'पांडवांचे गर्वहरण कोणी व कसे केले?

पांडवांचे गर्वहरण कोणी व कसे केले?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सामान्य माणूस असो की कोणी देवी देवता, जेव्हा जेव्हा एखाद्याला स्वत:च्या शक्तीचा किंवा सत्तेचा वृथा अभिमान वाटतो किंवा त्याच्यामध्ये गर्व आणि अहंकार येतो तेव्हा तेव्हा नियती त्या व्यक्तीला काही ना काही धडा शिकवून परत जमिनीवर आणते. म्हणूनच कायम आपल्याला मोठी माणसं सांगत असतात कि कशाचाही गर्व करू नये. त्यासाठी आपल्याला थोर व्यक्तींचे उदाहरण देत असतात जे त्यांच्या कार्याने अत्युच्च शिखरावर पोचले असले तरी त्यांचे पाय कायम जमिनीवर आहेत. लहान मुलांना सुद्धा आपण ससा कासवाच्या गोष्टीतून हीच शिकवण देत असतो की गर्व केला की माणसाचे नुकसानच होते.

story-marathipizza
wn.com

महाभारत हे एक असे साहित्य आहे ज्यामध्ये माणसाचे गुण अवगुण सांगितले आहेत. प्रत्येक प्रकारच्या प्रवृत्तीवर भाष्य केले आहे आणि त्यातलीच एक कथा आहे पांडवांची! खरं तर कुंतीने पांडवांवर उत्तम संस्कार केले. त्यांना धर्माचरण शिकवले. पांडव सुद्धा कधीही अधर्माने वागले नाहीत. पण तरीही त्यांना त्यांच्या शक्तीविषयी जेव्हा गर्व निर्माण झाला तेव्हा नियतीने त्यांचीही परीक्षा घेऊन त्यांचे गर्वहरण केले. आज आपण ह्याच कथेविषयी जाणून घेणार आहोत. ह्या कथेमध्ये पांडवांना त्यांच्या वृथा अभिमानापायी मृत्युदंडाला सामोरे जावे लागले होते.

pandav-and-yaksh-marathipizza
hindi.webdunia.com

एकदा पांडव वन विहाराला गेले असताना थकून एका जागी थांबले. ते सगळेच श्रमाने थकले होते व त्यांना खूप तहान लागली होती. तेव्हा नकुल आपल्या ज्येष्ठ बंधूंना म्हणाला की,

 तुम्ही इथेच विश्राम करा.मी सर्वांसाठी प्यायला पाणी घेऊन येतो.

जंगलामध्ये पाण्याचा शोध घेत असताना त्याला एक तळे दिसले. त्या तळ्यातील पाणी अतिशय निर्मळ दिसत होते म्हणून नकुलने आपल्या भावंडांसाठी तेच पाणी न्यायचे ठरवले. तो पटकन ते पाणी घ्यायला गेला तेव्हा त्याला एक आकाशवाणी ऐकायला आली. आकाशवाणी करणाऱ्याने नकुलला चेतावणी दिली आणि म्हटले की

हे पंडू पुत्रा, हे माझे तळे आहे.जर तुला ह्यातील पाणी हवे असेल तर आधी माझ्या काही प्रश्नांची योग्य उत्तरे द्यावी लागतील. जर तू तसे केले नाहीस तर तू मृत्यूला प्राप्त होशील.

pandav-and-yaksh-marathipizza04
dadazi.net

नकुलने ह्या आकाशवाणी कडे दुर्लक्ष केले. कारण त्याला त्याच्या भावांच्या शक्तीचा गर्व होता. त्याने त्या जलाशयातील पाणी प्यायले आणि तत्काळ तो मृत झाला.

इकडे बऱ्याच वेळ वाट पाहून सुद्धा नकुल न आल्याने सगळे चिंतेत पडले व सहदेव नकुलच्या शोधात निघाला. सहदेवाला सुद्धा ती आकाशवाणी ऐकायला आली पण त्यानेही त्याकडे दुर्लक्ष केले आणि वृथा अभिमानामुळे त्याचाही मृत्यू झाला. असाच अर्जुन आणि भीमाचा पण ह्याच प्रकारे मृत्यू झाला. अशा प्रकारे एकामागे एक असा चार पांडवांचा मृत्यू झाला. पाण्याच्या शोधात गेलेले आपले भाऊ परत आले नाहीत ह्या चिंतेने काही वेळाने युधिष्ठीर स्वत: आपल्या भावांच्या शोधात निघाला. आपल्या चारही भावांना असे मृतावस्थेत पडलेले बघून तो व्यथित झाला आणि त्यांची नावे घेऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागला.

pandav-and-yaksh-marathipizza02
inrootz.in

तेव्हा परत आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणी करणाऱ्या यक्षाने युधिष्ठिराला सांगितले क,

माझ्यामुळेच तुझ्या भावांची ही दशा झाली आहे.

युधिष्ठिराने त्याचे विनम्रतेने कारण विचारले आणि यक्षाने सगळी हकीकत सांगितली व युधिष्ठिरास प्रश्न विचारण्याची इच्छा व्यक्त केली. युधिष्ठिराने विनम्रतापूर्वक सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायचे कबूल केले. आणि सहजतेने त्या यक्ष देवतेच्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे दिली.

युधिष्ठिराच्या बुद्धिचातुर्य आणि विनम्रतेवर खुश होऊन यक्ष देवतेने युधिष्ठिराला वरदान दिले की चार भावांपैकी कुठल्याही एका भावाचे प्राण तो परत मागू शकतो. हे ऐकून त्वरित युधिष्ठिराने नकुलाचे प्राण परत मागितले.

pandav-and-yaksh-marathipizza03
quora.com

नकुलच का? पराक्रमी अर्जुन किंवा शक्तिशाली भीम का नाही?

असे यक्षाने विचारले, तेव्हा युधिष्ठिराने असे उत्तर दिले की

बाकी तीन भावांशिवाय तसाही माझ्या आयुष्याला अर्थ उरणार नाही. परंतु कुंतीमातेच्या पुत्रांपैकी मी एक जीवित आहे. पण माद्रीमातेच्या पुत्रांपैकी कोणीही जीवित नाही. म्हणून माद्रीमातेच्या पुत्रांपैकी एक नकुलाला जीवदान द्यावे. म्हणजे दोन्ही कुले जीवित राहतील .

युधिष्ठिराच्या ह्या धर्मपरायण स्वभावावर प्रसन्न होऊन यक्षाने सर्व पांडवांना जीवनदान दिले.

pandav-and-yaksh-marathipizza05
gajabkhabar.com

परंतु पांडवांना मात्र स्वतःच्या वृथा अभिमानाची लाज वाटू लागली. भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे कि जो धर्माचे रक्षण करतो, धर्म सदैव त्याचे रक्षण करतो. युधिष्ठिराच्या ह्याच धर्माचरणामुळे सर्व पांडवांना जीवनदान मिळाले. धर्माचा मार्ग कठीण आहे. परंतु अखेरीस ह्याच मार्गाने तुम्हाला न्याय मिळतो. म्हणूनच धर्माचे पालन करणे कधीही सोडू नये.

ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की पांडवांसारख्या ज्ञानी आणि पराक्रमी मनुष्यांना सुद्धा गर्व होऊ शकतो आणि त्यांनाही त्याचे शासन होऊ शकते. म्हणूनच कोणीही कधीही आपल्या शक्तीचा, ज्ञानाचा अभिमान बाळगू नये.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?