' अशी कर्तबगार पहिली महिला राणी जिला उलथवण्यासाठी भावांनी कट केला होता! – InMarathi

अशी कर्तबगार पहिली महिला राणी जिला उलथवण्यासाठी भावांनी कट केला होता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

इतिहासात अनेक रणरागिणींच्या गोष्टी आहेत, अनेक राज्यांना नवीन वळणं देण्याच्या कामापासून, सुव्यवस्था करणं, सुरु असलेल्या गदारोळाला, बंडाला संपुष्टात आणण्यापासून प्रजेची काळजी घेणं, उन्नतीच्या संधी निर्माण करणं, हे सगळं अनेक राण्यांनी केल्याचं आपण बघत आलो आहोत, वाचत आलो आहोत.

झाशीची राणी, राणी अबक्का, रुद्रमाँदेवी, तारा राणी साहेब, पद्मावती, अशा अनेक राण्यांबद्दल आपण जाणून आहोत. या राण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे, सगळ्यांना पुरुषप्रधान संस्कृतीला भेदून, मत परिवर्तन करून राज्य करावं लागलं.

 

lady warriors inmarthi

 

अनेक विरोधी बंडांना आटोक्यात आणून राज्यात शांती व सुख पुन्हा प्रस्थापित करावं लागलं, आपण खरंच राज्य चालवायला समर्थ आहोत आणि केवळ स्त्री आहोत म्हणून कमकुवत नसून एखाद्या राजा प्रमाणे राज्याचे पालन पोषण करू शकतो, हा विश्वास लोकांच्या मनात निर्माण करून घ्यावा लागला.

आज आपण अशाच एका कर्तबगार, शूर, युद्ध कौशल्यात पारंगत, असलेल्या एका राणीची गोष्ट पाहणार आहोत.

इस्लामी राजवट, जिथे महिलांना पडद्याआडून डोकावून बघण्याची सुद्धा मुभा नव्हती, ज्यांना फक्त एक शोभेची वस्तू असल्याप्रमाणे दागिन्यांनी मढवून दिखाव्यासाठी महालात ठेवलं जायचं, अशा ठिकाणी एका साहसी, धाडसी रझिया सुल्तानचा जन्म झाला.

मुसलमानी संस्कृतीत शाही महिलांना “सुल्ताना किंवा बेगम” म्हणून संबोधित केले जायचे.

पण रझिया सुल्तानच्या म्हणण्यानुसार “एखाद्या सुल्तानची पत्नी म्हणजे सुल्ताना किंवा बेगम. त्या सुल्तानांच्या कर्तबगारीमुळे त्यांच्या पत्नीची ओळख ठरते. पण माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायला मी कोणत्याच पुरुषावर अवलंबून राहू इच्छित नाही” आणि तिने सुल्ताना ऐवजी स्वतःला सुल्तान म्हणवून घेणं पसंत केलं.

===

हे ही वाचा सत्तेसाठी चक्क भावांशी “संबंध” ठेवणारी एक महत्वाकांक्षी राणी!

===

razia sultan inmarathi

 

अशा रझिया सुल्तानचा जन्म १२०५ मध्ये सेलजुक घराण्यात झाला. ह्या घराण्याची मुळं पाहता हे स्थापनेपासूनच राजघराणे नव्हते. सेलजुक घराण्याचे पहिले शासक, ईलतूमिश तुर्की कुतुबुद्दीन ऐबकच्या शासनकाळात, मजूर म्हणून तुर्कीहून दिल्लीला आले होते.

पण इलतुमिशचा सेवाभाव आणि कर्तबगारीमुळे प्रभावित होऊन, कुतुबुद्दीन ऐबकनि त्यांना राज्याचा कार्यभार देण्याचे ठरवले व सेलजुक घराण्याचा पाया रचला गेला.

अशा ह्या सेलजुक घराण्यात जन्माला आलेली रझिया, लहानपणापासूनच पुरुषी आणि एखाद्या स्त्रीच्या शक्तीची असीम परीक्षा घेणाऱ्या खेळांकडे आकर्षित होऊ लागली.

आपल्या वडिलांची सगळ्यात लाडकी असल्यामुळे, इलतुमिशने स्वतः रझियाची सगळी हौस, पूर्ण करण्याचे ठरवले.

आपल्या मुलीत थोर योद्धा बनण्याचे सगळे गुण व चिकाटी आहे, हे लक्षात येताच, त्यांनी तिला प्रशिक्षण देणे सुरु केले आणि सुरु झाला रझियाचा – रझिया सुल्तान बनण्याचा प्रवास.

इलतुमिशने रझियाला घोडदौड, तलवारबाजी, इतर युद्ध कला, व रणनीतींचे स्वतः प्रशिक्षण दिले. एक कुशल योद्धा म्हणून रझियाची जडण घडण केली.

 

razia sultana horse inmarathi

 

रझियाने लहानपणापासूनच शरारा व पर्दान निवडता पुरुषांचे पोशाख निवडले व आपल्या कोणत्याही मुलापेक्षा कमी न लेखणाऱ्या इलतुमिशने तिचा कोणताच निर्णय अस्वीकार केला नाही.

इलतुमिश एकदा युद्धावर गेलेले असताना, त्यांनी राझियावर संबंध राज्याची जबाबदारी टाकली. एखाद्या पारंगत आणि अनुभवी शासकाप्रमाणे रझियाने ही जबाबदारी पूर्णत्वास नेली.

तिच्या या कर्तबगारीवर प्रभावित होऊन, “आपली मुलगी मुलांपेक्षाही राज्याची जबाबदारी नीट पेलू शकते हे वेळीच ओळखून, आपल्या पुढे गादीची वारसदार रझियाच असेल” हे फर्मान इलतुमिश ने जाहीर केले.

===

हे ही वाचा मुघलांचा विचित्र इतिहास: मुघल बादशहा मुलींची लग्न नातेवाइकांतच लावत

===

ह्या निर्णयाला बऱ्याच अधिकाऱ्यांचा आणि त्याच्या मुलांचा प्रचंड विरोध होता. “एक स्त्री आता आमच्यावर राज्य करेल, आम्हाला एका स्त्रीला सलाम करावा लागेल, आणि तिचे आदेश आम्हाला पाळावे लागतील, हा आमचा अपमान आहे, इस्लामचा अपमान आहे, त्यामुळे वेळ येताच आपण रझियाला उत्तर द्यायला हवे, जेणेकरून आपल्या इतर मुली बायका सुद्धा चौकटीत राहतील.” ह्या विचारांचे समर्थन करणारा एक गट तयार झाला. व रझिया विरुद्ध कट – कारस्थानं शिजू लागली.

पुढे, इलतुमिशच्या अकाली मृत्यूनंतर, त्याच्या मोठ्या मुलाने, म्हणजे रुकनुद्दीन ने राज्य बळकावले. एक प्रशासक म्हणून, सगळ्याच पातळ्यांवर तो अत्यंत अयशस्वी ठरत होता.

केवळ एक पुरुष आहे म्हणून त्याला गादीवरून कोणीच उतरवू इच्छित नव्हते आणि ह्याची किंमत प्रजेला मोजावी लागत होती. प्रजेला तब्बल सात वर्षे रुकनुद्दीनच्या जाचाला सामोरे जावे लागले.

 

ruknuddin inmarathi

 

पण आता अर्ध्याहून अधिक दिल्ली आणि प्रजा रझिया बरोबर होती. त्यांच्या साहाय्याने रझियाने, १२३६ मध्ये आपले राज्य परत मिळवले, व “जलाल – उद-दिन सुलतान रझिया” म्हणून राज्यावर शासन करणे सुरू केले.

रझियाचे राज्य फारकाळ जरी टिकले नसले तरी आपल्या छोट्याश्या ३.५ वर्षांच्या कारकिर्दीत रझियाने मोठे निर्णय घेऊन राज्यपद्धतीत बरेच सकारात्मक बदल व परिवर्तन घडवून आणले होते.

रझिया शिक्षणाची पुरस्कर्ती होती. त्यामुळे हिंदू, मुसलमान, अशा सगळ्याच धर्माच्या लोकांना शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी तिने कायद्यात तरतुदी घडवून आणल्या होत्या.

स्त्रीशिक्षण, हिंदूंच्या धार्मिक पाठशाळा, पूजा अर्चा, स्वतःच्या नावाचे शासकीय चलन आणि मूहर बनवून स्त्रियांना तिने भरपूर आत्मविश्वास मिळवून दिला होता. तसेच ती पर्दा प्रथेच्याही विरोधात होती. एक स्त्री काय करू शकते, याचं एक उत्तम उदाहरण तीने समाजापुढे ठेवलं होतं.

समाजात असाही एक वर्ग होता, ज्याला स्त्री सक्षमीकरण, स्त्री पुरुष समानता, इस्लामचे राज्य असताना इतर धर्मीय लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात सूट व संधी मिळणे, रझिया प्रजेची आवडती होणे, तिची लोकप्रियता वाढणे हे सहन होत नव्हते.

ज्यांना ज्यांना रझिया कोणत्या ना कोणत्या कारणाने डोळ्यात खुपत होती त्या सगळ्या शत्रूंनी तिच्याविरुद्ध हात मिळवणी केली. राज्याच्या हव्यासापोटी तिचे स्वतःचे सक्खे भाऊ तिचे कट्टर शत्रू बनले होते. सगळे एक होऊन एक मोठ्ठा कट रझिया विरोधात रचण्यात आला.

 

razia sultan 3 inmarathi

 

परकीय आक्रमण म्हणून रझियावर हल्ला घडवून आणला गेला, जे कोणी राजे तिला मदत करायला येणार होते त्यांना सगळ्यांना रस्त्यातच अडवून बंदी बनवण्यात आलं. ज्यामुळे वेळेवर रझिया पर्यंत मदत पोहचू शकली नाही त्यामुळे रझियाला आपले प्राण गमवावे लागले.

पुन्हा एकदा, पुरुष प्रधान संस्कृतीचा विजय झाला होता. एक भाऊ आपल्या मृत बहिणीच्या पराभवावर जल्लोष करून आनंदी झाला होता. पण सगळे तिचे विरोधक ह्या गोष्टीपासून अनभिज्ञ होते की ह्यामुळे रझिया इतिहासाच्या सुवर्ण पानांमध्ये आता अमर होणार होती.

===

हे ही वाचा पुरुषांशी संबंध ठेऊन त्यांनाच संपवणा-या जगातील या क्रूर राणीची कथा वाचा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?