' तुमचा जीवनसाथी हा ‘सोलमेट’ असेलच असं नाही! वाचा ७ मूलभूत फरक! – InMarathi

तुमचा जीवनसाथी हा ‘सोलमेट’ असेलच असं नाही! वाचा ७ मूलभूत फरक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यात एका चांगल्या आणि मनासारख्या जोडीदाराची आवश्यकता असते. आपल्याला पाहिजे तसा जोडीदार मिळाला, की आयुष्य जगण्याचा आनंद द्विगुणित होतो.

आपण अनेकदा आपल्या जोडीदाराचा उल्लेख ‘सोलमेट’ असा करतो. मात्र आपला जोडीदारच आपला खरा ‘सोलमेट’ असतो का? कदाचित हो आणि कदाचित नाही.

काहींना प्रश्न पडला असेल, की सोलमेट आणि जोडीदार याचा अर्थ तर एकच होतो की… पण, नाही या दोन्ही शब्दांचा अर्थ वेगळा आहे. आज या लेखातून आपण या दोन्ही शब्दांमधला फरक जाणून घेऊया.

 

soulmate inmarathi

 

१. सोलमेट आणि जोडीदार यांच्यातला मुख्य फरक

सोलमेट हा जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणीही असू शकतो. सोलमेट आपल्याला आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी शिकवतो. आपल्यामध्ये अनेक गोष्टींची आवड निर्माण करणे, नवनवीन गोष्टी शिकवणे, वेळप्रसंगी रागावणे, योग्य मार्ग दाखवणे आदी अनेक चांगल्या गोष्टींची शिकवण देणाऱ्या व्यक्ती सोलमेट असतात.

जोडीदार हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असतो. जो आपल्या आयुष्यातील चांगल्या वाईट सर्व प्रसंगाना तोंड देताना आपल्या सोबत असतो. ही व्यक्ती आपल्याला नेहमी जीवनात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करत असते. आपल्यासोबत ठामपणे उभे राहून आपली ताकद बनते.

 

Women happier less attractive partners.Inamarathi1

 

२. भावना समजून घेणं 

सोलमेट या नात्यांचा संबंध हा हृदय आणि भावनांशी असतो. सोलमेट असणारी व्यक्ती अहंकार दूर सारून आपल्याला योग्य दिशा देते. आपल्या आयुष्यात चांगल्या सोलमेट असणाऱ्या व्यक्ती मिळवणे हे काही अंशी आपल्या कर्मावर देखील अवलंबून असते.

जेव्हा तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करता तेव्हा अप्रत्यक्षपणे तुमच्या विचारांमध्ये तुमचा जोडीदार येतच असतो. तुमच्या जोडीदाराजवळ तुम्हाला कधीही तुमचा एकटेपणा सांगावा लागत नाही.

 

lonely time inmarathi

===

हे ही वाचा – नात्यात गोंधळ टाळायचा असेल तर या ‘७’ गोष्टी पार्टनरला न सांगितलेल्याच बऱ्या!

===

३. चौकटी पलीकडील नाते

जेव्हा तुम्ही तुमच्या सोलमेटला भेटता, तेव्हा तुम्हाला पहिल्याच भेटीत तुम्ही अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याची जाणीव होते.

तुमची विचार करण्याची पद्धत ही एकसारखीच असते. तुम्ही एकमेकांना ‘जाणता’ हीच गोष्ट तुम्हाला एकमेकांबद्दल आकर्षित करते. अशावेळी तुमच्या काही सवयी, विचार एकमेकांना फायदेशीर ठरू शकतात.

 

umesh-priya-inmarathi

 

तर जोडीदार हे दोन वेगवेगळ्या विचारांच्या आणि वेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या व्यक्ती असतात. जेव्हा त्या सोबत राहायला लागतात, तेव्हा त्यांच्यात प्रेम वाढत जाते आणि एक भावनिक नाते तयार होते. त्यांच्यात प्रेमासोबतच एक दृढ आणि कायमस्वरूपाची मैत्रीसुद्धा तयार होत असते.

४. सोलमेट तुम्हाला पूर्णपणे ओळखतो

सोलमेट्स समोर कधीच आपल्याला आपले विचार आणि भावना व्यक्त करण्याची गरज पडत नाही. किंवा हे व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज पडत नाही. सोलमेट्स आपल्याला अंतकरणापासून ओळखत असल्याने त्याला सगळं काही न बोलताच समजत असते. त्याच्या आणि आपल्या भावनांचा संबंध एकच असतो.

तर जोडीदाराला एकमेकांच्या सवयी, विचार आदी शिकण्याची इच्छा असते. ते शारीरिकदृष्ट्या सुद्धा एकमेकांकडे आकर्षित होतात. जोडीदार आयुष्यात फक्त मनाऐवजी नाही, तर डोक्याने विचार करून देखील चालतात.

 

Couch Potato Partner InMarathi

 

===

हे ही वाचा – जोडीदार निवडताना या ९ चुका झाल्या तर आयुष्यभर किंमत चुकवावी लागू शकते

===

५. सोलमेट आणि लाईफ पार्टनरची भेट 

जेव्हा तुम्हाला जीवनात सर्व काही संपल्याची जाणीव होते, तेव्हाच तुमच्या आयुष्यात तुमच्या खऱ्या सोलमेटचा प्रवेश होतो. सोलमेटचे नाते अतिशय सुंदर आणि सुखद अनुभव देणारे असते. प्रेमळ, कठोर असे वेगवेगळे अनुभव देणाऱ्या या नात्यात दोन्ही व्यक्ती त्यांचे नाते तयार करण्याचा प्रयत्न करत असतात.

जोडीदाराचे नाते हे अगदीच नैसर्गिक असते. याला कोणतीच पार्श्वभूमी नसते किंवा या नात्याला कोणताही भूतकाळ नसतो. वर्तमानकाळात हे नाते तयार होते. वैवाहिक नाते टिकवण्यासाठी गरजेची सत्यता आणि पारदर्शीपणा यात आवश्यक असतो.

जोडीदारासोबतचे तुमचे नाते खूप मजबूत आणि आयुष्यभरासाठी जोडलेले असते. जोडीदारासोबत काही काळासाठी भांडणतंटा, लटका राग अशा गोष्टी घडू शकतात, मात्र हे नाते कधीच तुटू नये असे असते.

 

fighting-couple-inmarathi

 

६. सोलमेट विशिष्ट काळापुरतेच

सोलमेट हे आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी येतातच असे नाही. ते एका विशिष्ट काळापुरतेच आपल्यासोबत असतात असे घडू शकते. या कमी वेळातही ते आपल्याला आपल्या आयुष्याचा अर्थ आणि आणि इतर अनेक महत्वाच्या गोष्टी शिकवून जातात.

तर जोडीदार हा काहीसा उशिराने जरी आपल्या आयुष्यात आला, तरी तो कायमस्वरूपी येतो. आपल्या पावलावर पाऊल टाकून तो चालत असतो. त्यामुळे त्याची साथ आपल्याला आयुष्यभर मिळते.

 

couple-inmarathi

 

७. सोलमेट्स आपले प्रतिबिंब

सोलमेट्स हे अनेकदा आपले प्रतिबिंब असतात. आपण आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी त्यांना सांगून आपले मन मोकळे करू शकतो. त्या गोष्टींवर त्यांचे विचार आणि मते मागू शकतो.

जोडीदारासोबत काहीवेळा आपण सर्वच गोष्टीत सहजपणे व्यक्त होऊ शकतोच असे नाही.

===

हे ही वाचा – जोडीदार ‘हॅंडसम’ नाही अशा स्त्रिया अधिक सुखी असतात – असं का?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?