' तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण पूर्वी कॉंग्रेस पक्षाचं चिन्ह ‘वेगळं’ होतं! – InMarathi

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण पूर्वी कॉंग्रेस पक्षाचं चिन्ह ‘वेगळं’ होतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतातील सर्वाधिक काल सत्तेवर राहणारा पक्ष म्हणजे कॉंग्रेस! १८८५ सालापासून आजवर अविरत राजकारणाच्या रणांगणात आपले अस्तित्व अबाधित राखून असलेल्या या पक्षाने देखील आपल्या कारकिर्दीत अनेक लक्षणीय बदल अनुभवले.

त्यापैकी एक बदल म्हणजे पक्षाच्या चिन्हाचा होय.

congress-oxen-marathipizza
prathamparekh.wordpress.com

दोन बैल आणि त्यांच्यावर असलेला जू (बैलांच्या मानेवर असणारे लाकूड) हे १९६९ सालापूर्वी कॉंग्रेस पक्षाचे चिन्ह होते. हे चिन्ह यासाठी निवडण्यात आले होते कारण हे चिन्ह म्हणजे पक्ष कार्यकर्त्यांच्या कठोर मेहनतीचे प्रतिक होते. त्यानंतरच्या काळात इंदिरा गांधी आणि इतर कॉंग्रेस नेत्यांमध्ये फुट पडल्याने इंदिरा गांधी यांनी नवीन कॉंग्रेस पक्ष स्थापन केला.

दोन बैल आणि त्यांच्यावर असलेला जू हे चिन्ह एव्हाना मूळ कॉंग्रेसशी अगदी घट्ट जोडले होते. लोकांच्या मनात देखील त्या चिन्हाची प्रतिमा ठसठशीत बसली होती. म्हणून इंदिरा गांधी यांनी आपल्या नवीन पक्षासाठी देखील मूळ कॉंग्रेस पक्षाचे दोन बैल आणि त्यांच्यावर असलेला जू हे चिन्ह वापरायचे ठरवले, पण मूळ कॉंग्रेस पक्षातील नेत्यांनी इंदिरा गांधी यांच्या या गोष्टीला विरोध केला. त्यांची भूमिका अशी होती की,

मूळ कॉंग्रेसमध्ये काम करत आम्ही भारतीय स्वातंत्र्यासाठी मेहनत घेतली आहे, म्हणून या चिन्हावर आमचा जास्त हक्क आहे.

Congress Election Poster - 1952marathipizza
carvaka4india.com

शेवटी नाईलाजाने इंदिरा गांधी यांनी आपल्या नवीन कॉंग्रेस पक्षाच्या नवीन चिन्हाला मान्यता दिली. हे चिन्ह गाय आणि वासराचे होते. इंदिरा गांधी यांनी या चिन्हाच्या आधारावर स्वत:ची देशहितकर्ती नेता म्हणून प्रतिमा उभी केली आणि गो संरक्षण आपल्या प्रचाराचा मुद्द बनवून मतदारांना आकर्षित केले.

indira_cow_calf_symbol-marathipizza
arpansarangiquizblog.wordpress.com

पण १९७७ साली इंदिरा गांधी यांचे नशीब पालटले. देशात आणीबाणी लागू करण्यात आली. इंदिरा गांधींचा कॉंग्रेस पक्ष केंद्रातील आपली सत्ता गमावून बसला. विरोधकांनी या पडत्या काळात कॉंग्रेसच्या गाय आणि वासराच्या चिन्हाला विनोदाचे स्वरूप दिले, काहींनी अशी ही टिप्पणी केली होती की,

गाय म्हणजे इंदिरा गांधी आहेत आणि वासरू म्हणजे संजय गांधी!

दरम्यान पुन्हा एकदा पक्षाचे दोन गट पडले. एक गट इंदिरा गांधींसोबत उभा राहिला तर दुसरा त्यांच्या विरोधात! मग निवडणूक आयोगाने देखील येऊ घातलेल्या निवडणुकांसाठी इंदिरा गांधींनी ठरवलेले गाय आणि वासराचे चिन्ह रद्द केले आणि नवीन चिन्ह निवडण्यास सांगितले.

नवीन निवडणूक चिन्ह निवडताना इंदिरा गांधी यांच्या सोबत घडलेला एक किस्सा ऐकण्यास मिळतो. जेव्हा इंदिरा गांधी पी.व्हि. नरसिंहा राव यांच्या सोबत आंध्रप्रदेश मध्ये होत्या, तेव्हा बुट्टा सिंग हे इंदिरा गांधी यांच्या कॉंग्रेस पक्षासाठी कोणते नवीन चिन्ह निवडले जाऊ शकते या बद्दल चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले. इथे निवडणूक आयोगाने त्यांना सायकल, हत्ती किंवा हात या तीनपैकी एक चिन्ह पक्षासाठी निवडण्यास सांगितले. गोंधळलेल्या बुट्टा सिंग यांनी अंतिम निर्णय घ्यावा म्हणून इंदिरा गांधींना फोन लावला आणि त्यांच्या अस्सल पंजाबी भाषे मध्ये विचारले,

हाथ ठीक रहेगा?

त्यांनी “हाथ ठीक” या शब्दांवर सवयी प्रमाणे जास्त जोर दिल्याने इंदिरा गांधींना वाटले की बुट्टा सिंग विचारात आहेत, “हत्ती चिन्ह चालेल का? आणि इंदिरा गांधींनी लगेच त्यांना उत्तर दिले,

नही, ‘हाथ’ का सिम्बॉल लीजिये

इंदिरा गांधी यांच्या उत्तराने बुट्टा सिंग पुन्हा गोंधळले आणि म्हणाले,

हा, हाथ ही

पुन्हा एकदा “हाथ ही” या शब्दांवर बुट्टा सिंग यांनी सवयी प्रमाणे जास्त जोर दिल्याने इंदिरा गांधींचा पुन्हा गैरसमज झाला. त्यांना पुन्हा “हाथी (हत्ती) ऐकू आले.

वैतागलेल्या इंदिरा गांधीं यांनी मग रिसीव्हर पी.व्हि. नरसिंहा राव यांच्याकड़े सुपुर्द केला अणि त्यांनी बुट्टा सिंग यांना विचारले की,

पंजा मिळू शकेल का? (पंजाबी मध्ये हात म्हणजे पंजा)

आणि अश्या प्रकारे “हात” या चिन्हाला कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत चिन्ह म्हणून मान्यता मिळाली.

Flag_of_the_Indian_National_Congress-marathipizza
en.wikipedia.org

हे देखील वाचा: (राजकीय पक्षांना एक सारखीच निवडणूक चिन्ह कशी मिळतात?!)

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?