' ‘टिपिकल मिडलक्लास’ माणसासाठी या १३ टिप्स जीवन-मरणाचा फरक ठरू शकतात! – InMarathi

‘टिपिकल मिडलक्लास’ माणसासाठी या १३ टिप्स जीवन-मरणाचा फरक ठरू शकतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“ए दिल है मुश्किल जिना यहाँ जरा हटके जरा बचके ये है बॉम्बे मेरी जान!” असं म्हणत या शहरातला प्रत्येक मध्यमवर्गीय माणूस त्याचं आयुष्य व्यतीत करत असतो.

मिडल क्लास माणसाची अवस्था वडापाव मधल्या वड्यासारखी असते. एकीकडे प्रचंड श्रीमंत आणि दुसरीकडे प्रचंड गरीब, या दोन गोष्टीत भरडला जाणारा वडा म्हणजे मिडलक्लास कॉमन मॅन!

आपल्या खिशाकडे सदैव बघत आपली स्वप्नं मारणारा कॉमनमॅन कधीच त्याच्या चाकोरीबद्ध विचाराच्या चौकटीच्या बाहेर जात नाही. खरंतर हा दबलेला पिचलेला कॉमनमॅन कित्येक सिनेमातूनसुद्धा आपल्यासमोर आला आहे!

 

common man inmarathi

 

आज या अशाच टिपिकल मध्यमवर्गीय कॉमनमॅन साठी काही महत्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत ज्या वाचल्यावर तुम्हाला हे नक्की जाणवेल की या गोष्टी मिडलक्लास माणसासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी किती महत्वाच्या असतात!

 

१) क्रेडिट कार्डचा वापर करू नये :

 

credit card inmarathi

 

मध्यमवर्गीय माणसाने क्रेडिट कार्ड वापरणे म्हणजे “आमदनी अट्ठन्नी खर्चा रुपैया” अशीच गोष्ट आहे. क्रेडिट कार्ड वापरायला काही हरकत नाही, पण तुमचा स्वतःवर कंट्रोल असेल तरच!

कारण क्रेडिट सिस्टममध्ये खरेदी करताना आत्ता पैसे भरायचे नाहीत या उद्देशाने लोकं खरेदी करतात पण नंतर जेव्हा बिल भरायची वेळ येते तेव्हा इंटरेस्ट आणि टोटल अमाऊंट बघून लोकांचे डोळे पांढरे पडतात!

===

हे ही वाचा आर्थिक संकटातून मार्ग काढायचा असेल तर गुंतवणूकीचे हे स्मार्ट उपाय एकदा तरी ट्राय करून बघा

===

त्यामुळे मिडलक्लास माणसाने क्रेडिट कार्ड शक्यतो वापरू नयेच. एकरकमी पैसे भरून किंवा इंस्टॉलमेंटवर खरेदी करावी ज्यामुळे पैसे एकदम भरायचा बहार राहणार नाही!

 

२) बचतीची तरुतद पहिलेच करावी –

 

saving money InMarathi

 

जो काही पगार हातात पडत असेल त्यापैकी ठरविक रक्कम saving म्हणून बाजूला काढून ठेवावी. नंतर वेळेला हेच बाजूला केलेले पैसे उपयोगी पडतात.

मिडलक्लास माणसाच्या एकदा हातात पगार पडला आणि त्यातून खर्च व्हायला सुरुवात झाली की ते पैसे कुठे जातात हे खरंच कळत नाही, त्यामुळे खर्चाला सुरुवात करण्याआधी बचतीची तरतूद पहिलेच करून ठेवा!

३) शेजाऱ्यांचे अनुकरण थांबवावे –

माझ्या शेजाऱ्याने ५६ इंची फ्लॅट स्क्रीन स्मार्टटीव्ही घेतला म्हणून तुम्हीसुद्धा लोन काढून तसाच टीव्ही घ्यायचा विचार करत असाल तर वेळीच थांबा. केवळ अनुकरण किंवा ट्रेंड फॉलो करणे या नादात चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च करणं टाळा!

४) मोफत टिप्स घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका –

 

share market advice inmarathi

 

शेअर मार्केट म्हणजे जुगार अशी समजूत कित्येकांची असली तरी त्यामागे प्रचंड अभ्यास आहे. त्यामुळे कसलाही अनुभव नसताना केवळ एका छोट्या मोठ्या टिप्समुळे शेअर मार्केट मध्ये पैसे टाकू नका!

तुम्हाला शेअर्समध्ये गुंतवणूक करायचीच असेल तर रीतसर त्याचा अभ्यास करा ट्रेनिंग घ्या आणि मगच त्या समुद्रात उडी मारा!

५) स्टेटस सिम्बलसाठी या गोष्टी टाळा –

 

status symbol 2 inmarathi

 

मोठी कार, मोठ्या गुंतवणुकीच्या बाता या सगळ्या गोष्टी स्टेटस सिंबोल म्हणून किंवा लोकांना स्वतःला किती माहिती आहे हे दाखवायला म्हणून करू नका. सोशल स्टेटससाठी काही  करायचं असेल तर त्या क्षेत्रातलं शिक्षण घ्या!

शिक्षण म्हणजेच नॉलेज हाच सगळ्याच पाया आहे हे ध्यानात राहू द्या!

६) सेलिब्रिटीज किंवा सोशलमीडिया स्टार्स यांना फॉलो करू नका –

 

social media stars inmarathi

 

सध्या जमाना दीखाव्याचा आहे, सोशल मीडियावर तुमचे अमुक अमुक फॉलोवर्स नसतील तर तुम्ही फेमस नाहीत अशी एक समजूत सध्याच्या जनमानसात रुजलेली आहे!

स्वस्त इंटरनेट आणि मोबाईल्सची चंगळ यामुळे सगळंच अगदी सोप्पं झाल आहे, पण जर तुम्हाला खरंच काहीतरी करून दाखवायचं असेल तर सर्वात पहिले या सेलिब्रिटीजना फॉलो करणं बंद करा!

कारण कधी कधी हे सेलिब्रिटीजसुद्धा अशा काही गोष्टी करत असतात ज्याची त्यांना स्वतःला कल्पना नसते, त्यामुळे या तात्पुरत्या ग्लॅमरपासून तुम्ही लांबच राहायला हवं!

७) गोंधळलेल्या मानसिक अवस्थेत कसलेच निर्णय घेऊ नका –

 

frustration inmarathi

 

frustration मध्ये कसलेही महत्वाचे निर्णय घेऊ नका. कारण आधीच या अशा परिस्थितीत तुमच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं असतं त्यामुळे अशावेळी घेतलेले निर्णय हे बऱ्याचदा चुकू शकतात.

आणि त्यातून तुमचाच मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते.

===

हे ही वाचा श्रीमंत सर्वांनाच व्हायचंय – पण गुंतवणूक करताना “या” गोष्टी सर्व लोक लक्षात ठेवत नाहीत!

===

८) कमावलेल्या पैशातून जुगार खेळू नका –

 

gambling 2 inmarathi

 

तुमच्या मेहनतीच्या पैशातून जुगार, लॉटरी, हॉर्स रेस, सट्टेबाजी इत्यादि गोष्टीत पैसे टाकू नका. तुम्ही कामावलेल्या पैशांची कदर तुम्हीच करायला हवी!

९) लोनचं ट्रॅकिंग ठेवा –

 

loan Inmarathi

 

तुम्ही आजवर जिथून पैसे उसने घेतले असतील किंवा कोणत्याही बँकेतून लोन घेतलं असेल त्याचं ट्रॅकिंग ठेवा. कधी लोन संपणार आहे आणि ते लवकरात लवकर कसं क्लियर करता येईल यावर तुमचा भर द्यावा!

१०) म्युच्युअल फंड किंवा तत्सम ठिकाणी गुंतवणूक करा –

 

mutual-funds-inmarathi

 

तुम्हाला शेअर मार्केटचं ज्ञान नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंड/एसआयपी अशा वेगवेगळ्या पद्धतीने पैसा गुंतवू शकता. एका चांगल्या financial advisor च्या मदतीने तुम्ही यात अगदी सुरक्षितपणे गुंतवणूक करू शकता!

यातही रिस्क आहेच पण जास्त रिटर्न्स हवे असतील तर हा धोका पत्करावाच लागेल हेदेखील तितकंच खरं आहे!

११) फॅमिली प्लॅनिंग करा –

 

family Inmarathi

 

पुढील भविष्याची तरतूद करून झाल्यानंतरच फॅमिली प्लॅनिंग करा. कारण तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचं असेल तर आर्थिक सुबत्ता खूप गरजेची आहे!

१२) लाईफस्टाइलपेक्षा करियरवर फोकस ठेवा –

आरामदयी जीवनशैलीपेक्षा तुमच्या करियरवर लक्षकेंद्रित करणं जास्त गरजेचं आहे. जर तुमचं करियर चांगलं असेल तरच तुमची लाईफस्टाईल उत्तम होईल हे लक्षात ठेवले पाहिजे!

१३) सदैव हसतमुख आणि आनंदी रहा –

 

Positivity

 

हा तर फक्त मिडलक्लास माणसांसाठी नव्हे तर प्रत्येकासाठी कानमंत्र आहे. तुम्ही सुखी समाधानी आनंदी आहात तरच हे सगळं शक्य आहे.त्यामुळे स्वस्थ रहा, मस्त जगा आणि कायम पॉझिटिव्ह रहा!

===

हे ही वाचा आर्थिक संकटातून मार्ग काढायचा असेल तर गुंतवणूकीचे हे स्मार्ट उपाय एकदा तरी ट्राय करून बघा

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?