' ना सोनं-नाणं, ना अन्नदान…चक्क ‘दगड’ देऊन या मंदिरात नवस फेडला जातो! – InMarathi

ना सोनं-नाणं, ना अन्नदान…चक्क ‘दगड’ देऊन या मंदिरात नवस फेडला जातो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण मंदिराला, मशिदीला, चर्चला जेव्हा भेट देतो तेव्हा तिथल्या भव्यदिव्य इमारती, पूजेच्या सामानाची दुकानं, खेळण्यांची दुकानं, प्रसादाची मिठाईच्या दुकानांच्या रांगाच्या रांगाच आपल्याला दिसतात.

गदारोळ घालणारे भाविक, अत्यंत खालावलेली परिसराची स्वच्छता, आपल्या लाडक्या देवाला भेटायला सुद्धा शुल्क अकारणाऱ्या संस्था, पाच रुपयाचा नवस बोलून ५०० करोड मागणारे ह्या रांगांमध्ये उभे असलेले अनेक लोक, हे असं चित्र देवस्थानी गेल्यावर आपल्या डोळ्यांपूढे उभं राहतं.

देवाला भेटायला जाताना आपल्या मनात किती प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, श्रद्धा ह्यापैकी एकतरी शुद्ध, निर्मळ गुण आढळतो का हे नं तपासता, मी देवाला इतके पैसे दिले आता माझं काम नक्की पूर्ण होईल, अशी देवाण घेवाण करण्याची भावनाच आपल्या मनात असते.

 

indian temples inmarathi

 

देव हा फक्त भक्ती आणि प्रेमाचा भुकेला असतो असं आपल्या मोठ्यांना आपण भरपूरदा सांगताना ऐकलं असेल. पण आज हा भाव लोप पावत चाललाय. चराचरात, संपूर्ण सृष्टीत वास्तव्य करणाऱ्या देवाला आपण चार भिंतींपुरतं मर्यादित करून ठेवलंय.

===

हे ही वाचा या अजब मंदिरात होतात अशा काही गोष्टी ज्यांची कुणी स्वप्नातही कल्पना केली नसेल!

===

पण आजही आस्थेचं कमर्शियलायझेशन होत असताना अशीही काही ठिकाणं आहेत जिथे केवळ आणि केवळ शुद्ध आस्थेलाच, मनाच्या भावालाच सर्वाधिक महत्व दिल्या जातं. अशाच एका ठिकाणाबद्दल आज आपण पाहणार आहोत.

कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यात स्थित कोटीकल्लीन कादू बसप्पा मंदिर हे शिवाच्याच एका रुपाचं जागृत देवस्थान आहे. लोक इथे आपले नवस बोलतात आणि त्यांचे ते नवस पूर्णही होतात.

नवस पूर्ण झाल्यावर तो फेडायला आलेल्या भाविकांची इथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. इथे आजूबाजूच्या परिसरातील लोक हे व्यवसायाने शेतकरी असून शेती भरभरून व्हावी, भरगोस पीक यावं आणिआपल्या जनावारांचं आरोग्य सुदृढ राहावं, या साठी बसप्पाला नवस बोलतात.

बसप्पा नवस पूर्ण करतो पण त्याबदल्यात त्याला जे अर्पण केलं जातं ते ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही.

 

lord basappa inmarathi

 

आपण मंदिरात फुलं, नारळ, पेढे, साखर, मेणबत्ती, चादर असं काही काही देवाला श्रद्धेने अर्पण करतो, पण इथली माणसं मात्र देवाला मोठ्या श्रद्धेने दगड अर्पण करतात.

होय योग्यच वाचलंत, इथे येणारे भाविक आपल्या संपत्तीतील, शेतातील, घराच्या अंगणातील तीन किंवा पाच दगड बसप्पाला अर्पण करतात आणि देव ते मोठ्या आवडीने स्वीकारतोही. कुठल्याही सोन्या चांदीच्या दागिन्यांची, चढाव्याची अपेक्षा न करणारा देव प्रेमाने अर्पिलेला दगड सुद्धा स्वीकारतो.

हे मंदिर मांड्या शहरापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या किरागांदुरु – बेविनाहल्ली मार्गावर आहे. हा मार्ग मैसूर – बंगळूर नॅशनल हायवे पासून सुमारे २.५ किलोमीटर अंतरावर आहे. ह्या मंदिराला पाहाल तर समोर करोडो दगडांचा ढीग आणि त्यामध्ये शिवाची भव्य मूर्ती आपल्या दृष्टीस पडते.

ह्या देवस्थानाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणतीही इमारत नाही, देवाची मूर्ती खुल्या आकाशाखाली स्थापित केलेली आहे. हि संपूर्ण मूर्ती दगडाची असून, कैक वर्षांपासून या ठिकाणी स्थापित केलेली आहे.

===

हे ही वाचा मंदिरामध्ये प्रसाद म्हणून मिळतो चक्क “गांजा”? विश्वास बसत नसेल तर हे वाचाच

===

lord kadu basappa inmarathi

 

लोकांच्या म्हणण्यानुसार, हे विश्वच ज्याचं घर आहे, जो परमात्मा चराचरात वास करतो त्याला आपण बापडी माणसं कोणतं घर बांधून देणार? शिवाचीहि खुल्या गगनाखाली असलेली मूर्ती “देवच विश्व, देवच चराचर” ह्याची प्रचिती आपल्याला करून देते.

ह्या मंदिरात पूजेअर्चेचे सुद्धा कोणतेच नियम नाहीत. इथे एकही पुजारी नाही. ज्याला जशी वाटेल तो भाविक तशी पूजा करायला इथे मोकळा असतो. पण ह्यामुळे भाविकसुद्धा आपली मर्यादा सोडून वागतात किंवा देवस्थानाची कोणत्याही प्रकारची विटंबना करतात असे प्रकार कधीच तिथे घडत नाहीत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, इथे दान द्यायचे फार काही नियम नसले तरीही एक महत्वाचा नियम आहे जो सगळ्यांनी पाळायला पाहिजे.

तो म्हणजे “जे दगड आपण देवाला अर्पण करायला आणत आहोत ते आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेचे असावे. ते घरातील, शेतातील, कुठलेही असो पण स्वतःच्या जागेचे असायला हवे. आणि ३ किंवा ५ इतक्याच संख्येत दगड देवाला प्रसाद म्हणून वाहायला हवे हासुद्धा एक नियम आहे.”

देवाला आपली स्वतःची वस्तू द्यायला हवी, म्हणून हा नियम. बाकी दगड कोणत्या पद्धतीचा असावा, आकाराचा, रंगाचा असावा या बद्दल कोणतेही बंधन भाविकांवर नाही.

 

stones inmarathi

 

ह्या देवस्थानच्या आजूबाजूच्या गावातील बहुतेक मंडळी ही व्यवसायाने शेतकरी आहेत आणि शेतजाऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची आणि प्रिय वस्तू म्हणजे त्यांचं शेत.

शेतकऱ्यांची परिस्थिती सुद्धा आपल्याला ठाऊकच आहे, काही लोक दान धर्म करण्यास सक्षम असतात आणि काहींकडे दोनवेळच्या अन्नाचा सुद्धा तुटवडा असतो म्हणून अशा गरिबांना सुद्धा देवाला पूजता यावं, आणि कोणत्याही प्रकारचं नैराश्य न्यूनगंड त्यांच्या मनात येऊ नये म्हणून सुद्धा ही प्रथा सुरू केलेली असावी.

मांड्या शहरात पोहोचण्यासाठी टॅक्सी, शासकीय बस, मैसूर पासून सहज उपलब्ध असतात. मांड्यापासून ऑटोरिक्षा किंवा टॅक्सीने आपण ह्या मंदिरापर्यंत पोहचू शकतो.

सगळ्यात जवळचे रेल्वेस्टेशन हे मांड्या रेल्वेस्टेशन आहे, तिथून मंदिरात जाण्यासाठी कॅब, रिक्षा सहजपणे उपलब्ध असतात.

मंदिर परिसरात राहण्याची कोणतीही सोय नाही कारण मंदिराची ऑफिशियल समितीसुद्धा नाही. मांड्या शहरात आपल्याला राहण्या – खाण्याच्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत.

अशा शांत, प्रसन्न, फक्त आणि फक्त भक्तीमय वातावरण आणि कुठलेच नियम नसलेल्या ह्या देवस्थानाला नक्की भेट द्या.

===

हे ही वाचा हाडांच्या व्याधी सोडवणारा, प्रसादाऐवजी औषध देणारा ‘ऑर्थोपेडिक हनुमानाचा’ चमत्कार

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?