ठरवण्यात आले. ही बातमी लगोलग अंबानींच्या कानावर पडली त्यांनी नितीनजी आणि त्यांच्या सहकार्यांना बोलावून घेतले.

 

contract inmarathi

 

साहजिकच कंत्राट न मिळाल्याने धीरुभाई नाराज होतेच त्यामुळे नितीनजी त्यांना समजावत होते. पण एखादा मोठा व्यवसायिक इतका मोठा प्रोजेक्ट आपल्याहातून घालवेल तरी कसा. उलट धीरूभाई वडीलकीच्या नात्याने नितीनजींना समजावत  होते की हा प्रोजेक्ट इतक्या कमी खर्चात होणे शक्य नाही.

नितीनजी सुद्धा आपल्या मतावर ठाम होते. ठरलेल्या रक्मेतेच हा प्रोजेक्ट पूर्ण करायचा. अखेर चर्चेचे रूपांतर शेवटी पैजेत झाले आणि नितीनजींनी थेट अंबानींना चॅलेंज दिले की  ठरलेल्या रकमेतच हा प्रोजेक्ट पूर्ण करिन अन्यथा स्वतःची मिशी कापून टाकेन आणि जर पैज जिंकलो तर तुम्ही काय कराल?

 

dhiru inmarathi

 

नितीनजींच्या प्रबळ आत्मविश्वासापुढे चक्क धीरुभाई देखील निशब्द झाले मात्र त्यांना दुःख नक्कीच झाले असणार. पुढे नितीनजी आणि त्यांच्या सहकाऱ्यानी अहोरात्र मेहनत घेऊन, अग्निदिव्यातून जाऊन एक्सप्रेसवे बांधून दाखवला .आज मुंबई पुणे एक्सप्रेसवे दिमाखात उभा आहे.

एकूण १६०० करोड इतका खर्च या हायवेसाठी करण्यात आला. ज्या रकमेत ठरला होता त्याच रकमेत हा बांधला गेल्यामुळे नितीनजींची मिशी शाबूत राहिली.

 

nitin express inmarathi

 

आज भारतातील जे प्रमुख हायवे बांधले गेलेत  त्याचे संपूर्ण श्रेय हे नितीनजींना दिले जाते. आज हिमाचल मधून लडाख ला जाणायसाठीचा मार्ग सुख करण्यात ही त्याचाच मोठा वाटा आहे. आज हिमाचलमधील अनेक टॅक्सी ड्राइवर नितीनजींचे आभार मानतात.

वरील घडलेला प्रसंग खुद्द नितीनजींनी एका मुलाखतीत सांगितला आहे.

माणसाकडे प्रबळ इच्छशक्ती स्वतःवरचा ठाम आत्मविश्वास आणि सहकाऱ्यांची उत्तम  साथ यांमुळे सर्व काही शक्य होऊ शकते. आज साधा नगरपालिका ग्रामपंचातीच्या हद्दीतीळ रस्ता एक पावसाळा आला की  त्या पावसासोबतच वाहून जातो.

===

हे ही वाचा – काँग्रेस आघाडीचे मुख्यमंत्री जेव्हा बाळासाहेबांना ‘थेट मातोश्रीवर’ जाऊन भेटतात…

===

 

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?