' चक्क डॉक्टरच 'हा' विचित्र सल्ला लोकांना द्यायचे आणि त्याची जाहिरातही व्हायची!

चक्क डॉक्टरच ‘हा’ विचित्र सल्ला लोकांना द्यायचे आणि त्याची जाहिरातही व्हायची!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

धुम्रपान आरोग्याला हानीकारक असतं, याच्यातलं निकोटिन शरीरावर घातक परिणाम करतं आणि फुफुसाच्या कर्करोगासारख्या आजारांना आमंत्रण मिळतं हे आता शाळकरी मुलांनाही पाठ आहे.

मात्र एक कालखंड असा होता जेंव्हा सिगरेट ओढणं आरोग्यासाठी हानीकारक आहे कोणाच्या ग्वाही तर नव्हतं शिवाय ही इतर सामान्य खाण्यापिण्याच्या पदार्थासारखीच गोष्ट मानली जात असे.

इतकंच नाही तर आरोग्यासाठी सिगरेट ओढणं चांगलं मानलं जायचं. स्वत: डॉक्टर्सच याची जाहिरात करायचे हे वाचून तर तुम्हाला आणखीनच धक्का बसला असेल.

 

cigerrate inmarathi

 

मात्र हा कालखंड तो आहे जेंव्हा सिगरेट ओढण्याबाबत संशोधनाला, अभ्यासाला सुरवातही झालेली नव्हती. याच्या घातक परिणामांची यादी समोर आली नव्हती.

 तो काळ बघता त्यावेळेस एकूणच हवेत प्रदुषणाचं प्रमाण नगण्य होतं. वाहनं आजच्यासारखी बेसुमार नव्हती त्यामुळे चोवीस तास धूर ओकणारे रस्ते नव्हते. सामान्य माणूस तंबाखूचं सेवनही मर्यादेत करायचा कारण तिची उपलब्धताच मर्यादित होती.

मात्र महायुध्दानं सगळं चित्र पालटवून टाकलं. सतर्क रहाण्याच्या गरजेतून तंबाखूचे रोल फुंकण्याची पध्दत सुरू झाली आणि एका देशाच्या सैन्य पलटणीतून दुसर्‍या देशाच्या सैन्य पलटणीकडे वेगानं पसरली. यानंतर सिगरेटची सवय सर्वसामान्यांपर्यंतही पोहोचली. ते व्यसन आजही पूर्णपणे गेलेलं नाही.

हा झाला गरज म्हणून तंबाखू सेवनाचा भाग पण युध्द संपल्यावरही उत्पादन चालूच राहिलं आणि ही उत्पादनं खपविण्यासाठी मग सिगरेटला ग्लॅमर देण्याचे उद्योग चालू झाले.

सिगरेट कंपन्या आपल्या जाहिरातींमधे महिला मॉडेल्सना घेऊ लागल्या. या महिला केवळ धुम्रपान करणार्‍या पुरूषाच्या बाजूला उभ्या रहात नव्हत्या तर त्या स्वत: धुराची वलयं हवेत सोडत होत्या.

===

हे ही वाचा धूम्रपान सोडायचंय, पण जमत नाहीये? या ८ गोष्टी तुम्हाला नक्की फायद्याच्या ठरतील

===

अशा प्रकारे हवेत धूर सोडणार्‍या महिला या आधुनिक विचारांचं, स्वातंत्र्याचं, आधुनिकतेचं प्रतिक बनल्या. अर्थातच समाजातील अनेक सुधारणावादी आधुनिक महिलांनी याचं ताबडतोब अनुकरण चालू केलं.

 

cigerrate 2 inmarathi

 

स्त्री आणि पुरूषात धुम्रपानाचं प्रमाण इतकं वाढलं की, १९५३ पर्यंत एक अमेरिकन व्यक्ती दिवसाकाठी किमान दहा आणि स्कॉटिश व्यक्ती दिवसाकाठी वीस सिगरेट ओढू लागली.

या कालखंडात फुफ्फुसांच्या कर्करोगात वाढ होऊ लागली होती मात्र सिगरेटवर कोणीही संशय घेत नव्हतं. याचं कारण म्हणजे कितीही झालं तरिही ते एक नैसर्गिक उत्पादन होतं.

डॉ. ग्राहम यांचे सहाय्यक म्हणून काम करणार्‍या अर्न्स्ट विंडर यांनी १९४८ मधे एका ४२ वर्षीय मृत व्यक्तीचं पोस्ट मार्टेम केलं. ही व्यक्ती मोठ्या प्रमाणात धुम्रपान करत असे. या पोस्टमार्टेम दरम्यान त्यांच्या लक्षात आलं की, फुफ्फुसांचा रंग काळवंडला आहे.

 

lungs inmarathi

 

त्यांनी ग्राहम यांना सांगितलं की सिगरेटमुळे हा रंग बदलला आहे का? याबाबत मला अधिक संशोधन करायचे आहे. ग्राहम स्वत: सिगरेटचे शौकीन असल्यानं त्यांनी अर्थातच ही कल्पना मोडीत काढली. मात्र विंडर आपल्या मागणीवर ठाम राहिले.

अखेरीस ग्राहम यांनी परवानगी दिली आणि ती देताना मनातल्या मनात त्यांना खात्री होती की एक दिवस आपला फसलेला शोध प्रबंध घेऊन विंडर समोर उभे रहातील.

यानंतर विंडर यांनी अनेक रुग्णांच्या मुलाखती घेऊन आपले निष्कर्ष एका कॉन्फरन्समध्ये मांडले. इथेही त्यांच्यावर कोणीही विश्र्वास ठेवला नाही.

याचं कारण म्हणजे त्या काळात जवळपास सगळेच डॉक्टर धुम्रपान करत असत आणि विंडरसारख्या विद्यार्थ्याचं मत प्रॅक्टिस करणारे डॉक्टर का विचारात घेतील?

याच काळात लंडनमधील डॉ. रिचर्ड डॉल आणि ब्रॅडफोर्ड यांनी एक उपक्रम हाती घेतला होता. डॉक्टरांचाच एक डेटाबेस बनविण्याचा उपक्रम. त्यांनी शासनालाच त्यांच्या फॉर्ममधे दोन गोष्टींचा समावेश करण्याची विनंती केली.

 

richard doll inmarathi

 

एक म्हणजे डॉक्टरांच्या बायोडेटात ते धुम्रपान करायचे का हा प्रश्न विचारणे आणि मृत्यूचं कारण लिहिणे. या डेटामधे इंग्लंडच्या प्रत्येक डॉक्टरचा समावेश केला गेला होता.

चार वर्षात चाळीस हजार डॉक्टरांचा बायोडेटा पाहिल्यावर असं लक्षात आलं की, दोनशेहून अधिक डॉक्टरांचा मृत्यू धुम्रपानामुळे फुफ्फुसाला झालेल्या कर्करोगानं झाला होता. स्वत: डॉ.डॉल धुम्रपान करत असत मात्र या संशोधना दरम्यान त्यांनी ही सवय ताबडतोब सोडली.

इकडे डॉ. विंडरनिही हार पत्करली नव्हतीच. त्यांनी आता सिगरेटची राख उंदरांच्या त्वचेवर लावून संशोधन करण्यास सुरवात केली. या निरिक्षणात असं आढळलं की ४४ टक्के उंदीर त्वचेच्या कॅन्सरने ग्रस्त झाले.

एकुणच आता सिगरेटचे दुष्परिणाम हा जगभरात कुतुहलाचा, अभ्यासाचा आणि चर्चेचा विषय बनला. एव्हाना सिगरेट कंपन्या लाखो करोडो गुंतवून उत्पादन करू लागल्या होत्या. आपला व्यवसाय बंद पडणं त्यांना परवडणारं नव्हतं.

===

हे ही वाचा सिगरेटची सवय मोडण्यासाठी ‘ह्या’ माणसाने केलेला अभूतपूर्व ‘प्रयोग’ पाहून तुम्ही अवाक व्हाल!!

===

त्यांनी मार्केटिंगचा नवा फंडा शोधला. लोकांचा विश्र्वास बसावा आणि त्यांनी सिगरेट ओढणं किंवा तंबाखू सेवन बंद करू नये म्हणून थेट डॉक्टर मंडळीनांच हाताशी धरलं. सिगरेट ओढणं आरोग्याला हानीकारक तर नाहीच उलट ते तब्येतीसाठी चांगलंच असतं हा समज रूजवायला सुरवात केली.

 

smoking ads inmarathi

 

अर्थातच हा नकली आणि अकृत्रिम वाद फार काळ टिकला नाही आणि डॉक्टर्सनाच धुम्रपान आणि कर्करोग यांचा संबंध मान्य करावाच लागला. तो मान्य झाल्यावर सिगरेट ओढण्यावरही काही बंधनं आणली गेली.

विचित्र योगायोग असा की ज्या ग्राहमनी सिगरेट ओढणं आणि कर्करोग यांचा संबंध असल्याच्या शक्यतेची टर उडवली होती त्यांचा मृत्यू फुफ्फुसांच्याच कर्करोगानं झाला.

===

हे ही वाचा स्मोकिंग न करताही फुफुसांच्या कॅन्सरचं वाढतं प्रमाण, याची नेमकी कारणं…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?