' इस्लामी-आक्रमणापूर्वी चक्क एका रात्रीत बांधलं गेलेलं प्राचीन मंदिर…!!! – InMarathi

इस्लामी-आक्रमणापूर्वी चक्क एका रात्रीत बांधलं गेलेलं प्राचीन मंदिर…!!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतामध्ये अनेक प्राचीन हिंदू मंदिरे अस्तित्वात आहेत. फक्त भारतातच नव्हे तर मध्य आशियातील इतरही काही देशांमध्ये सुद्धा हिंदू संस्कृतीच्या प्राचीन पाऊलखुणा आपल्याला नक्कीच बघायला मिळतील.

इंडोनेशियामध्ये तर पर्यटकांना रामायणाच्या कथांचे देखावे दाखवले जातात. पर्यटकसुद्धा आवडीने हे देखावे पाहण्यासाठी जात असतात.

 

indonesia ramayan inmarathi

 

संपूर्ण मध्य आशियात हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा सापडतात याचाच अर्थ हिंदू संस्कृती ही अत्यंत पुरातन आणि प्राचीन आहे. याचे अनेक पुरावे देखील आपल्याला बघायला मिळतात.

मध्यप्रदेशातील भोजपुर येथील शिवमंदिर हेदेखील त्यातीलच एक! ऐतिहासिक पुराव्यांवरुन असे लक्षात येते, की भारतात इस्लाम धर्माचा प्रवेश व्हायच्या आधीच भोजपुर येथील मंदिर बांधण्यात आले होते. चला तर मग जाणून घेऊयात या प्राचीन मंदिराबद्दल!

===

हे ही वाचाही ज्वाला सामान्य नाही! सम्राट अकबराची धर्मांध वृत्ती जळून खाक झाली होती हिच्यात…!

===

भारतात प्राचीन आणि पुरातन मंदिरांची कमतरता नाही. संपूर्ण भारतात अनेक प्रकारच्या बांधकाम शैलींची पुरातन आणि प्राचीन हिंदू मंदिरे आपल्याला बघायला मिळू शकतात, यातील हेमाडपंथी मंदिरे प्रसिद्ध आहेत.

 

hemadpanthi temple inmarathi

 

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळपासून केवळ ३२ किलोमीटर अंतरावर भोजपूर येथे जगप्रसिद्ध असे शिवमंदिर आहे. या मंदिराला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आला आहे.

भोजपूर येथील एका खडकाळ डोंगरावर या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. हे मंदिर भोजेश्वर मंदिर म्हणून जगविख्यात आहे.

‌या मंदिराची निर्मिती ई.स. पूर्व १०१० ते ई.स. पुर्व १०५५ दरम्यान करण्यात आलेली आहे. म्हणजेच भारतात इस्लाम धर्माचा प्रवेश होण्याआधीच या मंदिराची निर्मिती करण्यात आली होती. या मंदिराची निर्मिती परमार वंशाचे प्रसिद्ध “राजा भोज” यांनी केली होती.

मंदिरात एक विशाल आणि भव्य शिवलिंग आहे. या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे, या मंदिरातील शिवलिंग भारतात सर्वात विशाल आहे. एवढेच नाही तर हे भारतातील विशाल शिवलिंग एका अतिभव्य अशा शीलेपासून तयार करण्यात आले आहे.

 

bhojeshwar temple shivling inmarathi

 

===

हे ही वाचाजगातील एकमेव मंदिर जिथे १ कोटी शिवलिंगांची पूजा केली जाते!

===

येथील शिवलिंगाची लांबी ५.५ मीटर म्हणजेच तब्बल अठरा फूट आहे आणि उंची ३.८५ मीटर म्हणजेच तब्बल १२ फूट आहे. यावरून तुम्हाला या शिवलिंगाची भव्यता लक्षात आली असेल.

या मंदिरांची अशी आख्यायिका आहे, की हे मंदिर केवळ एका रात्रीत तयार करण्यात आले आहे. हे मंदिर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे मंदिर संपूर्ण बांधण्यात आलेलेच नाही, मंदिर अर्धवट बांधण्यात आले आहे.

या मंदिराच्या आसपासच्या दगडावर प्रस्तावित मंदिराचा नकाशा कोरण्यात आला आहे. तो नकाशा बघितल्यावर आपल्या लक्षात येते, की प्रस्तावित शिवमंदिर किती भव्य होते.

जर या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असते, तर आज भारतातील सर्वात मोठे हिंदू मंदिर म्हणून हे प्रसिद्ध झाले असते. या मंदिराचे बांधकाम अर्धवट का सोडण्यात आले याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही.

 

bhojeshwar temple inmarathi

 

या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील अप्रतिम मूर्तिकाम…!! त्या काळातील कारागिरांनी प्रचंड मेहनत घेऊन या मूर्ती घडवल्या आहेत. आजदेखील या मूर्ती बघितल्यानंतर त्यांच्या मेहनतीची कल्पना येऊ शकते.

या मंदिराचे बांधकाम देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिरात विशाल आणि भव्यदिव्य असा गाभारा आहे. या मंदिराचा दरवाजा देखील प्रचंड मोठा आहे.

या मंदिराचे बांधकाम करताना सुरुवातीला चाळीस फूट उंचीचे दगडी खांब तयार करून मंदिराला भरभक्कम आधार तयार करण्यात आला. कारण आता अस्तित्वात असलेला गाभारा केवळ या चार स्तंभांवर टिकून आहे.

 

four pillars bhojeshwar temple inmarathi

 

या ठिकाणी मध्यप्रदेशचे राज्य सरकार दरवर्षी भोजपूर महोत्सवाचे आयोजन करते. या महोत्सवाला हजारो भक्त आवर्जून हजेरी लावतात.

===

हे ही वाचा – समुद्राच्या पाण्याखाली विराजमान असलेलं अद्भुत भरतातलं अद्भुत शिव मंदिर!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?