' प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा आयफेल टॉवर भलत्याच कारणांसाठी बांधलाय! – InMarathi

प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा आयफेल टॉवर भलत्याच कारणांसाठी बांधलाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या देशात प्रेमाचं प्रतीक म्हणून फक्त एकच वास्तूकडे बघितली जाते ती म्हणजे ताजमहाल. आजही अनेक वर्ष ही वास्तू दिमाखात उभी आहे. शहाजहानने आपल्या बायकोसाठी बांधलेल्या या वास्तूला देशभरातून तसेच जगभरातून अनेक पर्यटक, जोडपी भेट देत असतात.

वास्तुकलेचा एक उत्तम नमुना म्हणून त्याकडे आजही पहिले जाते. ताजमहालाची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न देखील आपल्याकडे केला आहे, पण ताजमहालची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही.

 

tajmahal InMarathi

हे ही वाचा – UnseenMumbai : सागरी प्रवेशद्वाराला जन्म देणाऱ्या, अजूनही मुंबईतच असलेल्या वास्तूची कहाणी

जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणजे आयफेल टॉवर. जगातील अनेक जोडपी इथे येऊन आपले प्रेम व्यक्त करतात. प्रियकर आपल्या प्रेयसीला तिथे घेऊन येतो व तिला आयफेल टॉवरच्या खाली प्रपोज करतो. असे म्हंटले जाते हजारो लग्न या वास्तूच्या परिसरात ठरल्याने या वास्तुला प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

जगात सातवं आश्चर्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वास्तूंमागे इतिहास आहे, तसाच इतिहास या वस्तुमागे सुद्धा आहे. जरी ही वास्तू प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखली जात असली तरी ही वस्तू बांधण्यामागचे कारण वेगळे आहे.

 

आयफेल टॉवर :

 

tower 3 inmarathi

 

जगभरातील सर्वात उंच वास्तू म्हणून आयफेल टॉवरची गणना होते. स्थापत्यशास्त्रातील एक चमत्कार म्हणून याकडे पहिले जाते. या एका वास्तुमुळे फ्रान्स एक पर्यटनस्थळ म्हणून देखील उदयास आले. टॉवरमधील तीनच मजले हे पर्यटनासाठी खुले असतात. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर रेस्टॉरंट ही उपलब्ध आहेत.

शेवटच्या मजल्यावर जाण्यासाठी फक्त यूरोप युनियनच्या सदस्यांना परवानगी आहे त्याचे वेगळे तिकीट देखील आहे.

 

आयफेल टॉवर बांधण्याचे खरे कारण :

फ्रेंच राज्यक्रांती आपण सगळ्यांनीच शाळेत शिकली आहे. फ्रेंच राज्यक्रांतीने इतर यूरोपीय देशांमध्ये सुद्धा बदल घडवून आणले. याच घटनेला १०० वर्ष पूर्ण झाल्याने अभिवादन म्हणून तिकडच्या स्थानिकांनी एक वस्तू उभारण्याचा घाट घातला.

 

french inmarathi

 

अनेक इंजिनियर, डिझायनर्स यांनी आपापल्या ल्पना तिकडच्या स्थानिकांसमोर मांडल्या पण त्यातली कल्पना कोणालाच आवडेना, शेवटी आयफेल नावाच्या व्यक्तीचे डिजाईन सिलेक्ट झाले. त्याचेच नाव पुढे या वास्तूला दिले. परंतु त्याच्या डिजाईनलाही काहींनी विरोध केला होता.

एकीकडे हे कारण जरी असले तरी दुसरीकडे त्याकाळात हवेचा दाब, रेडिओ ट्रान्समिशन साठी एखाद्या टॉवरची गरज होती, म्हणून सुद्धा या टॉवरची बांधणी केली होती. तसेच काही काळासाठीच तो बांधण्यात येणार होता. त्यानंतर तो पाडण्यात येणार होता पण मात्र ते राहिले आणि तीच वास्तू जगातील ७ आश्चर्यांमध्ये गणली जाऊ लागली.

आयफेल टॉवरचे बांधकाम व डिजाईन :

आज इतकी वर्ष दिमाखात उभी असणारी ही वस्तू जिच्या मागे कित्येक  इंजिनियर, कामगार यांचे श्रम होते. आयफेल यांची नुसती संकल्पना होती. त्या संकल्पनेला आकार देण्यासाठी त्यांचा सहकारी मॉरिस कोचलीन हा कामी आला, तो स्थापत्यशास्त्रज्ञ होता.

 

tower 2 inmarathi

 

१८,००० पडल लोखंडाचे तुकडे, २ दशलक्ष रिव्हेटस अशी अवाढव्य सामग्री वापरण्यात आली सोबतीला ५०० कामगार सलग दोन वर्ष काम करत होते.

१८८७ साली सुरु झालेले हे काम १८८९ साली संपले. दोन वर्ष काम चालू असलेल्या या वास्तूची उंची दहा हजार फूट एवढी झाली. जगातील सर्वात उंच इमारत उभी राहिली.

सुरवातीला काम पूर्ण झाल्यावर पॅरिसमधील अनेक लोकांनी या वास्तूला विरोध केला होता. वास्तू  पूर्ण होऊन सुद्धा ती पसंतीस पडत नव्हती. ही वास्तू शहराच्या संरचनेत चुकीची आहे, डोळ्यात न भरणारी वास्तू म्हणून हिणवले  जात होते.

 

पर्यटन केंद्र :

 

 

आज जगातील पर्यटनाला जरी खिळ बसली असली तरी आयफेल टॉवरचे आकर्षण कमी झालेले नाही. जगभरातून जवळपास  २५० मिलियन इतक्या लोकांनी या वास्तूला भेट दिली आहे. तसेच संध्याकाळच्या वेळी विशेष विद्युत रोषणाई केली जाते.

आज जवळजवळ १३० वर्ष या वास्तूला होऊन सुद्धा आज मोठ्या दिमाखात उभी आहे. अनेक प्रेमीयुगलांसाठीचे हक्काचे ठिकाण बनले आहे.

आपल्याकडेदेखील अशा अनेक वस्तू बांधण्यात आल्या आहेत. इंग्लंडच्या प्रिन्स चाल्र्सचा स्वागतासाठी बांधलेले प्रवेशद्वार (gate way of india ) आज एक पर्यटनस्थळ म्हणून ओळखली जात आहे .काहींची  स्थिती आज अत्यंत दयनीय आहे तर काही वास्तू तर काळानुसार नष्ट  होत गेल्या आहेत.

एखादी वास्तू विशिष्ट कारणासाठी बांधली जाते, मात्र काळानुसार ती वास्तू ओळ्खण्यामागचे मागचे कारण देखील बदलून जात.

===

हे ही वाचा – ह्या ९ जगप्रसिद्द वास्तूंमधील गुप्त गोष्टी लोकांना कळू दिल्या जात नाहीत!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?