' अकबराची पूजा करणारे हे गाव परदेशातील पर्यटकांना इतके का आवडते, जाणून घ्या… – InMarathi

अकबराची पूजा करणारे हे गाव परदेशातील पर्यटकांना इतके का आवडते, जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कॉलेजमध्ये असताना अनेक जण ट्रेकिंगला जातात, मित्रांबरोबर फिरायला जातात किंवा परिवारासोबत जर कधी थंड हवेच्या ठिकाणी जायचे ठरले तर पहिली पसंती असते ती हिमाचल प्रदेशला! ट्रेकिंग साठी जाणारे असोत की पिकनिक साठी जाणारे असोत हिमाचलला जाणे प्रत्येकालाच आवडते.

ह्या हिमाचलमध्ये जशी निसर्गसौंदर्याची उधळण असलेली आपल्याला दिसते तसेच ह्या पहाडी भागात अनेक रहस्यपूर्ण गोष्टी सुद्धा आपल्याला दिसतात.

हिमाचलला गेलेल्यांना मलाणा गाव माहित नाही असे सहसा होत नाही.

 

malana-marathipizza

 

हिमाचल बद्दल माहिती देताना मलाणा ह्या रहस्यपूर्ण गावाविषयी अनेक लोक आवर्जून माहिती देतात. तर चला आज आपण मलाणा ह्या गावाविषयी काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊया.

मलाणा गावातील लोक जमलू नावाच्या देवाची पूजा करतात. ह्या जमलू देवाच्या मंदिराबाहेर अनेक लाकडी भिंती आहे ज्यावर कोरीवकाम काम केलेले आहे.

ह्या लाकडी भिंतीवर युद्ध करणारे सैनिक कोरलेले आहेत. आणि ह्या सैनिकांनी काही खास प्रकारची वेशभूषा केलेली दिसते. त्या सैनिकांजवळ अनेक हत्यारं सुद्धा दिसतात.

 

Malana-temple-marathipizza

 

ह्या गावातील लोक स्वतःला अलेक्झांडर म्हणजेच सिकंदराच्या सैनिकांचे वंशज मानतात.

आपले भारतीय संविधान ते मानत नाहीत. त्यांचे स्वत:चे वेगळे कायदे आहेत. त्यांच्या गावचे कायदे त्यांनी वेगळे बनवले आहेत. ते लोक त्यांच्या गावच्याच कायद्याप्रमाणेच कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेतात.

 

malana-marathipizza01

 

मलाणा गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे भारतातील असे एकमात्र गाव आहे जिथे मुघल बादशाह अकबराची पूजा केली जाते. ह्यामागे एक कथा सांगितली जाते कि –

एकदा मुघल बादशहा अकबराला स्वतःच्या सत्तेचा आणि शक्तीचा गर्व झाला होता. त्याचा गर्व घालवण्यासाठी जमलू देवाने पूर्ण दिल्ली शहराला बर्फाने गोठवून टाकले होते. त्यानंतर अकबराला स्वतःच्या वृथा अभिमानाची जाणीव झाली आणि त्याने स्वतः मलाणा गावात येऊन जमलू देवाची माफी मागितली होती.

खरं तर इथले लोक इतर हिंदू लोकांप्रमाणेच पूजा वगैरे करतात पण अकबराची पूजा मात्र अतिशय गुप्त रित्या केली जाते. आणि ह्या पूजेपासून बाहेरच्या लोकांना लांब ठेवले जाते. हि पूजा बघण्याची बाहेरच्या व्यक्तीला परवानगी नाही.

 

malana-marathipizz02

 

ह्या गावाविषयी आणखी गमतीशीर गोष्ट म्हणजे ह्या गावातल्या दुकानांमध्ये बाहेरच्या लोकांना जायची परवानगी नाही.

बाहेरच्या लोकांना हे लोक आपल्या दुकानांमध्ये पायही ठेवू देत नाहीत. आणि बाहेरच्या लोकांना दुकानातील वस्तूंना हात लावायची सुद्धा परवानगी नाही.

जर तुम्हाला काही खरेदी करायचे असेल तर तुम्ही दुकानाबाहेरूनच त्यांना सांगायचे आणि पैसे सुद्धा दुकानाबाहेर ठेवायचे. तुम्हाला तुमच्या विकत घेतलेल्या वस्तू ते बाहेर आणून देतात.

 

malana-marathipizz05

 

इकडची माणसे त्यांच्या संस्कृती आणि परंपरांविषयी अतिशय जागरूक आहेत. त्यात ते कुठलाही बदल करत नाहीत. बाहेरून ह्या गावात गेलेल्या लोकांवर ते कडक नजर ठेवून असतात.

तुमच्याकडून अगदी छोटी चूक झाली किंवा त्यांच्या नियमांपैकी तुम्ही कुठला नियम मोडलात तर ते लोक तुमच्याकडून १००० रुपये दंड म्हणून वसूल करतात.

 

malana-marathipizza04

 

ह्या गावातल्या अशा इंटरेस्टिंग गोष्टींमुळे आणि गावातल्या माणसांविषयी असलेल्या उत्सुकतेमुळे दर वर्षी हजारो लोक ह्या गावाला भेट देतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाहेरून आलेल्या माणसाला राहण्यासाठी ह्या गावात काहीही व्यवस्था नाही. त्यांना त्या गावात राहण्याची परवानगी सुद्धा नाही.

पर्यटकांना गावाच्या वेशीबाहेर तंबू टाकून राहावे लागते.

 

malana-marathipizza06

 

भारतात जिथे लोक अतिथीला देव मानतात तिथे ह्या गावच्या लोकांचे बाहेरच्या लोकांविषयीचे नियम म्हणजे अजबच आहेत. कधी हिमाचलला गेलात तर ह्या गावाला आवर्जून भेट द्या!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?