' १ रुपयाची गोळी, ३०० कोटींचा धंदा! PULSE ची कथा तुम्हाला बरंच काही शिकवून जाते!

१ रुपयाची गोळी, ३०० कोटींचा धंदा! PULSE ची कथा तुम्हाला बरंच काही शिकवून जाते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

साधारणपणे लोक सांगतात, आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर अपयशी लोकांच्या कथा वाचा. त्याचे फायदे असे होतात- एक तर आपल्याला यशस्वी होण्यासाठी काय बदल करावे लागतात हे समजतं. आणि यश मिळवण्यासाठी प्रेरणा मिळते.

कोणताही व्यवसाय आज सुरू केला आणि उद्या फोफावला असं नाही होत. त्यासाठी आवश्यक असते मेहनत, चिकाटी आणि अभ्यास, नवे नवे प्रयोग करायची इच्छा आणि जर अपयश आलं तर सुधारणा करुन पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागायची तयारी मनाची जिद्द यांवरच यशवंत होता येतं. अशीच एक नव्या प्रयोगांची यशोगाथा…

पल्सची हिरवी कैरीला मीठ मिरची लावलेल्या चवीची कँडी एकदम लहानपणीच्या दिवसांत घेऊन जाणारा स्वाद..या कँडीनं हळूच बाजारात प्रवेश केला आणि आठ महिन्यांत बाजारपेठ काबीज केली.

 

pulse candy inmarathi

 

नुसतीच काबीज केली नाही तर कंपनीला १०० कोटींचा नफा मिळवून दिला. सुरुवातीला लोकांना वाटलं होतं तेरड्याचा रंग तीन दिवस..तसंच या कँडीचं पण होईल.

थोड्या दिवसांनी लोक विसरुन जातील. कारण चाॅकलेट्सचा इतका मोठा पसारा आहे..इतके विविध प्रकारचे नमुने चाॅकलेट्समध्ये मिळतात की या कँडीला लोकच विसरुन जातील. पण तसं झालं नाही.

आजही पल्सची कैरीच्या स्वादाची तिखट मीठ पेरलेली कँडी दिमाखात उभी आहे. २०१७ ला या पल्स कँडीचा खप वाढला की एका वर्षात तीनशे कोटींचा गल्ला जमवण्यात पल्स यशस्वी ठरली.

विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे, कितीतरी कँडीचे उत्पादक आपलं उत्पादन बाजारात टिकवू शकले नाहीत. मग या पासपासच्या पल्स कँडीला हे कसं शक्य झालं?

पासपास ही कँडी तयार करणारा ग्रूप म्हणजे डीएस ग्रूप. यांची रजनीगंधा पान मसाला, पासपास आणि कॅच मसाले अशी उत्पादनं बाजारात उपलब्ध आहेत.

२०१३ साली या कँडीची संकल्पना ठरवली गेली आणि २०१५ साली ही कँडी बाजारात दाखल झाली. या २ वर्षांत बरंच संशोधन आणि कँडी तयार करताना वेगवेगळे प्रयोग, सुधारणा करणं सुरू होतं. मग जेव्हा ती हवी तशी बनवली गेली तेव्हा २०१५ मध्ये ही कँडी बाजारात आणली.

तेव्हा कंपनीनं केवळ तीनच राज्यात ही कँडी वितरीत केली होती. ती तीन राज्यं होती राजस्थान, गुजरात आणि दिल्ली. जाहिरात करुन माल विकणं ही संकल्पना या प्राॅडक्टपुरती कंपनीनं बाद ठरवली.

===

हे ही वाचा आपल्या आवडत्या ‘कॅडबरी- डेअरी मिल्क’ विषयीच्या या खास गोष्टी वाचून तुम्ही थक्क व्हाल

===

pulse 2 inmarathi

 

फक्त माऊथ पब्लिसिटी हे एकच धोरण ठरवून कंपनीनं ही कँडी विकायला सुरुवात केली. कँडीमध्ये असलेली मीठ मिरचीची पूड आणि कँडीचा आंबटगोड स्वाद यांनी लोकांची मनं तर जिंकलीच पण कमावलेला नफा होता शंभर कोटी!

त्याचवेळी कोक मात्र शुन्यावर होते. कंपनीनं तयार केलेल्या कँडीज इतक्या लोकप्रिय झाल्या की उत्पादन आणि मागणी यात खूप तफावत होती. जवळपास ६०-७०% मागणी होती कँडीला आणि कंपनीचं उत्पादन कमी होतं आणि लोक घासाघीस न करता सांगेल त्या किंमतीला कँडीज खरेदी करायला तयार होते.

कच्चा आम हे पासपासचं प्राॅडक्ट इतकं लोकप्रिय झालं की कंपनीनं नवं उत्पादन बाजारात आणलं. पेरु..आंबट चवीसह असलेली कँडी. ते साल होतं २०१७!

२०१७ साली पासपासचा खप इतका वाढला की ओरिओ या बिस्कीटांना पासपासनं धूळ चारली. ३०० कोटींची विक्री केली पासपासनं आणि ओरिओ होती २७० कोटींवर.

पल्सच्या यशाचं गमक : 

बाजारपेठेचा अभ्यास आणि संशोधन-

कोणतंही प्राॅडक्ट तयार करुन बाजारात विक्रीसाठी ठेवलं म्हणजे होत नाही. त्यासाठी बाजारपेठेचा अभ्यास करावा लागतो. लोकांना काय आवडेल याचा विचार करावा लागतो. पल्सनं नेमकं हेच केलं.

आपलं प्राॅडक्ट तयार करण्यापूर्वी काय प्राॅडक्ट हवं हे पाहीले. कैरी खासकरून तिखट मीठ लावलेली कैरीची फोड सगळ्या वयोगटातील लोक आवडीने खातात मग हेच का बनवू नये? इथंच निम्मं काम झालं.

 

kairi inmarathi

===

हे ही वाचा अनंत अडचणींमधून मार्ग काढत ३६ वर्ष टिकवला आईस्क्रीम ब्रँड – फक्त २ कारणांच्या जोरावर!

===

प्राॅडक्ट असं हवं जे सर्व वयोगटातील लोकांना हवं हवं वाटेल, ते किंमतीत पण कमी असावं. अति महाग वस्तू फक्त अति श्रीमंत घेऊ शकतात बाकीचे लोक त्याकडं ढुंकून पण पहात नाहीत.

याचबरोबरीने कंपनीने अजून एक वेगळी आणि छान कल्पना लढवली कँडी संपता संपता तोंडात आंबटगोड आणि तिखट मीठाची एकत्रित चव रेंगाळली पाहीजे. त्यासाठी कँडीच्या मधोमध पेरलेली मीठ मिरचीची चिमूटभर रेघ!

बस्स.. लोकांना तो स्वाद इतका आवडला की लोक हौसेने कँडी घेऊ लागले.. चघळू लागले, आणि पन्नास पैसे एक रुपया हे‌ सहजासहजी खर्च करता येतात लोकांना. ही लोकांची नाडी ओळखून केलेलं उत्पादन पासपासला यशस्वी बनवून गेलं.

वितरणाची उत्तम व्यवस्था-

एखादं प्राॅडक्ट बनवलं‌ म्हणजे झालं का? नाही! ते लोकांपर्यंत व्यवस्थितपणे पोचणं पण महत्वाचं आहे. पल्सच्या पासपास कँडीचा हा एक मजबूत दुआ आहे. त्यांची वितरण व्यवस्था. कमीत कमी गुंतवणूक करणाऱ्या माणसालाही ते माल देतात.

दुसरं असं आधीच बाजारात असलेलं त्यांचं रजनीगंधा पान मसाला हे प्राॅडक्ट अत्यंत लोकप्रिय आहे. त्याच्या विरतण व्यवस्थेतच पासपासचं वितरण ते करतात.

 

rajnigandha inmarathi

 

लहानात लहान खेड्यातील दुकानापासून मोठ्या शहरातील मोठ्या दुकानातही पास पास कँडी सहजी मिळते. यामुळेच हे प्राॅडक्ट सर्वदूर पोहोचलं आहे.

आकर्षक पॅकिंग-

पास पासचं असलेलं आकर्षक पॅकिंग पाहूनच ग्राहकांना एकदा तरी ही कँडी घेऊन खावी असा मोह होतो आणि एकदा खाल्ली की त्याची चव‌ परत परत खायला भाग पाडते.

लोकांकडून होणारी जाहिरात-

एकदा पास पास कँडीची चव घेतलेल्या लोकांनीच एकमेकांना सांगून जाहिरात केली. कर्णोपकर्णी झालेली ही प्रसिद्धी या प्राॅडक्टच्या यशाचं रहस्य आहे.

किंमतीची वसूली-

एक रुपयाला एक अशी या कँडीची किंमत आहे पण त्या किंमतीत आपल्याला २.५ ग्रॅम कँडी मिळते आणि स्वादाची गोष्ट तर और आहेच. ही गोष्ट झपाट्याने होणाऱ्या विक्रीसाठी कारण आहे.

 

pulse candy feaured inmarathi

 

थोडक्यात सांगायचं तर, संशोधन, विपणन आणि वितरण हे सर्व काही योग्य मार्गानं नेलं तर साध्यात साधी वस्तूही मार्केटचा प्राण बनते.

मेहनत तर सगळेच करतात पण योग्य वाटेवर केलेली मेहनत माणसाला यशाच्या शिखरावर नेते.. पासपासची पल्स कँडी हे याचं जिवंत उदाहरण आहे!!!

===

हे ही वाचा परदेशी चिप्सना तगडी टक्कर देणाऱ्या ‘बालाजी वेफर्स’चा कुरकुरीत इतिहास! वाचा

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?