' जखम झाल्यास नुसती हळद न लावता करा हा उपाय… भारतीय शास्त्रज्ञाचा भन्नाट शोध! – InMarathi

जखम झाल्यास नुसती हळद न लावता करा हा उपाय… भारतीय शास्त्रज्ञाचा भन्नाट शोध!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या स्वयंपाकघरात लागणारी, सतत हाताशी असणारी, पदार्थांना छान रंग आणि स्वाद आणणारी हळद ही पूर्वापार अँटीसेप्टिक म्हणून वापरली जाते.

भाजी चिरताना कापलं.. लागलं.. चिरलं, खेळताना पडलात जखमा झाल्या तर सगळ्यात पहिल्यांदा घरगुती उपाय म्हणून जखमेवर हळदच लावली जाते.

लग्नाच्या आधी नवरा नवरीला हळद लावली जाते. त्यामुळे त्यांचं खुललेलं रुप.. कांती तजेलदार करण्यात हळदीचा मोठा हातभार असतो. पी हळद हो गोरी असं म्हणत हळदीने म्हणींमध्ये सुद्धा जागा पटकावली आहे.

 

haldi inmarathi

 

खोकला आला तर गरम दूध आणि हळद यांच्या सेवनाने खोकला लगेच कमी होतो. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी हळदीचं लोणचं हा चांगला पर्याय मानला जातो.

सौभाग्य लेण्यांमध्ये तर हळदी कुंकू यांचा मान सगळ्यात आधी. शुभ कार्यात सवाष्णींना ओटी भरण्याआधी हळद कुंकू लावले जाते. लग्नात नवरा नवरीला कंकण बांधतात त्यात हळकुंड असतेच.

ओटी भरताना लेकुरवाळी हळकुंडे मानाची समजली जातात. एकंदरीत काय तर हळदीचा मान, महत्त्व आपल्या धार्मिक विधींमध्ये‌ जितकं आहे तितकंच आरोग्याच्या दृष्टीने पण हळद ही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.

हळदीचे एकूण तीन प्रकार आहेत. आंबेहळद, लोखंडी हळद, सुगंधी हळद.

१. आंबेहळद –

कोणत्याही व्याधींवर‌ आंबेहळद अतिशय उपयुक्त आहे. लचकणे, मुरगाळणे, अशा दुखण्यावर आंबेहळदीचा उगाळून लेप लावला जातो आणि त्यामुळे हे दुखणे बरे होते.

शरीराच्या कोणत्याही भागावर आलेली गाठ आंबेहळदीच्या लेपाने बसते असा अनुभव आहे. ही हळद पोटात घेत नाहीत तर बाह्योपचाराचा भाग म्हणून आंबेहळद वापरली जाते.

===

हे ही वाचा हृदय निरोगी राहण्यासाठी दररोजच्या आहारात हे सात मसाले हवेतच!

===

 

turmeric inmarathi

२. लोखंडी हळद –

रंग तयार करण्यासाठी ही हळद वापरली जाते. या हळदीचा रंग काळपट असतो म्हणून ही लोखंडी हळद किंवा काळी हळद म्हणून ओळखली जाते.

३. सुगंधी हळद –

ही आपल्या रोजच्या जेवणात वापरली जाणारी हळद. मसाल्यात, फोडणीच्या डब्यात, धार्मिक कार्यात याच हळदीचा वापर केला जातो.

शिवाय कापलं, लागलं तर होणाऱ्या जखमांना हीच हळद लावली जाते कारण हळदीत असलेले जंतूनाशक गुणधर्म! सर्दी, कफ, खोकला यांवर दूध हळद हा इलाज मानला जातो.

शास्त्रज्ञांनी हळदीच्या याच गुणधर्माचा उपयोग करून बँडेज बनवलं आहे. झालात ना थक्क? हो, ही खरी गोष्ट आहे. कधी कधी किरकोळ खरचटलं, कापलं तर त्यावर हळद दाबून धरली की रक्त थांबतं. पण घाव जर खोल असेल तर आपण मलमपट्टी करतो.

त्याआधी जवळपास असणारं एखादं बँडेज बांधतो. या बँडेजमुळे जखमा लवकर भरून येतात हा अनुभव कितीतरी जणांना असेल. पण या बँडेजमध्ये अॅलोपॅथीची औषधं असतात.

भारताला आयुर्वेदाची खूप जुनी परंपरा आहे. शेकडो औषधं साईड इफेक्ट शिवाय आयुर्वेदाने आपल्याला दिली आहेत.

मेक ईन इंडिया या धोरणाने कितीतरी पारंपरिक गोष्टी पुन्हा नव्याने वर आल्या. त्यातच हा एक नवा शोध भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संजीव साहो यांनी लावला आहे.

 

scientist inmarathi

 

जगभरात वाढणारा डायबिटीसच्या रुग्णांचा आकडा ही काहीशी चिंताजनक बाब आहे. या रुग्णांना सतावणारी सगळ्यात मोठी त्रासदायक गोष्ट म्हणजे लवकर बऱ्या न होणाऱ्या जखमा. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले तर जखमा लवकर भरून येत नाहीत.

कधी कधी एखादे ऑपरेशन करायचे झाले तर या साखरेची पातळी कमी जास्त असेल तर ते करणे‌ कठीण होते. मग एकतर त्या जखमा बऱ्या होईपर्यंत थांबावं लागतं किंवा जास्त प्रमाणात अँटीबायोटीक्स देऊन जखमा बऱ्या कराव्या लागतात आणि मग ऑपरेशन होते. पण या अँटीबायोटीक्स औषधांचा पण त्रास होतो! जसं पित्त वाढणे, मळमळ, उलट्या वगैरे.

मग या जखमा नैसर्गिक स्त्रोत वापरुन लवकर‌ बऱ्या करण्यासाठी काय करावं? वर्षानुवर्षे स्वयंपाकघरात वापरली जाणारी हळद त्यासाठी कामी आली.

भुवनेश्वर येथील इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सेस मधील डॉ. साहो यांनी‌ हे हळदीचं बँडेज तयार केलं आहे.

===

हे ही वाचा महागड्या क्रिम्स पेक्षा कांती सतेज करणारे स्वयंपाकघरातील गुणकारी औषध एकदा तरी वापराच

===

या हळदीच्या बँडेजमध्ये‌ त्यांनी‌ बायोडिग्रेडेबल करक्युनिम वापरले आहेत. ते हळदीचे रेणू जखमेच्या ठिकाणीच अँटीसेप्टिक म्हणून काम करतात आणि संसर्ग होऊ नये म्हणून जखम शोषून घेतात. त्यामुळे जखम लवकर कोरडी होते व बरी होण्यास मदत होते.

 

band aid inmarathi

 

औषधांचे शरीरात होणारे बदल, दुष्परिणाम हे अभ्यासून त्याचा परिणाम काय होईल हे तपासून मगच या हळदीयुक्त बँडेज बनवलेल्या आहे. हे बँडेज लावल्यानंतर जखम झालेल्या ठिकाणी पेशींची संख्या काय होते याचाही अभ्यास केला गेला.

तसेच हळदीचं बँडेज तयार करताना‌ ग्रॅन्यूलेशन ही पद्धत अवलंबली. यामुळे हळद अगदी बारीक पावडर ऐवजी थोडीशी दाणेदार किंचीत भरभरीत करुन मगच बँडेजसाठी वापरली. ज्यामुळे जखमांना लवकरात लवकर आराम पडावा.

डॉ. साहो यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत हे आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीचा संगम असलेलं बँडेज तयार केलं. ज्यामुळे डायबिटीस असलेल्या रुग्णांना निदान झालेल्या जखमा लवकर‌ भरुन येण्याचं आणि त्रासातून मुक्त होण्याचं वरदानच हे बँडेज ठरणार आहे असं म्हणायला हरकत नाही.

जगाच्या कल्याणासाठी झटणारे लोक हे काही देवाच्या किंवा देवदूताच्या रुपात येतात का? कधी कधी ते डाॅक्टर साहोंच्या रुपातही भेटतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?