' कडुनिंब आणि सणांच्या गोडव्याचा संबंध काय? महत्वपूर्ण माहिती समजून घ्याच! – InMarathi

कडुनिंब आणि सणांच्या गोडव्याचा संबंध काय? महत्वपूर्ण माहिती समजून घ्याच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्याकडे अनेक रोगांवर जरी औषध उपलब्ध नसली तरी आयुर्वेदामध्ये अगदी कॅन्सर पासून ते अगदी छोट्या आजरांपर्यंत सर्व प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. भारतात विपुल प्रमाणात जंगले आहेत त्यात आढळणाऱ्या कित्येक वनस्पती आपल्या फायद्याच्या आहेत. आदिवासी कातकरी लोकांना अशा वनस्पतींची जास्त माहिती असते.

कारण ते आपल्यासारखे उठसुठ डॉक्टरकडे न  जाता झाडाचा पाला खाऊन आपला आजार बरा करतात. त्यामुळे आपल्याकडे जी नैसर्गिक  साधनसंपत्ती आहे त्याचा आपण वापरच करत नाहीत. आपल्या आजूबाजूला देखील अनेक औषधी वनस्पती असतात हे आपल्याला देखील माहित नसते.

 

kadulimb 1 inmarathi

 

हिंदू सण हे कायमच कोणत्या ना कोणत्या शास्त्रीय कारणांनींसुद्धा साजरे केले जातात. प्रत्येक सणांमागे जसे धार्मिक महत्व  पटवून दिले जाते तशीच काही शास्त्रीय कारणे देखील दिली जातात.

गुढीपाडव्याला एकीकडे घरात श्रीखंडावर आडवा हात मारणारे लोक कडुलिंबाचे एक पान खायला कुचराई करतात. अशा या नावातच कडू असणाऱ्या कडुलिंबाच्या पानांचे महत्व जाणून घेऊयात

आपल्या घरच्या आसपास सहज आढळणारे झाड म्हणजे कडुलिंब . आयुर्वेदमध्ये कडुलिंबाचे महत्व सांगितले आहे. कडुलिंबाच्या पानांनीं अनेक असाध्य  रोगावर मात करता येते. आपल्याकडे साधारणतः कडुलिंबाला गावठी औषध असेही म्हंटले जाते.

 

gudhipadwa inmarathi

 

आपल्याकडे कडुलिंब दोन प्रकराची आढळतात एक म्हणजे गोड आणि दुसरे म्हणजे कडू. दोन्हीमध्ये औषधी गुण जरी असले तरी गोडपेक्षा कडू अधिक प्रभावी मानले जाते. आधुनिक संशोधनामध्ये असे दिसून आले की कडुलिंबामध्ये असणाऱ्या औषधी गुणांची सर इतर कोणालाच नाही.

असे हे कडू पण औषधी पान नेमके या सणालाच का खाल्ले जाते, कारण होळी नंतर वातावरणात उष्णता वाढायला सुरवात झालेली असते तसेच ऋतू बदलल्याने वातावरणात सुद्धा अनेक बदल होत असतात. त्यामुळे साहजिकच सर्दी, पोटाचे विकार लहान सहान आजार उद्भवण्याची शक्यता असते.

 

kadulimb 2 inmarathi

 

एकीकडे कोरोनसारखा आजार थैमान घालत आहे अशावेळी आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी आपण कडुलिंबाची पाने खायला हवीत. जेणेकरून आपली रोगप्रतिकारशक्ती नक्कीच वाढेल.

कडुलिंबाची पाने जशी आपली रोगप्रतिकारशक्ती  वाढवणायचे काम करत असतात तसेच त्याचे इतर फायदेदेखील आहेत.

नितळ त्वचेसाठी :

वास्तविक कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडेन्ट असल्याने त्वचेसंदर्भातील अनेक आजार दूर करतात. त्वचा तर उजळतेच तसेच एक प्रकराची चकाकी सुद्धा येते.

 

dry skin inmarathi

 

बाजारात आढळणाऱ्या अनेक क्रीम्स मध्ये कडुलिंबाच्या पानांची पेस्ट मिसळलेली असते. त्यामुळे चेहऱ्यावरचे  पिंपल्स, व्रण कमी होतात.

केसांसाठी उपयोगी :

अनेकांना केसांमध्ये कोंडा, केस गळणे अशा समस्या असतात. कडुलिंबाचे तेल किंवा पानांचा रस जर केसांना लावलात तर नक्कीच केसांच्या समस्या दूर होतील. कडुलिंबामध्ये असणारी पोषक तत्वे केसांच्या मुलांचे पोषण करतात.

 

hair massage inmarathi

हे ही वाचा – विश्वास बसणार नाही, पण ‘या’ कारणामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला ‘तुळस’ वर्ज्य आहे!

नैसर्गिक ब्रश :

पूर्वी अनेक घरांमध्ये जेव्हा दात घांसण्यासाठी ब्रश पेस्ट नव्हत्या तेव्हा लोक कडुलिंबाबाची पाने चावायची त्यामुळे दातांचे आरोग्य देखील वाढायचे.

 

pearl white teeth inmarathi1

 

कॅन्सर :

होय हा महाकाय आजार देखील या पानांच्या सेवनाने बरा होतो. त्यामध्ये असणारे अँटिऑक्सिडेन्ट कॅन्सर रोखू शकतात.

 

cancer inmarathi

 

युरिन इन्फेकशन :

 

urine inmarathi

 

कडुलिंबाची पाने खाल्ल्यास काही तासात तुमचा त्रास कमी होऊ शकतो असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अशा या चवीला कडू लागणाऱ्या पानांचा आपल्याला होणारा फायदा नक्कीच एक गोड म्हणता येईल. आपल्याकडे जसे म्हणतात की घरात तुळशी वृन्दावन असावे पण सध्याची एकूणपरिस्थती बघता वृंदावन शक्य नसले तरी घरात तुळस लावू शकता.

तुळशीप्रमाणे एक कडुलिंबाचे झाड लावणायचा संकल्प या नवीन वर्षानिमित्ताने आपण सगळे मिळून नक्कीच करू शकतो. 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

हे ही वाचा – दिवाळी हा फक्त “भारतीय सण” वाटतो? तसं नाहीये! वाचा जगभरातील दिवाळीबद्दल…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?