' जेव्हा शरद पवार सुद्धा म्हणाले होते 'मी पुन्हा येईन', 'मी पुन्हा येईन'...!!

जेव्हा शरद पवार सुद्धा म्हणाले होते ‘मी पुन्हा येईन’, ‘मी पुन्हा येईन’…!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

शरद पवार हे नाव सध्या फार चर्चेत आहे, ते त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात भरती केलं या कारणासाठी. मात्र, आज राज्याचं अथवा देशाचं राजकारण बघायला गेलं, तर शरद पवार या नावाशिवाय ना ते सुरु होऊ शकत ना संपू शकत.

अगदी आजही पहा ना, देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय नेते शरद पवार यांची भेट झाली असल्याची चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार कार्यरत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या भेटीविषयी उलटसुलट चर्चा सुद्धा सुरु आहेत.

थोडक्यात काय, तर जिथे राजकारण आहे, राजकारणातील उत्तम हुशारी आणि चलाखी आहे तिथे शरद पवार हे नाव आलंच पाहिजे, असा जणू काही अलिखित नियमच असावा. म्हणूनच शरद पवार हे नाव राजकारणात खूप मोठं आहे.

 

sharad-pawar-inmarathi

 

त्यांचं राजकारणातील चातुर्य दिसून येतं ते मुख्यत्वे करून त्यांच्या बोलण्यातून… एक अत्यंत मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांचं राजकारणातील कौशल्य आणि वाक्चातुर्य अफलातून आहे, असंच म्हणावं लागेल. मग ते इंदिरा गांधींविरुद्ध उभं ठाकाणं असो किंवा सध्या महाराष्ट्रात असणाऱ्या सरकारची निर्मिती करणं असो, त्यांचं कौशल्य दिसून आलं आहे.

===

हे ही वाचा – जेव्हा शरद पवारांनी १९९३ मधील १३ वा बॉम्बस्फोट शोधून काढला…!!

===

त्यांचं जबरदस्त बोलणं आणि मुत्सद्दी असणं याची प्रचिती त्यांच्या तरुण वयापासूनच आलेली आहे. त्यांच्या या अफाट वाक्चातुर्याचे उदाहरण असणारे हे दोन किस्से तर तुम्हाला माहित असायलाच हवेत.

 

sharad pawar inmarathi

 

त्यादिवशी विधानभवनात नेमकं काय घडलं?

ही घटना आहे साधारणपणे ६० च्या दशकातली! शरद पवार त्यांच्या मित्रांसह मुंबईत फिरायला आले होते. कॉलेजच्या मित्रांसोबत मुंबईत फिरत असताना ते थेट विधानभवन बघायला गेले. त्याचवेळी विधानभवनाचं कामकाज होतं.

सभागृहात सुरु असलेली चर्चा पाहावी या विचाराने ते गॅलरीत बसले. सभागृहाचं कामकाज बघण्यात ते इतके मग्न झाले होते, की त्यांच्याही नकळत त्यांनी एका पायावर दुसरा पाय ठेवला. विधानभवनातील सेवकाने येऊन असं बसण्याची परवानगी नसल्याचं त्यांना सांगितलं. ते लक्षात येताच ते पुन्हा नीट सावरून बसले.

===

हे ही वाचा – “झाड तोडू नये” : शरद पवारांच्या चातुर्याची एक अजब कथा!

===

सभागृहातील चर्चा अशी काही रंगली होती, की शरद पवार पुन्हा एकदा ती पाहण्यात रंगून गेले. त्यातच पुन्हा एकदा त्यांनी पायावर पाय ठेवला आहे, हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. सेवकाने त्यांना पुन्हा हटकलं. एवढंच नाही, तर नियमबाह्य कृत्य केलं म्हणून त्यांना विधानभवनातून बाहेर जाण्यास सांगितलं. त्यांनी माफी मागितली, तरीही त्या सेवकाने काहीही ऐकून घेतलं नाही.

अखेर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यावर ते तिथून निघाले, मात्र त्याचवेळी त्यांनी सेवकाला सांगितलेलं वाक्य विचार करण्यासारखं होतं.

ते विधानभवनातील त्या सेवकाला म्हणाले, ‘मी पुढच्यावेळी येईन तेव्हा इथे गॅलरीत बसून सभागृहातील चर्चा ऐकण्यासाठी नाही, तर समोरच्या सभागृहात सभासद म्हणून बसण्यासाठी’…

 

sharad pawar inmarathi

 

विधानभवनातील शरद पवार यांचा तो अनुभव आणि आज सगळ्या सभागृहांमधील सदस्यत्व भूषविणारं, देशाच्या राजकारणातील एक फार मोठं नाव हा त्यांचा प्रवास वेगळा सांगायला नको.

अवघ्या एका वाक्यात विरोध कसा मावळला?

वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलींना सामान वाटा मिळावा, यासंदर्भात सभागृहात विधेयक मांडण्यात आलं होतं. या विधेयकावर गहन चर्चा रंगली होती. अनेक मोठ्या नेत्यांचा सुद्धा याला विरोध होता. विधेयकावरील दुमत इतकं मोठं होतं की सभागृहात जणू चर्चेचं घमासान रंगलं होतं.

शरद पवार मात्र सामान वाटा असायलाच हवा या मतावर ठाम होते.

अनेक ज्येष्ठ सभासदांचा विरोध खोडून काढणं आणि त्यांना हा कायदा किती महत्त्वाचा आहे हे पटवून देणं आवश्यक होतं. त्याचवेळी शरद पवार उभे राहिले आणि म्हणाले, ‘जरी मुली माहेरची संपत्ती घेऊन गेल्या, तरी सुना येताना त्यांच्या माहेरची संपत्ती घेऊन येतील की!’

या एका वाक्यात सगळा विरोध मावळला. या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होण्याचा मार्ग सुकर झाला. अवघ्या एका वाक्याच्या जोरावर विरोध संपवून टाकण्याची ही अशी हातोटी शरद पवारांकडे होती आणि आजही आहेच…

 

sharad pawaer

 

===

हे ही वाचा – जेव्हा शिवसेना “फारच” वादग्रस्त आहे म्हणून भाजपने साधली होती पवारांशी जवळीक…!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?