' काँग्रेसच्या षडयंत्रामुळे एका रॉकेट सायंटिस्टला "देशभक्तीची किंमत" चुकवावी लागली..

काँग्रेसच्या षडयंत्रामुळे एका रॉकेट सायंटिस्टला “देशभक्तीची किंमत” चुकवावी लागली..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

साऊथचा अभिनेता आर. माधवन याने त्याच्या बहुचर्चित ‘रॉकेट्री – द नंबी इफेक्ट’ या सिनेमाची सगळेच आतुरतेने वाट बघतायत.

२०१७ च्या वर्षाअखेरीस जाहीर झालेला हा सिनेमा तब्बल ४ वर्षांनी लोकांच्या भेटीला येत आहे. माधवनने जेव्हा या सिनेमाची घोषणा केली त्यानंतर कित्येक वर्ष या सिनेमाबद्दल काहीच अपडेट्स नव्हते.

जणू एका गुन्हेगारावर आपण सिनेमा बनवतोय या अनुषंगाने माधवनवर टीकासुद्धा झाली, पण अखेर काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला गेला आणि लवकरच हा सिनेमा सिनेमगृहात प्रदर्शित केला जाईल, अशी आशा आहे.

 

rocketry inmarathi

 

हा विषय नेमका आहे तरी काय? कोण आहेत नंबी नारायण? एक हुशार वैज्ञानिक की एक देशद्रोही? याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया.

या सिनेमाचा ट्रेलर बघून आपण गोंधळात नक्कीच पडू शकतो की, आपल्या देशातल्या एका मोठ्या वैज्ञानिकावर सिनेमा बनतोय याचा आनंद साजरा करायचा की एका महान वैज्ञानिकाला कशाप्रकारे टॉर्चर करण्यात आलं याचा खेद व्यक्त करायचा.

तामीळ ब्राम्हण कुटुंबात जन्मेलेल्या नंबी नारायण यांचा हा जीवनप्रवास आणि त्यांचा हा संघर्ष उलगडणारा हा सिनेमा नेमकं काय दाखवणार आहे हे तर तो रिलीज झाल्यावरच कळेल.

नासासारख्या जगविख्यात संस्थेत काम करण्यास नकार देणाऱ्या भारताच्या खऱ्या हिरोवर जेव्हा गंभीर आणि अत्यंत खोटे असे आरोप केले जातात, खोट्या देशद्रोहाच्या केसेसमध्ये त्याला गोवायचा प्रयत्न केला जातो, तेव्हा मात्र हे प्रकर्षाने जाणवतं की आपल्या देशात राजकारण हे किती खोलवर रूजलेलं आहे.

===

हे ही वाचा अवकाशात प्रवास करणाऱ्या इस्रोच्या पहिल्या महिला रोबोट विषयी काही रंजक गोष्टी!

===

लहानपणापासूनच नंबी नारायण हे प्रचंड हुशार होते. शालेय शिक्षण घेतानाच इस्रोच्याच एका प्रख्यात वैज्ञानिकाच्या छत्रछायेत त्यांना बरंच काही शिकता आलं.

 

nambi narayan inmarathi

 

विक्रम साराभाई यांनी नंबी यांच्यातलं टॅलेंट हेरून त्यांना Ivy League College of studies मध्ये जाऊन पुढचं शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. आणि त्यानंतर त्यांना नासामध्ये फेलोशिपदेखील मिळाली.

Rocket Propulsion मध्ये मास्टर्स डिग्री मिळाल्यावर त्यांनी अमेरिकेत नोकरी करण्याऐवजी भारताला प्राधान्य देऊन, त्यांनी इस्रोमध्ये काम सुरू केलं.

भारताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या विकास इंजिनची निर्मती करणाऱ्या या वैज्ञानिकावर नंतर जे आरोप लागले ते पाहिल्यावर खरंच आपलीच आपल्याला कीव करावीशी वाटते.

अंतराळात मनुष्याला सोडण्यासाठी भारताला liquid fuel engines ची अत्यंत आवश्यकता आहे हे नंबी नारायण जाणून होते, याच संदर्भात रशियाने भारताबरोबर १९९२ मध्ये २३५ करोड रुपयांचं एक कॉंट्रॅक्ट साईन केलं!

हेच तंत्रज्ञान अमेरिका ९५० करोडमध्ये आणि फ्रांस ६५० करोड मध्ये आपल्याला देऊ पाहत होते!

 

russia america france inmarathi

 

भारताला आधुनिक तंत्रज्ञान मिळालं तर भारत अमेरिकेशी स्पर्धा करू शकतो आणि कमीत कमी दरात सॅटेलाइट अंतराळात लॉंच करू शकतो आणि अमेरिकेला ही गोष्ट ठाऊक होती.

===

हे ही वाचा विज्ञान तंत्रज्ञानातील या शोधांमुळे आज भारतही स्पर्धेत अग्रेसर ठरतोय!

===

म्हणूनच यासाठी भारताला Cryogenic Engine पासून दूर ठेवण्यासाठी अमेरिकेने हर तऱ्हेचे प्रयत्न सुरू केले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी रशियावर दबाव आणायला सुरुवात केली.

 

george bush inmarathi

 

यानंतर रशियासोबत केलेला करार रद्द झाला आणि नंबी यांनी रॉकेटसाठी Cryogenic तंत्रज्ञान भारतात तयार करण्यावर जोर दिला आणि त्यादिशेने पावलं टाकायला सुरुवात केली.

ऑक्टोबर १९९२ मध्ये तिरूअनंतपुरममध्ये मालदिवच्या मरियम रशिदा या महिलेला पोलिसांना अटक केली.

इस्रोच्या या प्रोजेक्टची काही खास ड्रॉइंग या महिलेकडे सापडली होती, आणि हे तंत्रज्ञान ती भारताच्या शत्रू राष्ट्राला म्हणजेच पाकिस्तानला विकणार आहे असा आरोप तिच्यावर केला गेला.

नंबी नारायण या Cryogenic प्रोजेक्टचे हेड असल्याकारणाने पुढच्या काही महिन्यात त्यांना अटक करण्यात आली.

तब्बल ५० दिवस त्यांना जेलमध्ये कैद केलं गेलं, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले आणि या सगळ्याची जवाबदारी इस्रोच्या टॉप वैज्ञानिकांच्या माथी मारण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला.

या सगळ्या घटनेनंतर नंबी नारायण यांच्याविरोधात रोज काही ना काहीतरी उलट सुलट छापून यायला लागलं. नासा सोबत काम करायचं सोडून भारताचं भविष्य उज्वल करू पाहणाऱ्या या महान माणसावर देशद्रोही असल्याचे बिनबुडाचे आरोप केले गेले!

 

nambi narayan arrest inmarathi

 

नंबी यांच्या घरच्यांनासुद्धा खूप त्रास दिला गेला. एका महान वैज्ञानिकाला व्हिलन करून विदेशी संस्थांनी आणि पर्यायाने भारतीय लोकांनी भारताच्या सायन्स, सुरक्षा आणि इंटेलिजेंस क्षेत्रावरच घाला घातला!

सीबीआय ने १९९६ साली काहीच पुरावे न सापडल्याने ही केस खारीज केली, तरीही ही केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि अखेर सुप्रीम कोर्टानेदेखील नंबी नारायण यांच्या बाजूनेच निकाल दिला.

तब्बल १७ वर्षांनी म्हणजेच २०१८ मध्ये अत्यंत खडतर संघर्षानंतर नंबी नारायण यांना न्याय मिळाला खरा पण आपल्या देशाच्या उज्वल भवितव्याचं अतोनात नुकसान झालं त्याचं काय?

या केसच्या निकालानंतर हे सिद्ध झालं की अमेरिकेची CIA चं नव्हे तर अशा कित्येक परदेशी संस्थांनी अशा कित्येक वैज्ञानिकांचं आयुष्य बरबाद करायचा प्लान होता. हेदेखील एक प्रकारचं युद्धच होतं जे रणांगणावर लढल्या जाणाऱ्या युद्धापेक्षा कितीतरी पटीने भयावह होतं!

या खोट्या केसमुळे भारताच्या प्रगतीत सर्वात मोठा अडथळा निर्माण झाला आणि आपण या क्षेत्रात इतर देशांच्या मागे पडलो. नंबी नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली जी Cryogenic technology १९९९ मध्येच कार्यरत होणार होती तिला तब्बल १५ वर्ष लागली.

२०१९ साली नंबी यांना सरकारने पद्म भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या देशभक्तीचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान केला, पण इतकी वर्ष त्यांनी ज्या यातना भोगल्या त्यांना ज्या मनस्तापाला, समाजात होणाऱ्या अपमानाला सामोरं जावं लागलं त्याची परतफेड यातून होणार आहे का?

 

nambi padma bhushan inmarathi

 

विक्रम सारभाई यांचा गूढ मृत्यू, इस्रोच्या वैज्ञानिकावर झालेला विषप्रयोग आणि नंबी नारायण सारख्या माणसाचं चारित्र्यहनन अशी कित्येक उदाहरणं आपल्यासमोर आहेत!

कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय एवढा मोठा सापळा रचणं कठीणच नाही तर अशक्य असतं हेदेखील तितकंच खरं आहे.

त्या वेळच्या कॉँग्रेस सरकारमधले उपराष्ट्रपती हमीद अंसारी आणि कॉँग्रेसचासुद्धा नंबी यांना फसवण्यात हात होता असंही बोललं जातं, शिवाय कॉँग्रेसच्या कार्यकाळातच सर्वात जास्त वैज्ञानिकांचा गूढ मृत्यू झाला आहे हे देखील काही reports च्या माध्यमातून लोकांसमोर आलं आहे.

 

hamid ansari inmarathi

 

यावरूनच एक गोष्ट आपल्या ध्यानात येते की कोंग्रेसच्या काळात आपल्या सायन्स डिपार्टमेंटमध्ये इतके अडथळे का निर्माण झाले? यामागचं आंतरराष्ट्रीय राजकारण जरी समजून घेतलं तरी आपल्या बुडाखालीसुद्धा बरंच काही जळत असतं यांचा अंदाज आपण नंबी नारायण यांच्या उदाहरणावरून लावू शकतो!

बाहेरच्या देशाशी स्पर्धा, आपल्या देशातलं राजकारण या सगळ्याला जवाबदार आहेतच यात तीळमात्रही शंका नाही. पण खोट्या बातम्या आणि केसेसच्या आधारावर आपल्याच लोकांची या महान वैज्ञानिकाला देशद्रोही ठरवण्याची घिसाटघाईसुद्धा नडली हे पण तितकंच सत्य आहे!

आज माधवन सारख्या संवेदनशील कलाकाराकडून या महान माणसावर सिनेमा येतोय हीच खूप अभिमानाची बाब आहे.

सिनेमा कसा असेल? त्यात काय दाखवतील? कुणाला व्हिलन करतील आणि कुणाला हीरो करतील? या सगळ्या दुय्यम गोष्टी असतील. नंबी नारायण यांच्या कार्याचा आढावा घेणारा आणि त्यांचा संघर्ष प्रत्येकापर्यंत पोहोचवणाऱ्या या सिनेमाच्या टीमला खूप खूप शुभेच्छा!

===

हे ही वाचा मोदींनी मिठी मारलेल्या इसरो प्रमुख के शिवन यांची खरी, संपूर्ण ओळख देशाला होणं आवश्यक आहे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?