' घाईघाईत जेवण्याची सवय भविष्यात किती घातक ठरते याची तुम्हाला कल्पनाही नसेल…!! – InMarathi

घाईघाईत जेवण्याची सवय भविष्यात किती घातक ठरते याची तुम्हाला कल्पनाही नसेल…!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लहानपणी भावंडांबरोबर जेवताना, ‘तुझं जेवण आधी संपत की माझं जेवण आधी संपतं.’ अशी शर्यत लावून जेवण केलं जायचं. पुढे शाळा-कॉलेजातील मित्रांबरोबर अशीच शर्यत लावली जायची.

त्यानंतर नोकरीच्या निमित्ताने वेळेत जाण्यासाठी घाईघाईने भरभर खाल्ले जाते, पुढे मग हीच सवय कायम राहते. वेळ वाचवण्यासाठी जेवणाकडे दुर्लक्ष होतं किंवा घाईने उरकले जाते. पण हे असे घाईने जेवण्याचे दुष्परिणाम काय आहेत हे आपल्याला त्यावेळेस कळतही नाहीत.

पोट दुखी

भरभर जेवण्याच्या सवयीमुळे आपल्याला पोटदुखीचा आजार होऊ शकतो. ओटीपोटात वेदना जाणवतात.

भरभर खाल्ल्यामुळे तोंडातील लाळ अन्नामध्ये नीट मिसळली जात नाही. त्यामुळे अन्नाचे चांगले पचन होत नाही. पोटात गॅस तयार होतो, पोट फुगते आणि पोट दुखायला लागते.

 

stomach ache 1 inmarathi

 

वाढते वजन

आपल्या शरीरात असे काही हार्मोन्स असतात, जे आपल्याला भूक लागण्याची जाणीव करून देतात. पण भरभर खायच्या सवयीमुळे ते हार्मोन्स डिस्टर्ब होतात, त्यांच्या कामात व्यत्यय येतो आणि पोट भरल्याची जाणीव देखील लवकर होत नाही. म्हणूनच अधिक अन्न आपल्या शरीरात जातं, याचा परिणाम वजन वाढण्यात होतो.

 

loss weight marathipizza

 

===

हे ही वाचा – सकाळी उठल्यानंतरच्या या १० घातक सवयी ठरतील वजनवाढीचं कारण!

===

मधुमेहाचा धोका वाढतो

मधुमेहाचा सगळ्यात जास्त धोका हा जेवणानंतर असतो. कारण जेवणानंतरच माणसाच्या शरीरातील साखर वाढते. त्यामुळे जितकं हळू खाऊ तितकी ती साखर कमी निर्माण होते.

 

diabetes inmarathi

 

भरभर खाल्ल्यामुळे अनेक प्रकारच्या शर्करा शरीरामध्ये निर्माण होतात. रोजच जर हीच सवय ठेवली तर मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

हृदयरोगाचा त्रास वाढतो

भरभर जेवल्यामुळे शरीरातील चयापचय क्रिया नीट होत नाही. ज्यामुळे शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल कमी होते आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढते. याच गोष्टीमुळे हृदयावर तणाव येतो. हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो आणि स्ट्रोक किंवा हृदयाचा झटका येऊ शकतो.

 

heart-attack-inmarathi

 

हे इतके सगळे त्रास घाईने आणि गडबडीने खाऊन खरंच होतात का असा प्रश्न पडू शकतो. किंवा ही माहिती खरी की खोटी हा देखील संभ्रम निर्माण होऊ शकतो.

संशोधन काय सांगतं?

ही माहिती खोटी नाही. यावर बरंच संशोधन झालेलं आहे. आपल्याकडे म्हणतात ना, एक घास बत्तीस वेळा चावून खाल्ला गेला पाहिजे, ते खोटे नाही. कारण झालेल्या संशोधनानुसार असं लक्षात आलंय की घास चावून-चावून खाल्ल्यामुळे पचन चांगले होते आणि वजन वाढत नाही. असं जेवणाऱ्या लोकांना हृदय रोग किंवा मधुमेहाचा धोका कमी असतो.

ज्या रुग्णांना आधीच उच्च रक्तदाब, मधुमेह, कॉलेस्ट्रॉल वगैरे त्रास असतात, त्या लोकांना जर भरभर जेवायची सवय असेल तर त्या लोकांना हृदयरोगाचे त्रास लवकर सुरू होतात.

चालताना दम लागणे, घाम येणे याबरोबरच हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होणे इत्यादी गोष्टी दिसून येतात. त्यामुळेच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊ शकतो.

===

हे ही वाचा – माणसाचं काळीज बंद पडलं तर सगळंच संपतं! जाणून घ्या कसं जपाल तुमचं हृदय…

===

या गोष्टीवर जपानमध्ये, ‘ताकायुकी यामाजी’ यांनी संशोधन केलं आहे. त्यांच्या मते जेंव्हा आपण घाईने भरभर खातो त्यावेळी आपल्याला आपले पोट पूर्ण भरले आहे असे वाटत नाही. म्हणूनच जास्त जेवण केलं जातं. त्यामुळे शरीरातील साखर कमी वाढत राहते आणि इन्सुलिनची पातळी देखील बिघडते.

 संशोधनात असे समोर आले आहे, की भरभर जेवल्याने आपल्या शरीराला इजा होते. आजारांना आमंत्रण दिले जाते.

आपल्या पोटाला सांगता येत नाही की, आता पोट भरलेलं आहे, पोटात जागा नाहीये. तरीही आपण अन्न पोटात ढकलत राहतो. अतिरिक्त अन्न घेतो. त्यातही आता कामाच्या गडबडीत प्रोसेस्ड, रेडिमेड फूड खाल्लं जातं. त्यामुळे जाडी वाढते, हृदयावर ताण येतो.

 

fat-couple-inmarathi

 

याच्याउलट जर सगळी धान्ये, कडधान्ये, भाज्या, फळं यांचा समावेश जेवणात असेल आणि ते बसून चवीने सावकाश खाल्लं जाईल तितका त्याचा फायदा होईल. याप्रकारच्या अन्नासोबत नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप असेल तर हृदयविकाराचा धोका कमी होईल.

आताच्या धावपळीच्या जीवनात निवांत जेवायला वेळ कुठे असतो? असा प्रश्न मनात येईल.. पण ‘इच्छा तिथे मार्ग’ या म्हणीप्रमाणे आपल्याला आपल्या सोयीप्रमाणे जेवण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करता येतील.

पूर्वी म्हटलं जायचं, जेवण करताना ढेकर आला तर जेवण थांबवायला हवं. ही पोट भरल्याची पावती असते. आपल्या पोटाकडून आपल्याला हीच एकमेव सूचना मिळते. ती ऐकली पाहिजे आणि जेवण थांबवलं पाहिजे. पुढं येणारे आजारही रोखून धरले पाहिजेत.

===

हे ही वाचा – जेवणानंतर किंवा जेवणाआधी पाणी प्यावे का नाही? यामागचे गैरसमज दूर करून घ्या!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?