' ५ वेळा नोबेल नामांकन मिळालेल्या राधाकृष्णनांनी निम्म्याहून अधिक पगार सोडला होता!

५ वेळा नोबेल नामांकन मिळालेल्या राधाकृष्णनांनी निम्म्याहून अधिक पगार सोडला होता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

शिक्षक ही आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. कोणत्याही विषयाचे फक्त पुस्तक असणे, माहिती उपलब्ध असणे आणि एखाद्या शिक्षकाने तो विषय आपल्याला शिकवणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांना फक्त शिकवत नसतो, तर तो आपल्याला उद्यासाठी घडवत असतो.

शिक्षकांच्या या कर्तृत्वाला वंदन करण्यासाठीच भारतात १९६२ पासून ५ सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा होतो हे आपल्याला माहीतच आहे. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाक्रिष्णन यांचा हा जन्मदिवस आहे.

 

radhakrishnan inmarathi

 

या दिवशी शाळेतील शिक्षकांना विद्यार्थी हे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एखादी भेटवस्तू देतात. बऱ्याच शाळांमध्ये ५ सप्टेंबर या दिवशी विद्यार्थी हे शिक्षक होतात आणि शिक्षकांना एक दिवस त्यांच्या कामातून विश्रांती देतात.

प्रत्येक शाळेमध्ये हा दिवस खूप आनंद देणारा असतो. कारण, शाळेतील सर्व प्रशासकीय कामं सुद्धा त्या दिवशी विद्यार्थीच करत असतात.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा शिक्षक, तत्वज्ञ, राष्ट्रपती, नोबेल पुरस्कारासाठी ५ वेळेस झालेलं नामांकन असा प्रवास भारतीयांसाठी गौरवशाली गोष्ट आहे. कसा होता हा प्रवास? जाणून घेऊयात.

बालपण:

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी तामिळनाडू राज्यातील तिरुतानी गावात एका तामिळ परिवारात झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अभ्यासाची खूप आवड होती.

===

===

त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण हे मद्रास च्या ख्रिश्चन कॉलेजमधून पूर्ण केलं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. सर्वपल्ली राधाक्रिष्णन यांना ‘प्रवचनकार’ होण्याची इच्छा होती.

 

dr radhakrishnan inmarathi

 

पण, चुलत भावाकडून आलेल्या पुस्तकांमुळे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. काही वर्षांनी त्यांनी स्वतः तत्वज्ञान या विषयावर पुस्तकं लिहिली.

आदर्श शिक्षक:

१९०८ मध्ये ‘एम ए फिलॉसॉफी’चं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. चेन्नई च्या प्रेसिडेन्सी कॉलेज आणि कोलकत्ता विद्यापीठात त्यांनी फिलॉसॉफी या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन केलं.

विषयावरील प्रभुत्व आणि शिकवण्याची आवड यामुळे त्यांना १९३१ मध्ये आंध्रप्रदेश विद्यापीठाचे ‘वाईस चान्सलर’ म्हणून नियुक्त करण्यात आलं.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा दिल्ली आणि बनारस विद्यापीठाच्या कर्यकारिणीमध्ये सुद्धा समावेश करण्यात आला होता.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची शिकवण्याची पद्धत इतकी सहज होती की, इतर महाविद्यालियातील विद्यार्थी सुद्धा त्यांच्या शिकवणी साठी मद्रास, म्हैसूर आणि कोलकत्ता विद्यापीठात गर्दी करायचे.

कोलकत्ता विद्यापीठात शिकवत असताना रवींद्रनाथ टागोर यांच्यासोबत त्यांची तत्वज्ञान, साहित्य या विषयांवर नेहमीच चर्चा व्हायची. या चर्चेतून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी तत्वज्ञान या विषयावर आपलं पहिलं पुस्तक लिहिलं.

५ सप्टेंबर या दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या सरांकडे मागितली होती.

डॉ. सर्वपल्ली यांनी तसं न क करता हा दिवस देशातील सर्व शिक्षक, गुरू यांचा मान ठेवण्यासाठी साजरा केला जावा अशी इच्छा व्यक्त केली.

तेव्हापासून ‘शिक्षक दिन’ साजरा होऊ लागला आणि काही वर्षांनी त्या दिवशी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार सुद्धा घोषित केला जात आहे.

 

radhakrishnan 2 inmarathi

 

१९३१ मध्ये डॉ. सर्वपल्ली यांना इंग्रज सरकारकडून ‘सर’ ही पदवी बहाल करण्यात आली. ही पदवी मिळणारे ते पहिले भारतीय आहेत.

१९३६ मध्ये डॉ. सर्वपल्ली यांना ऑक्सफोर्ड विद्यापीठातून ‘पूर्वकडील धर्म आणि नीतिमत्ता’ या विषयावर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी बोलावण्यात आले.

डॉ. सर्वपल्ली राधाक्रिष्णन यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठासाठी शिक्षक म्हणून तब्बल १६ वर्ष काम केलं.

राजकीय कारकीर्द:

१९४७ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा डॉ. सर्वपल्ली यांनी युनेस्कोच्या शिखर परिषदेत भारताचं नेतृत्व केलं. १९४९ ते १९५२ या काळात त्यांना सोव्हिएत युनियन (रशिया) साठी भारतीय राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलं.

या ३ वर्षात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारत आणि रशियाचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी खूप मोलाचं कार्य केलं होतं.

याच संबंधामुळे आणि स्टॅलिन यांच्यासोबत झालेल्या एका मीटिंग मुळे रशियाने अमेरिका आणि इंग्लंडला ‘काश्मीर’ या भारताच्या अंतर्गत प्रश्नात लक्ष घालण्यासाठी फटकारलं होतं.

१९५२ ते १९६२ या काळात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारताचे उपराष्ट्रपती म्हणून नेमण्यात आलं. १९६२ मध्ये डॉ. सर्वपल्ली यांना भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आलं.

आपल्या हुशारी सोबतच विनोदी बुद्धीमुळेसुद्धा डॉ. सर्वपल्ली हे सर्वच भारतीय आणि आंतरराष्ट्रीय राजकीय नेत्यांमध्ये लोकप्रिय होते.

 

dr sarvapalli inmarathi

 

१९६२ मध्ये जेव्हा ग्रीस चा राजा प्रथमच भारत भेटीवर आला होता तेव्हा त्यांनी राष्ट्रपती त्यांचं स्वागत करतांना डॉ. सर्वपल्ली यांनी हे विनोदी उद्गार काढले होते, “तुम्ही ग्रीस चे पहिले राजे आहात जे भारतात आले आहात, आपलं स्वागत. या आधी आलेला अलेक्झांडरला आम्ही बोलावलं नव्हतं.”

१९६२ ते १९६७ या काळात भारताचे राष्ट्रपती असतांना भारताविरुद्ध चीन आणि पाकिस्तान यांनी युद्ध पुकारलं होतं. त्याच दरम्यान पंतप्रधान पदावरील दोन व्यक्तींचं निधन झालं होतं.

भारतात शांतता टिकवण्यासाठी त्या काळात डॉ. सर्वपल्ली यांनी भारताचं केलेलं नेतृत्व हे भारताला स्थैर्य देणारं होतं.

आपल्या कार्यावर निष्ठा असलेल्या डॉ. सर्वपल्ली यांनी राष्ट्रपती असतांना आपल्या १०,००० रुपये पगारापैकी केवळ २५०० रुपये ते स्वतः घ्यायचे आणि इतर रक्कम ते प्रधानमंत्री बचाव कार्यासाठी दर महिन्यात प्रदान करायचे.

गौरव:

१९३३ ते १९३७ या पाच वर्षात दरवर्षी डॉ. सर्वपल्ली यांचं साहित्य या विभागात नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. नोबेल पुरस्कार त्यांना कधी दिलं गेलं नाही.

पण, १९५४ मध्ये डॉ. सर्वपल्ली यांना भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. १९६१ मध्ये त्यांना जर्मनीचा शांततेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

===

===

१९७५ मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जागतिक पातळीवर प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘टेम्पल्टन पुरस्कार’ आणि मानधनाने पुरस्कृत करण्यात आलं.

 

radhakrishnan 3 inmarathi

 

या पुरस्काराच्या मानधनाची पूर्ण रक्कम सरांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाला शैक्षणिक सुधारणांसाठी दिली.

१६ एप्रिल १९७५ रोजी डॉ. सर्वपल्ली यांचं चेन्नई येथे वृद्धापकाळामुळे निधन झालं.

२० व्या शतकातील विद्यार्थ्यांना धर्म आणि तत्वज्ञान या विषयावरील सर्वोत्तम शिक्षक म्हणून त्यांचं नाव जगभरात नेहमीच नावाजलं गेलं. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारखे नेतृत्व भारतात तयार होत रहावेत अशी आशा करूयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?