' पोलिसांचं थेट संघाला पत्र – “आम्हाला तुमची मदत हवीये!”…!! – InMarathi

पोलिसांचं थेट संघाला पत्र – “आम्हाला तुमची मदत हवीये!”…!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हरिद्वारचा कुंभमेळा हा अनेकांसाठी श्रद्धेचा विषय आहे. देशभरातून भाविक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने कुंभमेळ्याला येत असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यात होणारी गर्दी आणि त्यामुळे होऊ शकणारा संभाव्य धोका या महत्त्वाच्या बाबी ठरणार आहेत.

 

haridwar kumbhmela inmarathi

 

ही गर्दी नियंत्रणात आणणं हा महत्त्वपूर्ण मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे हा विषय चर्चेचा ठरला आहे, यात नवल नाही. असं असताना याहूनही अधिक चर्चा सुरु आहे, ती उत्तराखंड पोलिसांच्या एका पत्राची. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ म्हणजेच RSS लाच उत्तराखंड पोलिसांनी यासंदर्भात एक पत्र लिहिलं आहे.

हे पत्र साधंसुधं नसून, कुंभमेळ्यातील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी या पत्रातून संघाची मदत मागितली आहे.

===

हे ही वाचा – संघ, हिंदुत्व आणि उद्याचा भारत!

===

गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी उत्तराखंडमधील पोलिसांची फौज कमी पडणार असल्याचं लक्षात आल्याने, मदतीची गरज आहे. म्हणूनच कुंभचे IG संजय गुंज्याल यांनी संघाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उत्तराखंडचे संघ संचालक आणि कार्यवाह यांना पात्र लिहून मदतीची मागणी करण्यात आली आहे.

 

ig sanjay gunjyal inmarathi

 

यासंदर्भात संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मिळणारी अधिकाधिक मदत गरजेची असल्याचं उत्तराखंड पोलिसांचं म्हणणं आहे.

या पत्रात असं म्हटलं आहे, की गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि मेळा सुरळीत पार पडावा यासाठी संघाकडून सहकार्य अपेक्षित आहे. ही अपेक्षा निश्चितपणे पूर्ण होईल आणि संघाच्या स्वयंसेवकांची मदत नक्कीच मिळेल याचा विश्वास वाटत असल्याचं सुद्धा याच पत्रात म्हटलं गेलं आहे.

१ एप्रिल पासून हरिद्वारमधील कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे, आणि यंदा केवळ १ महिन्याकरिता मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कालावधी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय मोठी नियमावली तयार करण्यात आली आहे. कोविडचा रिपोर्ट, निगेटिव्ह असल्याची आणि लसीकरण झालेले असल्याची ग्वाही दिल्याशिवाय भक्तांना मेळ्यात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

 

kumbh mela haridwar inmarathi

 

===

हे ही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, अगदी RSS सुद्धा! भारतात “इकोसिस्टिम” कुणालाच उभारता आलेली नाही!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?