' विचित्र नैवेद्य ते सांगाड्यांची पूजा! अत्यंसंस्काराच्या विचित्र पद्धती तुमची झोप उडवतील – InMarathi

विचित्र नैवेद्य ते सांगाड्यांची पूजा! अत्यंसंस्काराच्या विचित्र पद्धती तुमची झोप उडवतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

माणूस जन्माला आल्यापासून बारसं ते बारावं असे‌ सोळा संस्कार त्याच्यावर केले जातात. पाचवीची पूजा, बारसं, उष्टावण..  मुंज… लग्न संसार, मुलंबाळं.. त्यांची शिक्षणं.. लग्नं.. नातवंडं.. असं करत करत माणूस आयुष्य परिपूर्ण जगला, की शेवटचा पडाव येतो तो म्हणजे मृत्यू.

या मृत्यूनंतर त्या त्या समाजातील रिवाजाप्रमाणे शरीर दहन किंवा दफन करतात. मृत माणसाच्या आवडीचे पदार्थ तिथे ठेवतात. ही झाली आपल्याकडची पद्धत. पण इतर धर्मात, इतर देशात माणसाच्या मृत्यूनंतर इतके वेगवेगळे विचित्र रिवाज आहेत ते वाचून थक्क व्हायला होतं..

इजिप्तमध्ये ममी तयार करुन पिरॅमिडमध्ये ठेवत होते, हे आपल्याला माहीत आहेच. आपल्याकडे हिंदू धर्मात असणाऱ्या मान्यतांनुसार शरीर हे वस्त्र आहे. ते जीर्ण झालं की आत्मा ते बदलून पुढच्या प्रवासाला जातो. नंतर विधीपूर्वक त्याचं दहन करुन लोक आपापल्या कामाला लागतात.

 

mummies egypt inmarathi

 

हे विविध ठिकाणी होत असलेले अंत्यसंस्कार त्याचे प्रकार‌ आपल्या कल्पनेत सुद्धा येणार नाहीत. असेच काहीसे‌ विचित्र, पण त्या त्या समाजातील लोकांनी भावनेने स्वीकारलेले हे काही अंत्यविधीचे प्रकार…

१. दक्षिण कोरिया

दक्षिण कोरियामध्ये मृत माणसाची राख विसर्जित केली जात नाही. त्यापासून मोती बनवतात आणि ते सर्रास वापरले जातात.

 

pearls made with human ashes inamrathi

 

२. पापुआ न्यू गिनी

इथला रिवाज भयंकर आहे.. मृतदेहाचे तुकडे करुन हे लोक खाऊन टाकतात. नरभक्षक!!!

 

papua new guinea death ritual inmarathi

 

३. अमेरिका

अमेरिकेत इंटर्नल रीफ्स नावाची कंपनी आहे. ही कंपनी समुद्र आणि जलचरांचे जीवन यांचं रक्षण करण्यासाठी काम करते. या कंपनीकडे मृतदेह दिला तर समुद्रात सोडून देतात.

 

sea and beauty inmarathi

 

४. मादागास्कर

या देशातला मृत्यूनंतरचा रिवाज अतिशय विचित्र आहे. या ठिकाणी मृतदेह पुरतात आणि सात वर्षांनंतर पुन्हा एकदा ती कबर खोदून सर्व हाडे बाहेर काढतात.

पुन्हा तो नव्या कापडात गुंडाळून त्याची पूजा करतात आणि ते हातात घेऊन सगळे कुटुंबातील लोक नाच करतात. त्या जमिनीत पुरलेल्या सांगाड्याला घाणेरडा वास येतो पण दारु पित त्या मृत माणसाच्या आठवणींच्या गोष्टी करत हा दिवस साजरा होतो.

 

madagaskar death ritual inmarathi

 

===

हे ही वाचा – मृत अंतराळवीराच्या मृतदेहाचं जे केलं जाऊ शकतं, ते सामान्य व्यक्तींना सुचणारही नाही!

===

५. घाना

या देशात ज्याच्या त्याच्या व्यवसायानुसार शवपेटी बनवली जाते. हा एकदम हौसेचा मामला बरं का! वैमानिकांना विमानाच्या आकाराची शवपेटी, मच्छीमारांना माशाच्या आकाराची शवपेटी आणि उद्योगपतींना मर्सिडिज डिझाईनची शवपेटी!!!

 

ghana coffins inmarathi

 

६. तिबेट

या ठिकाणी बुद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. त्यातील तत्वांचा समावेश करुनच आयुष्य जगतात. बौद्ध धर्म शरीराला रिकामं भांडं मानतात. प्राण गेले की ते बिनकामाचं.. मग असं मृत शरीर तुकडे करुन डोंगरावर टाकून देतात. ज्यामुळे पक्षी, प्राणी ते खाऊन टाकतात.

 

tibbet death ritual inmarathi

 

७. न्यू आॅर्लेन्स

या ठिकाणी प्रेतयात्रा काढताना मोठमोठ्या वाजंत्री वाजवून काढली जाते. बँड कंपनी प्रथम शोक संगीत वाजवते नंतर जाझ हा संगीत प्रकार हळूहळू दणदणाट करत वाजवतात आणि जमलेले नातेवाईक त्या तालावर नाचत गात आपल्या मृत माणसाला निरोप देतात.

 

new orleans death ritual inmarathi

 

८. फिलीपिन्स

फिलीपिन्समध्ये मृत माणसाचे डोळे बांधून अंत्यसंस्कार करण्यात येतात आणि त्याही पेक्षा आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तो मृतदेह घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच पुरला जातो.

फिलीपिन्समध्ये अजून एक जमात आहे, टिगुआन.. या जमातीत प्रेताला नवे कपडे घालून खुर्चीत बसवतात. त्याच्या तोंडात सिगारेट दिली जाते. आणि मग पुढील क्रियाकर्म केले जाते.

 

philippines death ritual inmarathi

 

===

हे ही वाचा – मृत्यूनंतरही हेटाळणी थांबत नाहीच… ‘त्यांच्या’ अंत्यसंस्काराचा विधी हेच दाखवून देतो

===

९. मनिला

मनिलाजवळ असणाऱ्या कॅव्हिटेनो इथे तर अजूनच विचित्र रिवाज आहे. मृतदेह एखाद्या झाडाच्या खोडात दफन करायचा. माणूस मरण्यापूर्वी त्याच्यासाठी झाड निवडून ठेवायचं. त्याचा बुंधा आतून पोखरून पोकळ करायचा आणि मृतदेह त्या पोकळीत भरुन टाकायचा.

 

dead bodies buried in tress inmarathi

 

१०. अपायो

फिलीपिन्सच्या उत्तरेकडे असणाऱ्या अपायोमध्ये मृतदेह स्वयंपाकघरात पुरतात.

 

apayo death rituals inmarathi

 

११. पर्यावरणपूरक दफनविधी

यामध्ये नैसर्गिक स्त्रोत वापरुन शवपेटी तयार करण्यात आलेली असते. जी मातीत मिसळून जाते. पर्यावरणाला कसलीही हानी पोहोचू नये याची खबरदारी घेऊन केलेला हा विधी. आपल्याकडे साधारणपणे हाच विधी केला जातो.

 

indian funeral inmarathi

 

१२. झोरास्टेरियन अंत्यविधी

मृतदेहाचे तुकडे बैलाच्या मूत्राने‌ धुतले जातात आणि अशा एका जागी ते प्रेत नेऊन ठेवलं जातं त्याला टाॅवर आॅफ सायलेंट म्हणतात. तिथे गिधाडं येऊन ते प्रेत खाऊन टाकतात.

 

zoroastrian death ritual inmarathi

 

सध्या गिधाडांची संख्या कमी झाली आहे आणि शहरीकरणामुळे गावाबाहेर असलेली ही अंत्यभूमी न मिळणं हा एक डोकेदुखीचा भाग झाला आहे.

१३. हैदा टोटेम पोल

उत्तर अमेरिकेतील एका जमातीत जर प्रमुखाचा मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह चिरडून टाकतात आणि त्यांचे तुकडे एका पेटीत भरुन त्याच्या घरासमोर असलेल्या खांबाला अडकवतात.

 

Haida totem pole funeral inmarathi

===

हे ही वाचा – चमत्कार की विज्ञान: मृत्युनंतरही सुस्थितीत राहिलेले हे १० मृतदेह पाहण्यासाठी जगभर गर्दी केली जाते

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?