' आधी गॅस, मग निवारा : उद्योगपती आनंद महिंद्रांमुळे इडली आम्माचं बळ वाढलं

आधी गॅस, मग निवारा : उद्योगपती आनंद महिंद्रांमुळे इडली आम्माचं बळ वाढलं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मागच्या काही दिवसांपासून एक रुपयाला इडली देणारी ‘अम्मा’ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. या अतिशय महागाईच्या काळात एक रुपयाला इडली सांबर चटणी देणारी ही अम्मा आम पासून खास पर्यंत सर्वाना भुरळ घालत आहे.

जास्तीचे सांबर चटणी मागितल्यावर जास्तीचे बिल लावणारे अनेक हॉटेल किंवा फूड स्टॉल आपण पाहतच असतो. अशा काळात ही अम्मा चक्क एक रुपयांना इडली विकून लोकांचे पोट भरात आहे.

 

idali ammarathi

 

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली ही अम्मा मागच्या तीस वर्षांपासून हे इडली विक्रीचे काम करत आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या अम्मा आणि त्यांच्या या कामाबाबद्दल माहिती देणारे ट्विट त्यांनी केले होते.

हे ही वाचा – १ रुपयाला एक इडली विकणाऱ्या “इडली अम्मा”च्या बिझनेसमध्ये आनंद महिद्रांना “इन्व्हेस्ट” करायचंय!

मोडक्या घरात, चुलीवर इडली बनवण्याचे काम करतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये इडली बनवून विकणाऱ्या या अम्माना उर्फ कमलाथल आजींना आनंद महिंद्रा यांनी पक्के घर देऊ केले आहे. याबद्दलची माहिती महिंद्रा यांनी ट्विट करत दिली आहे.

 

idali amma inmarathi

 

ना नफा ना तोटा या तत्वावर काम करणाऱ्या या अम्मांची माहिती दोन वर्षांपूर्वी आनंद महिंद्रा यांनी दिली होती. त्यावेळी त्यांनी या ‘इडली अम्मा’ यांना ओळख मिळवून दिली. तेव्हा त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये चुलीवर इडली बनवण्याचे काम करणाऱ्या अम्माना एल.पी.जी गॅस कनेक्शन देण्याचे सांगितले होते. त्यांच्या ट्विटननंतर कोईम्बतूर एल.पी.जी गॅसने त्यांना मोफत कनेक्शन देऊ केले होते.

अम्मांच्या या छोट्या उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या गॅस आणि जागा या दोन मूलभूत गोष्टींपैकी एक म्हणजे गॅस तर त्यांना मिळाला. दुसरा प्रश्न होता जागेचा, मात्र आनंद महिंद्रा यांनी अम्मांचा हा प्रश्न देखील सोडवला आहे.

नुकतीच महिंद्रा यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले की, “महिंद्रा समुहाने कमलाथल यांच्या व्यवसायात गुंतवणूक करणं हे योग्य ठरले आहे. उद्योगात महत्वाची प्राथमिकता घर किंवा जागा असते. अम्मा ज्या ठिकाणी इडली तयार करतात आणि लोकांना खाऊ घालतात ती जागा चांगली असावी. आम्हाला वाटत होते. म्हणूनच आमच्या महिंद्रा समूहाने त्यांच्या नावावर जमीन रजिस्टर करण्यास मदत केली आहे. महिंद्रा ग्रुपची रिअल इस्टेट आणि इतर पायाभूत सुविधा विकास शाखा असणारी ‘महिंद्रा लाइफस्पेस’ लवकरच त्यांच्या घराचे बांधकाम सुरू करणार आहे.”

गोरगरिबांना आणि हातावर पोट असणाऱ्या मजुरांना पोटभर जेवण मिळावे यासाठी त्या फक्त एक रुपयात इडली विकणाऱ्या या अम्मांच्या आता दोन्ही महत्वाच्या आणि प्रार्थमिक गरजा पूर्ण झाल्या आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?