' मोबाईलच्या चार्जिंगप्रमाणेच मेंदू थकल्यावर त्याला रिचार्ज करण्यासाठी १० झक्कास टिप्स!

मोबाईलच्या चार्जिंगप्रमाणेच मेंदू थकल्यावर त्याला रिचार्ज करण्यासाठी १० झक्कास टिप्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्याच्या काळात मोबाईलला चार्जिंग नसेल तर माणसं वेड्यासारखं वागतात, असं म्हटलं जातं. अर्थात ते खरेही आहे म्हणा. रात्रंदिवस माणसाला मोबाईल लागतो आणि कुठेही जायचं असेल तर माणूस सोबत मोबाईलचा चार्जर घेऊन जातो, की जेणेकरून मोबाईलची बॅटरी संपू नये आणि मोबाईल बंद पडू नये.

तसंच मोबाईल मध्ये जागा राहावी म्हणून नको असलेला डेटा आपण लगेच डिलीट करतो. जे ॲप्स वापरले जात नाहीत त्यांनाही डिलीट करतो.

अगदी हीच गोष्ट आपल्या शरीरालाही लागू पडते म्हणजे भूक लागल्यावर आपण खातो किंवा एखाद्या अवयवाला इजा पोहोचली तर त्यांची विशेष काळजी घेतो.

 

mobile addicts inmarathi

 

पण हीच गोष्ट आपण आपल्या मेंदूबाबत करत नाही. आपल्या या मेंदूलाही थकवा येतच असतो त्यालाही चार्जिंगची गरज असतेच. मेंदूला जर विश्रांती मिळाली नाही तर माणसाचा दिवस आळसावलेला जातो.

अनेकदा छोट्या छोट्या गोष्टीही लक्षात राहत नाही. सततच्या तणावामुळे मेंदूवर अतिरिक्त कामाचा भार पडतो. हळूहळू मेंदूचे कार्य मंदावते, शारीरिक हालचालींमध्ये फरक पडतो.

परिस्थिती खूपच वाईट झाली तर भ्रमिष्टासारखी अवस्था होते. म्हणूनच मेंदू कायम रिचार्ज रहावा म्हणून काही गोष्टी करायला हव्यात.

१. योग्य विश्रांती :

 

relaxing inmarathi

 

आपण दिवसाचे चोवीस तास काम करू शकत नाही. पण अगदी दररोज वीस तास काम करणेही श्रेयस्कर नाही. आपल्या शरीराला जितकी विश्रांतीची गरज आहे तितकीच मेंदूलाही आहे. म्हणूनच रोजची सात ते आठ तास झोप अत्यंत आवश्यक आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा मेडिटेशन करावंसं वाटतं पण “जमतच” नाही…अशांसाठी एक एक्सायटिंग पर्याय समोर आलाय!

===

या काळात मेंदू नको असलेल्या गोष्टी डिलीट करत असतो आणि ज्यांची आवश्यकता आहे त्या गोष्टी स्टोअर करून ठेवत असतो.

२. नियमित व्यायाम :

 

parineeti chopra inmarathi

 

रोजच्या विश्रांतीची जितकी आवश्यकता आपल्या मेंदूला आहे तितकीच व्यायामाची देखील आहे. दररोज व्यायाम केल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता चांगली राहते.

जे रोज व्यायाम करत असतील तर त्यांच्या नक्कीच लक्षात येईल की, बॅक बेंडींग, धावणे, जलद हालचाली केल्यावर मेंदू जास्त ॲक्टीव्ह होतो. तर फॉरवर्ड बेंडिंग केल्याने मेंदू शांत होतो.

म्हणूनच मेंदूला या सगळ्या प्रकाराच्या व्यायामाची गरज आहे. त्यामुळेच मेंदूतल्या रक्तवाहिन्या या जास्त काम करतात आणि मेंदूला सतेज ठेवतात. मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते.

 

३. पाठांतर करणे :

 

byhearting inmarathi

 

परीक्षेमध्ये पाठांतर करून घेणे एक वेळ चुकीचं असेल परंतु पाठांतराची सवय ही मेंदूसाठी अत्यंत आवश्यक आहे. हा एक मेंदूचा व्यायामच आहे.

म्हणूनच लहानपणी मुलांना पाढे पाठ करायला शिकवतात. तसंच रामरक्षा, मनाचे श्लोक, आरत्या, प्रार्थना पाठ करायला शिकवतात. मग मोठेपणी हीच सवय चालू ठेवावी ज्यामुळे मेंदूचे स्नायू बळकट होतील आणि सतत कार्यरत राहतील.

४. भविष्याबद्दल सकारात्मक रहा :

 

think positive inmararthi

 

माणसाला कायम चिंता असते ती भविष्यात काय होईल याची. पुढे काहीतरी वाईट होईल याचं टेन्शन जास्त घेतलं जातं आणि त्याचा वाईट परिणाम मेंदूवर होतो. म्हणून पुढे आपल्या आयुष्यात खूप चांगल्या घटना घडणार आहेत असा एक सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवावा.

आपण आनंदी आणि यशस्वी आहोत अशी स्वप्नं पहावीत. यामुळे मेंदू चांगल्या प्रकारे काम करतो. दिवसभर सकारात्मक राहिल्यामुळे आपली एनर्जी ही चांगली राहते आणि नवीन गोष्टी चांगल्या प्रकारे करण्याची उर्मीही तयार होते.

५. कधीतरी रूटीन मध्ये बदल करा, फिरायला जा :

 

travelling inmarathi

 

रोजचे तेच आयुष्य आणि ताणतणाव यामुळे मेंदूवर कामाचा अतिरिक्त भार पडत राहतो. म्हणूनच आपला प्रदेश सोडून नवीन ठिकाणी फिरायला जावे. ‘केल्याने देशाटन’ असं त्यासाठीच म्हटलं जातं.

===

हे ही वाचा तुमचा मेंदू आणखी तल्लख करायचा असेल तर या टीप्स वाचायलाच हव्यात!

===

मेंदूलाही नवीन गोष्टी शिकायला मिळतात. मेडिटेशन ,ध्यानधारणा , प्राणायाम दररोज केल्याने आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, तणाव कमी होतो. याचा फायदा मेंदूच्या शांततेसाठी उपयोग होतो.

 

६. पोषक आहार :

 

eating-healthy-inmarathi

 

शांत झोप, व्यायाम हा जसा आपल्या साठी आवश्यक आहे तसाच पोषक आहार देखील आपल्या संपूर्ण शरीरासाठी आवश्यक आहे. पोषक आहाराचा फायदा मेंदूलाही होतो. रात्रीचा आहार हलका ठेवावा. दररोज ४-५ भिजवलेले बदाम खावेत.

सफरचंदाचा ज्यूस यांचादेखील समावेश आहारात असल्यास त्याचा फायदा होतो विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना याचा खूप फायदा होतो. आहारामध्ये विटामिन बी घेण्याचा प्रयत्न करावा.

विटामिन b12 चीही कमतरता होऊ नये याची काळजी घ्यावी, गरज पडल्यास b12 ची सप्लीमेंट घ्यावी. यामुळे एकाग्रता वाढते, कठीण प्रसंगातही मनाचा तोल ढळत नाही.

७. आवडते छंद जोपासावेत :

 

women hobbies inmarathi

 

दिवसातून थोडावेळ तरी आपल्या आवडत्या छंदासाठी द्यावा मग तो गाणे म्हणणे, गाणे ऐकणे असेल किंवा बागकाम करणे, स्वयंपाक करणे, नवीन पदार्थ बनवणे, रंगकाम, चित्रकला अशा आपल्या आवडत्या कोणत्याही छंदाला वेळ द्यावा.

वाचन करण्याने देखील माणसाला प्रचंड शांतता मिळते. पुस्तक वाचताना माणूस आपल्या सगळ्या समस्या दूर ठेवतो आणि पुस्तकातल्या गोष्टींशी रममाण होतो ज्यामुळे मेंदूलाही विश्रांती मिळते.

८. कुटुंबाबरोबर आणि मित्रांबरोबर वेळ घालवावा :

 

Three Friends Inmarathi

 

माणसाला सगळ्यात जास्त आनंद हा आपल्या कुटुंबाबरोबर आणि मित्रांबरोबर मिळतो म्हणूनच आपला वेळ कुटुंबाबरोबर आणि मित्रांबरोबर घालवावा त्यांच्याबरोबर मारलेल्या गप्पांमध्ये, चेष्टामस्करी मध्ये सगळा तणाव नाहीसा होतो. मेंदूलाही एक प्रकारची शांतता मिळते.

९. नैसर्गिक गोष्टींच्या जास्त जवळ जा :

 

girnar trekking inmarathi

 

शहरांमध्ये आता उंच उंच इमारती, रस्ते, गाड्या, मेट्रो, लोकल या सगळ्यांच्या मुळे सतत वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण होत राहते आणि कळत नकळत याचा वाईट परिणाम माणसावर होत राहतो. म्हणूनच अधूनमधून निसर्गाच्या सहवासात जायला हवे.

मग ते ट्रेकिंग असेल किंवा वृक्षारोपण असेल या गोष्टी करायला हव्यात. तसंच आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपल्यावर देखील सतत इलेक्ट्रिक दिव्याच्या संपर्कात असतो किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या संपर्कात असतो.

त्याचा देखील वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत आहे. म्हणूनच घरात शक्यतो सूर्यप्रकाश कसा येईल हे पहावे. रात्री झोपतानाही बाहेरच्या कोणत्याही विजेच्या दिव्याचा त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी. कारण विजेच्या दिव्यांमुळे आपली झोप डिस्टर्ब होत राहते. आणि त्याचा दुष्परिणाम मेंदूवर होतो.

१०. एकाच वेळी अनेक कामे करणे टाळा :

 

multi tasking

 

जीवनात सतत पुढे जायच्या नादात सध्या मल्टिटास्किंग करणं अनिवार्य झालं आहे. पण या मल्टिटास्किंगमुळे आपल्या मेंदूवर अतिरिक्त ताणाचा भार येत आहे.

ज्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो. काय महत्वाचे आहे आणि कोणती गोष्ट तितकी महत्वाची नाही हे लवकर समजत नाही. म्हणून मल्टिटास्किंग करणे टाळा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा ‘मनुष्य हा त्याच्या मेंदूचा फक्त १०% वापर करतो’ हे सत्य आहे की भंपकपणा?

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?