' मृत्यूनंतरचं रहस्य उलगडून सांगणाऱ्या गरुड पुराणातल्या गोष्टी वाचून थक्क व्हाल!

मृत्यूनंतरचं रहस्य उलगडून सांगणाऱ्या गरुड पुराणातल्या गोष्टी वाचून थक्क व्हाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हिंदू धर्म हा हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म आहे. वेद, उपनिषदे आणि पुराणं यांना मानवी जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे. ४ वेद, ६ शास्त्रे आणि १८ पुराणं सर्वश्रेष्ठ मानली जातात. यांनी माणसाच्या आयुष्यात विविध गोष्टी शिकवल्या आहेत.

या पुराणात मानवी जीवनातील सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सारं काही या पुराणात सामावलेलं आहे. सृष्टीच्या निर्मितीपासून ते अंतापर्यंत सारं सारं यात आहे.

साऊथचा अपरिचित हा सिनेमा तुम्हाला ठाऊक असेलच. मसालापट असलेल्या या सिनेमातसुद्धा अशाच एका पुराणाच्या आधारे एक माणूस वेगवेगळ्या लोकांना शिक्षा देत असतो ते म्हणजे गरुड पुराण!

 

garuda puran inmarathi

 

भगवान विष्णू यांनी आपलं वाहन गरुड याला सांगितलं ते गरुड पुराण असं म्हणतात. या गरुड पुराणात मानवाच्या मृत्युनंतर काय होते हे सांगितलं आहे.

===

हे ही वाचा भगवान विष्णूंनी “दशावतार” घेण्यामागे काय उद्देश होते? वाचा, प्रत्येक अवतारामागची कथा

===

आयुष्यातील सर्वात मोठे आणि अटळ सत्य म्हणजे मृत्यू. पण या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर काय याचे विवेचन या गरुड पुराणात दिले आहे.

गरुड पुराण हे काही फक्त मरणोपरांत काय हे सांगत नाही तर, जिवंतपणी पण कसं वागावं हे पण सांगतं.

काय सांगतं गरुड पुराण?

इतर सर्व पुराणांपेक्षा गरुड पुराण हे खूप वेगळं आहे. गरुड पुराणात केवळ जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि मूल्ये सांगितली आहेत असं नाही तर मेल्यानंतर काय होतं हे पण सांगितलं आहे.

इतर पुराणं कधीही वाचू शकतो परंतू हे गरुड पुराण मात्र घरातील कुणी माणूस मेल्यानंतर म्हणजे सुतक पाळतात तेव्हाच वाचलं जातं. एरवी हे पुराण कधीही वाचू नये असा संकेत आहे.

अगदी गरुड पुराण घरी ठेवूही नये अशीही मान्यता आहे. हिंदू धर्मात जे सोळा संस्कार सांगितले आहेत त्यातील अंत्येष्टी या एकमेव विषयाशी संबंधित गोष्टी या पुराणात सांगितलेल्या आहेत.

अंत्यसंस्कार, त्यातील विधी आणि मरणानंतर काय आहे..आत्मा, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म हे सगळं गरुड पुराण सांगतं.

 

humans after death inmarathi

 

गरुड पुराणात एकूण १९००० श्लोक आहेत. हे दोन खंडात विभागले आहेत. पहिला खंड पूर्व खंड आणि दुसरा उत्तर खंड मानला जातो.

मेल्यानंतर आत्म्याचा प्रवास, माणसाला त्यानं केलेल्या पापकर्मानुसार काय शिक्षा मिळतात हे या सर्व श्लोकात सांगितले आहे. यमराज मेल्यानंतर काय काय शिक्षा देतात हे गरुड पुराण सांगतं.

आत्मा निघून गेल्यावर काय होतं?

माणूस मरतो..‌आपल्यासाठी त्याचं मरण अकस्मात असतं. पण त्या माणसाला मरण जवळ आल्याची सूचना यमराज काही विशिष्ट लक्षणांनी देतात. त्याची एकंदरीत १० लक्षणं सांगितली आहेत.

हिंदू‌ धर्मात शरीर हे वस्त्र मानलं जातं, ते जीर्ण झालं की आत्मा ते शरीर त्यागतो आणि माणूस मृत्यू पावतो. आत्मा शरीरातून बाहेर पडतो. मग आपल्या रिवाजाप्रमाणे शरीराचं दहन केलं जातं.

एकदा बाहेर पडलेला आत्मा पुन्हा शरीरात येऊ शकत नाही. पण त्याला आता कसलीही बंधनं नसतात. तो कुठेही जाऊ शकतो. मेल्यानंतर सात दिवस आत्मा त्याच्या आवडत्या गोष्टी, आवडत्या ठिकाणी जातो. ज्या गोष्टींवर त्याचं अतोनात प्रेम असतं तिथे थांबतो. म्हणजे मुलं पैसा वगैरे.

===

हे ही वाचा ‘आपण मेलोय’ याची तुम्हाला तुमच्या मृत्युनंतरही जाणीव असते… शास्त्राज्ञांचा अचाट शोध!

===

पूर्वजांची भेट

दहाव्या दिवशी सुतक संपलं की अकराव्या आणि बाराव्या दिवशी धार्मिक विधी करुन आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते. या काळात आत्मा आपले पूर्वज, नातेवाईक, जवळचे मित्र यांना भेटतो.

 

dashkriya inmarathi

 

स्वर्गात पूर्वज, मित्र या नव्याने आलेल्या आत्म्याचे स्वागत करतात. जसं आपण खूप दिवसांनी आपल्याला भेटणाऱ्या जीवलगाला भेटतो हे अगदी तसंच असतं.

नंतर भूलोकावर असताना केलेल्या कर्मानुसार चांगल्या वाईट पाप पुण्यानुसार या आत्म्याला स्वर्ग किंवा नर्क प्राप्त होतो. चांगलेपणाने वागलेले आत्मे हे स्वर्गात पाठवले जातात. तिथं सुख उपभोगून झाले की त्यांचा पुन्हा पृथ्वीवर चांगल्या घराण्यात जन्म देऊन पाठवले जाते. आणि जे पाप केलेले आत्मे असतात त्यांना नरकात धाडले जाते.

तिथे असणाऱ्या शिक्षा या मनुष्याच्या पापावर आधारलेल्या असतात. या शिक्षा खूप भयंकर असतात. जवळपास २८ प्रकारच्या शिक्षा यमलोकात पापी आणि दुरात्म्यांना दिल्या जातात.

 

garud puran punishment inmarathi

 

साधारणपणे व्यभिचारी, पैशाची अफरातफर करणं, मालमत्ता हडप करुन नातेवाईकांना किंवा इतर कुणालाही फसवणं, आपल्या पदाचा गैरवापर करुन लोकांना नाडणं, स्त्रीयांना फसवणं, गरजू माणसांना मदत न करता जाणीवपूर्वक त्रास देणं, आत्महत्या करणं, खून करणं, विश्वासघात करणं,प्राण्यांना मजेसाठी मारणं, भुकेल्या माणसाला अन्न न देणं, प्राण्यांची शिकार करणं.

तसेच वासनांधपणे वागून आपल्या जोडीदाराला त्रास देणं, समाजविघातक कृत्ये करणं, लोकांना विषप्रयोग करणं, प्राण्यांशी, माणसांशी अनैसर्गिक संबंध ठेवणं, चोरी करणं, जाणीवपूर्वक दुसऱ्याची मालमत्ता बर्बाद करणं, दारु पिऊन त्रास देणं, खोटे साक्षीदार बनणं..बनवणं..खोटी साक्ष देणं, निरपराध लोकांना शिक्षा करणं, वगैरे. या सर्व गोष्टी पाप कर्म मानल्या जातात आणि या प्रत्येक पापाला शिक्षा मिळतेच.

हे करताना आत्म्याला मानवी शरीर दिले जाते आणि त्या शरीराचे भयंकर हाल केले जातात.  त्यानंतर त्यांच्या पापाच्या अनुसार पुढील जन्म दिला जातो. वटवाघूळ, पक्षी, प्राणी, मानव, स्त्री, पुरुष अशी विभागणी केली जाते.

 

garud puran 2 inmarathi

 

हे सारं किती खरं किती खोटं माहीत नाही. कारण जो हे सोसतो तो सांगायला येऊ शकत नाही. एकच गोष्ट लक्षात ठेवावी..जोवर जीवंत आहोत तोवर किमान वाईट तरी वागू नये. माणसानं जिवंतपणी चांगलं वागावं हेच तर गरुड पुराण सांगतं.. नाही का?

===

हे ही वाचा महाभारतातले हे ५ अज्ञात प्रसंग आपल्याला ‘मानवी मूल्यांची’ शिकवण देतात!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?