' हाडांच्या व्याधी सोडवणारा, प्रसादाऐवजी औषध देणारा ‘ऑर्थोपेडिक हनुमानाचा’ चमत्कार – InMarathi

हाडांच्या व्याधी सोडवणारा, प्रसादाऐवजी औषध देणारा ‘ऑर्थोपेडिक हनुमानाचा’ चमत्कार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“चमत्काराशिवाय नमस्कार नाही” हे आपण नेहमीच म्हणत असतो. कोणत्या देवाच्या मंदिरात जावं? देवाला नमस्कार का करावा? याबद्दल प्रत्येकाचं वेगळं मत असू शकतं. पण, धार्मिक संस्थांनांकडे जमा झालेला निधी हा लोक कल्याणसाठी वापरण्यात यावा याबद्दल मात्र आपल्या सर्वांचं नेहमीच एकमत असतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

लोकांना देवाची आठवण त्यावेळी जास्त होते जेव्हा लोक एखाद्या नैसर्गिक आपत्ती किंवा शारीरिक व्याधीने त्यांना ग्रासलेलं असतं.

लोकांना देवाचा किंवा धार्मिक संस्थानांचा तेव्हा आधार वाटेल जेव्हा यापैकी कोणत्याही परिस्थितीत त्यांना एक तर संस्थानांकडून आर्थिक मदत मिळेल किंवा देवाच्या कृपेची त्यांना प्रचिती येईल.

 

temples inmarathi

 

देवाचा चमत्कार वगैरे आजच्या ‘स्मार्ट’ काळात कोणालाच मान्य होणार नाही.

पण, मध्यप्रदेश मधील कटनी जिल्ह्यात एक असं हनुमान मंदिर आहे ज्याने लोकांना नेहमीच एक नवीन अनुभुती चा प्रसाद दिला आहे. दर मंगळवारी आणि शनिवारी या मंदिरात हनुमानाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा बघायला मिळत असतात.

काय आहे चमत्कार?

कटनी जिल्ह्यापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘मोहास’ या गावात हे जागृत हनुमान मंदिर स्थित आहे. तुमच्या शरीरात कोणतंही हाडांचं दुखणं या हनुमान मंदिराचं दर्शन घेतलं की नाहीसं होतं अशी सर्व भक्तांची मान्यता आहे.

तुमचं हाड मोडलं असेल तर त्या जागी नवीन हाड सुद्धा या हनुमानाच्या दर्शनाने येतं असा कित्येक लोकांना अनुभव आलेला आहे.

===

हे ही वाचा गुजरातच्या एका मंदिरात होतीये चक्क व्हेल माश्याच्या सांगाड्याची पूजा! वाचा या मागची प्राचीन आख्यायिका!

===

‘मोहास’ गावात या हनुमान मंदिराला एखाद्या हाडांचा दवाखाना प्रमाणेच मानलं जातं. वैद्यक शाखेतील लोकांनी “ही सर्व अंधश्रद्धा आहे” हेच वारंवार म्हंटलं आहे. पण, ज्या लोकांना प्रत्यक्ष अनुभव आला आहे त्यांचा या हनुमान मंदिरावर आणि बजरंगबलीवर प्रचंड विश्वास आहे.

 

hanuman mandir inmarathi

 

हनुमानाची कृपा होण्यासाठी केवळ आशीर्वादच नाही तर तुमच्या हाडांसाठी उपयुक्त असं एक औषध सुद्धा इथे दिलं जातं. मंदिराचं दर्शन घेतल्यावर जो प्रसाद दिला जातो त्या ऐवजी या मंदिरात तुमच्या हाडांच्या बळकटी साठी औषध दिलं जातं.

हाडांच्या बळकटीसाठी दिलं जाणारं हे औषध म्हणजे एक आयुर्वेदिक औषध आहे. कमालीची गोष्ट म्हणजे हेच औषध इतर मेडिकलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे.

कोणताही रुग्ण ते औषध विकत घेऊन त्याचं सेवन करू शकतो. पण, तुम्ही स्वतः हे औषध विकत घेतलं तर त्याचा काहीच उपयोग होत नाही असंच कित्येक लोकांनी अनुभवलं आहे.

तेच औषध तुम्ही मंदिरात घेऊन जा आणि तिथल्या लोकांकडून घ्या तुमच्या हाडांचं दुखणं लगेच पळून जाईल. या चमत्कारामुळेच कटनी जिल्ह्यात आलेले सर्व पर्यटक हे उत्सुकतेपोटी का होईना. पण या मंदिराला नक्की भेट देत असतात.

हनुमान मंदिरातील हे औषध लोकांना देण्यासाठी एक विशिष्ट पद्धत अवलंबली जाते. ‘सीता राम’ मंत्राचा जप आधी करायला सांगितला जातो. त्यानंतर भाविकाला आरती करण्याची संधी दिली जाते.

भाविकांना डोळे बंद करून बसण्यासाठी सांगितलं जातं. औषधाचा स्पर्श करण्याची कोणालाही परवानगी इथे नाहीये. औषध न दिसता तुमच्या नकळत हे औषध तुम्हाला पाजलं जातं. थोडा वेळ तिथे थांबवलं जातं आणि तुमच्या शरीरात औषधांचा परिणाम सुरू होतो असा लोकांचा अनुभव आहे.

===

हे ही वाचा शिवलिंगाची पूजा माहीत आहेच – पण आसाम मधल्या मंदिरात आजही ‘योनीची’ पूजा होते!

===

 

hanuman inmarathi

 

मंदिराच्या स्थापनेपासून आजपर्यंत एकही रुग्ण इथून रिकाम्या हाती परतलेला नाहीये असा लोकांचा अनुभव आहे. हनुमान मंदिरात कित्येक जण स्ट्रेचरवर येतात आणि पायी चालत परत जातात असं सुद्धा सांगण्यात आलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व उपचारासाठी हनुमान मंदिर प्रशासनाकडून कुठलेही शुल्क आकारले जात नाही.

तब्येतीमध्ये फरक पडलेले भक्त हे स्वतःच्या इच्छेनुसार मंदिरातील हुंडी मध्ये पैसे टाकत असतात. तुमच्या हाडांवर तेल लावण्यासाठी मंदिराच्या बाहेरच एक मसाज तेल सुद्धा अगदी कमी किमतीत विकत दिलं जातं.

‘पंडा सर्मन पटेल’ हे या मंदिराचे विश्वस्त आहेत जे की मागच्या ४० वर्षांपासून लोकांना हे औषध देत आहेत. एका विशिष्ट झाडांचे पत्ते आणि मूळ हे या औषधीचं स्वरुप आहे. लहान वयापासून अगदी वय वर्ष ७५ पर्यंतच्या लोकांना हनुमान मंदिराच्या प्रसादाची अनुभूती आली आहे.

नुकतंच ‘आयुष’ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने भेट देऊन या कामाची पाहणी केली आहे. इथे कोणतीही फसवणूक केली जात नाही आणि आयुर्वेदिक औषधींचा वापर करून हाडांवर उपचार केले जात आहेत या गोष्टीला त्यांनी दुजोरा दिला आहे.

 

hanuman mandir 2 inmarathi

 

“भारतात काहीही घडू शकतं” हे आपण नेहमीच उपहासाने म्हणत असतो. हनुमान मंदिरात कोणत्याही ‘प्लास्टर’ शिवाय हाडांना मिळणारं जीवदान हे नक्कीच आश्चर्यकारक आहे.

लंकेत बेशुद्ध अवस्थेत असलेल्या लक्ष्मणाला आपल्या औषधांनी जागं करणारा हनुमान आजही आपल्या औषधाने चमत्कार दाखवत आहे हे लोकांना सध्या तरी मान्य करावं लागत आहे.

कोणत्याही साईड- इफेक्टला सामोरं जावं न लागता लोकांचा इलाज होत आहे हे महत्वाचं – मार्ग कोणताही असो. नाही का?

या सगळ्यावर विश्वास कितपत ठेवायचा किंवा नाही ठेवायचा हे ज्याचं त्याने ठरवावं, पण या अशा अनेक गोष्टी जगात घडत असतात त्याकडे आपण काहीतरी रंजक गोष्ट म्हणून बघावं आणि सोडून द्यावं!

===

हे ही वाचा भारतात या मंदिरांमध्ये रामायणातील महाखलनायकाची पूजा आजही केली जाते

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?