' तेनालीरामा मालिका आठवतेय? मग त्यात लपलेली ही ५ मौल्यवान रत्नं लक्षात आहेत का? – InMarathi

तेनालीरामा मालिका आठवतेय? मग त्यात लपलेली ही ५ मौल्यवान रत्नं लक्षात आहेत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजच्या कॉर्पोरेट युगात नेतृत्व गुण सर्वात महत्वाचा समजला जातो. ज्याला आजच्या भाषेत आपण अशा नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला टी. एल. म्हणजेच टीम लीडर म्हटले जाते.

 

TENALIRAMA.7png INMARATHI

 

स्वतः काम करत असतांना अनेकांकडून काम करवून घेणं ही या टी. एल.ची महत्वाची जबाबदारी असते. आपल्या टीमचे काम चांगले असावे आणि टीमचे कौतुक व्हावे, हा प्रयत्न देखील या टी. एल. चा असतो. नेतृत्व गुण हा जसा अंगीभूत असतो तसाच तो प्रयत्न साध्य सुद्धा होतो.

प्रत्येकातच नेतृत्वगुण असतोच असे नाही. कारण नेतृत्व करणे वाटते तितके सोपे नाही. टीममधील मेंबर्सच्या चुकांची जबाबदारी देखील लीडरलाच घ्यावी लागते. त्यामुळे लीडरच्या हातात सत्ता आणि काही प्रमाणात पॉवर देखील दिसत असली, तरी नेतृत्व करणे म्हणजे एक काटेरी मुकुट डोक्यावर घेऊन फिरण्यासारखे आहे.

 

 

काही दिवसांपूर्वी टीव्हीवर तेनालीरामा ही मालिका लागायची, आता तुम्ही म्हणाल तेनालीराम आणि नेतृत्वगुण याचा काय संबंध? तर तेनालीराम मालिकेतील मुख्य नायक तेनालीराम हा देखील नेतृत्व गुणाचे उत्तम उदाहरण आहे.

अतिशय छोट्या गावातून विजयनगरमध्ये येतो आणि योगायोगाने त्याची भेट राजा कृष्णदेवरायसोबत होते. आणि तो त्यांच्या दरबारात काम करू लागतो. तिथे देखील तो उत्तम नेतृत्व करतो. मात्र अतिशय अवघड आणि कठीण समस्या सोडवताना त्याला खूप संकटाना सामोरे जावे लागायचे.

पण यातूनही तावून सुलाखून तेनालीरामने स्वतः सिद्ध केले. आजही तेनालीरामवरून विजयनगर आणि राजा कृष्णदेवराय यांना ओळखले जाते.

आजच्या कॉर्पोरेट जगात काम करणाऱ्या सर्व व्यक्ती थोड्याफार फरकाने तेनालीरामचेच प्रतिबिंब आहे. लहान मोठ्या गावातून, शहरातून येत नेतृत्व करतांना त्यांना देखील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तेनालीराममधील काही महत्वाचे नेतृत्व गुण आज आपण जाणून घेणार आहोत.

आवाज उठवणे 

नेतृत्वगुणात तुमचा आवाज हा तुमची सर्वात मोठी ताकद आहे. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही सतत ओरडले पाहिजे. तुम्ही तुमची मते ही ठामपणे आणि स्पष्ट शब्दांत सर्वांसमोर मांडलीच पाहिजेत.

तेनालीराम सुरुवातीला कधीच स्वतःचा प्रतिकार करू शकला नाही. अनेकदा त्याला घडणाऱ्या घटना समजून घ्यायला बराच वेळ लागायचा. दोनदा मृत्यूची शिक्षा ठोठावल्यानंतर त्याला बोलण्याची आणि आपली बाजू मांडण्याची किंमत लक्षात आली.

 

TENALIRAMA.4png INMARATHI

 

मित्रपक्ष तयार करणे 

जेव्हा तुम्ही तुमची मते मांडायला सुरुवात करता तेव्हा तुमची मते आणि तुमचे बोलणे अनेक शत्रू तयार करतात. यामुळे अनेकजण तुमच्याशी स्पर्धा करायला सुरुवात करतात. स्पर्धा हेल्दी असणे आवश्यक असते.

तेनालीरामला त्याला त्याचे आसन आणि जीव वाचवण्यासाठी नेहमी सतर्क राहावे लागायचे.

 

TENALIRAMA INMARATHI

 

नजरेतला बदल 

नेतृत्व करणाऱ्याला असे वाटत असते, की त्याची टीम त्याच्या नजरेतूनच जग बघते, पण तो हा विचार करत नाही की, त्यांना त्यांच्या नजरेतून जे दिसणार तेच ते बघणार.

कृष्णदेवराय धर्माचा खूप आदर करत. ते त्यांच्या राजगुरूंचा देखील खूप आदर करायचे, त्यांना देव मानायचे. तेनालीरामाने राजगुरूंवर अनेक आरोप करत स्वतःला मृत्यूच्या दारात उभे केले होते, नंतर तेनालीरामा यांना जाणवले की काहीही झाले तरी त्यांना राजगुरूंसोबतच राहावे लागणार आहे.

 

TENALIRAMA.5png INMARATHI

 

दबाव नियोजन 

लीडरने त्याच्यावर येणाऱ्या प्रेशरचे नियोजन करत त्या दबावाखाली काम करण्यास शिकले पाहिजे. हा दबाव म्हणजे तुमचे शोषण नसून तो एकप्रकारे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी असतो.

तेनालीरामला देखील अनेकदा या दबावाखाली काम करावे लागले. अनेकदा त्याला एका विशिष्ट काळात त्याचे काम पूर्ण करावी लागत, नाहीतर त्याला जीवे मारण्याची शिक्षा सुद्धा ठोठावण्यात यायची.

 

TENALIRAMA.3pngINMARATHI

 

वेगळा आणि समांतर मार्ग 

कधी कधी फक्त समस्या सोडवणे पुरेसे नसते. काही समस्या ह्या टीमच्या संदर्भात देखील असतात. अशा वेळी लीडरला आपल्या टीममधल्या कोणालाही न दुखवता आणि आपल्या टीममधील स्थानाला धक्का न लागू देता समस्या सोडवणे आवश्यक आहे.

तेनालीराम नेहमीच समस्यांना काही वेगळे आणि समांतर उपाय शोधून काढायचा. उदाहरणार्थ एकदा कृष्णदेवरायच्या आईंची शेवटची इच्छा होती की त्यांना आंबे खायचे, मात्र त्यांची ही इच्छा अपूर्ण राहली.

यावर राजगुरूंनी राजाला सांगितले की, तुम्ही सोन्याचे आंबे दान करा, जेणेकरून आईची इच्छा पूर्ण होईल आणि त्या स्वर्गात देखील जातील. यावर तेनालीराम म्हणाला, माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की, जे कोणी सोन्याचे आंबे घेतील त्यांना मारा.

 

TENALIRAMA.6pngINMARATHI

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?