' आता फिकर नॉट! रोड ट्रिप्ससाठी ही कंपनी देतेय महागड्या गाड्या अतिशय स्वस्त किंमतीमध्ये!

आता फिकर नॉट! रोड ट्रिप्ससाठी ही कंपनी देतेय महागड्या गाड्या अतिशय स्वस्त किंमतीमध्ये!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

रोजच्या धावपळीत, कामाच्या रामरगाड्यात, बस, ट्रेनच्या गर्दीत धक्का बुक्की करत प्रवास करताना असे वाटते की ब्रेक घ्यावा आणि पळून जावे कुठेतरी.. ! जिथे एकांत असावा, शांतता असावी आणि मनात येईल तिथे फिरता यावे. अनोळखी रस्त्यांवर जाऊन नवनवीन ठिकाणे बघावी आणि रोजचा सगळा स्ट्रेस विसरून जावे.

 

bike-trip-marathipizza
mumbaitravellers.in

कधी कधी आपण सगळं व्यवस्थित प्लान करतो. सुट्ट्या, मित्र, ठिकाण पण आपल्याकडे प्रवास करता येईल अशी ढासू बाईक नसते आणि बाईकशिवाय फिरणार कसं? म्हणून सगळा प्लान कॅन्सल व्हायची वेळ येते. अशा वेळी वाटतं की कोणी बाईक भाड्याने देत असतं तर बरं झालं असतं! गोव्याला तर बाईक भाड्याने घेऊन फिरणे ही नॉर्मल गोष्ट आहे. पण मुंबईत? मुंबई मध्ये अशा बाईक मिळत असत्या तर अनेक लोकांचे ट्रीपचे प्लान्स कॅन्सल झाले नसते.

लोकांचा हाच प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करत आहे मुंबईची Born To Ride नावाची एक फर्म.

 

born-to-ride-marathipizza
royalindiabikes.com

 

ही फर्म बाईकप्रेमींसाठी त्यांच्या आवडीच्या बाइक्स घेऊन आली आहे. Born To Ride मधून तुम्ही तुमच्या आवडीच्या बुलेट पासून ते Duke आणि Triumph Bonneville सुद्धा भाड्याने घेऊ शकता.

जी बाईक घेणे अनेकांचे स्वप्न असते, शोरूम मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ह्या बाईकला हात लावावा की नाही असा विचार करता किंवा जी बाईक विकत घेण्यासाठी तुम्ही दर महिन्याला सेव्हिंग करता ती बाईक जर भाड्याने का होईना तुम्हाला चालवायला मिळत असेल तर तुमच्यासाठी यापेक्षा आनंददायी गोष्ट दुसरी कोणतीही नसेल नाही का?

 

ELECTRIC BIKE inmarathi

 

पण थांबा! तुमच्यापैकी काही जणांना असेही वाटत असेल की ज्या बाईक घेणे आपल्याला स्वप्नात सुद्धा परवडू शकत नाही त्या बाईकचे भाडे सुद्धा असेच आपल्या खिशासाठी हानिकारक असेल, तर तुमची ही समस्या सुद्धा Born To Ride ने सोडवली आहे. त्यांनी ह्या बाइक्स चे भाडेदर अगदी सामान्य व्यक्तीला परवडेल असेच ठेवले आहेत.

 

ktm-duke-marathipizza
rideindia.co.in

 

कंपनी ने

Royal Enfield Continental GTs चे दिवसाचे 1500 रुपये

KTM RC 390s आणि Royal Enfield Himalyan चे एका दिवसाचे 1800 रुपये

आणि अनेकांची ड्रीम बाईक Triumph Bonneville चे एका दिवसाचे 4000 रुपये

 

असे भाडेदर ठेवले आहेत.

T120-Black-Matt-marathipizza
motorcycle-usa.com

 

आहे कि नाही खिसा फ्रेंडली? बाईकसोबतच तुम्ही हेल्मेट आणि जॅकेट सुद्धा तुम्ही भाड्याने घेऊ शकता. बाईक भाड्याने घेण्यासाठी तुम्हाला फार काही कष्ट घेण्याची गरज नाही. घर बसल्या तुम्ही तुमची बाईक बुक करू शकता.

फक्त कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन Pick- Up आणि Drop –Off ची माहिती टाकायची आणि तुमच्या प्रवासाचा अंदाज घेऊन किती दिवसांचे किती भाडे द्यावे लागेल ह्याचा अंदाज घेऊन तुम्ही तुमची आवडती बाईक बुक करू शकता.

चला तर मग विचार कसला करताय? बाईक बुक करा, बॅग भरा , मित्रांना बरोबर घ्या आणि निघा अनोळखी रस्त्यांवर नवीन जागांच्या शोधात!

हे देखील वाचा : (भारतातून थेट थायलँड – एक Ultimate Roadtrip !)

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?