' डॉमिनोजचा मालक एकेकाळी कारमध्ये लपून चोरांपासून पिझ्झाचं रक्षण करायचा...

डॉमिनोजचा मालक एकेकाळी कारमध्ये लपून चोरांपासून पिझ्झाचं रक्षण करायचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पिझ्झा हा पदार्थ आता फक्त नावाला इटालियन राहिला आहे. जागोजागी आउटलेट असलेला हा पदार्थ आता भारतीयच झाल्यासारखा वाटत आहे. कोणतंही कारण असलं तरीही पण पिझ्झाचा कधीही आस्वाद घेऊ शकतो. लहान असो किंवा तरुण असो पिझ्झाचे आपण सर्वच जण चाहते आहोत.

पिझ्झा म्हंटलं की, आपल्याला सर्वात पहिल्यांदा आठवते ती परेश रावल यांची ‘डॉमिनोज  पिझ्झा’ची जाहिरात. या जाहिरातीमध्ये ३० मिनिटात पिझ्झा घरी येईल अन्यथा एक पिझ्झा फुकट दिला जाईल असा दावा करण्यात आला होता.

परेश रावल हे पूर्ण प्रयत्न करतात की, पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या मुलाला आपलं घर सापडू नये, ट्रॅफिक लागावं आणि एक पिझ्झा फुकट मिळावा. पण,’डॉमिनोज पिझ्झा’चा डिलिव्हरी देणारा मुलगा हा बरोबर ३० मिनिटात तिथे हजर होतो आणि परेश रावल हे नाराज होतात अशी ती जाहिरात होती.

 

paresh inmarathi

 

प्रत्येक मिनिट, सेकंदाचं नियोजन असलेल्या डॉमिनोज  पिझ्झा ला जगभरात इतकी लोकप्रियता मिळण्याचं श्रेय हे पिझ्झाच्या चवी इतकंच त्यांच्या तत्पर सेवेला सुद्धा दिलं जातं.

पिझ्झा हट नंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर लोकप्रिय असणाऱ्या ‘डॉमिनो पिझ्झा’ चा शोध १९६० मध्ये लागला होता.

टॉम आणि जिम मॉघन या दोन भावांनी मिळून ९०० डॉलर्स मध्ये विकत घेतलेल्या ‘डॉमनिकस्’ या हॉटेल मध्ये पिझ्झा हा पदार्थ सर्वात पहिल्यांदा तयार केला होता. तेव्हापासून आजपर्यंत हा पदार्थ खवैय्या लोकांना आनंद देत आहे.

सुरुवातीच्या काळात मॉघन यांनी कंपनीतून नोकरी गेलेल्या २ कर्मचाऱ्यांना पिझ्झा डिलिव्हरीसाठी कामावर ठेवलं होतं.

कोणत्याही ‘डॉमिनो पिझ्झा’ मधून पिझ्झा ऑर्डर केला तरी तिच चव, तिच तत्परता हेच या फ्रॅंचायझी म्हणजेच शाखा व्यवसाय पद्धतीच्या यशाचं गमक म्हणता येईल. कोणत्याही व्यवसाय करतांना दोन पर्याय नेहमीच उपलब्ध असतात.

एक तर स्वतःचं ब्रँड तयार करा किंवा तयार असलेल्या ब्रँडची मदत घेऊन म्हणजेच फ्रॅंचायझी घेऊन व्यवसाय करा. डॉमिनोज  पिझ्झाने आपल्या व्यवसाय फ्रॅंचायझी पद्धतीने करायचं ठरवलं आणि ते अल्पावधीतच ते जगभरातील प्रत्येक शहरात पोहोचले.

 

dominos 3 inmarathi

 

या पूर्ण प्रवासाबद्दल टॉम यांनी ‘पिझ्झा टायगर’ या १९८६ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात लिहिलं आहे. डॉमिनोज  पिझ्झाबद्दल या पुस्तकात उल्लेख असलेल्या काही रोचक गोष्टी जाणून घेऊयात.

१. टॉम मॉंगन यांनी व्यवसाय सुरू केल्यानंतर १४ महिन्यांनी ‘मिशगन’येथे आपलं स्टोअर सुरू केलं. त्यांना मिशगन विद्यापीठातून एक पिझ्झाची ऑर्डर आली होती. तो पिझ्झा देण्यासाठी जेव्हा टॉम हे मिशगन विद्यापीठात गेले आणि तिथल्या रिसेप्शनिस्ट ‘मार्गी’ च्या प्रेमात पडले.

आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी टॉम मॉंगन यांनी वापरलेली पद्धतसुद्धा विशेष होती. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी टॉम यांनी मार्गी यांना एक हार्टच्या आकाराचा पिझ्झा नेऊन दिला आणि आपलं प्रेम व्यक्त केलं.

टॉम आणि मार्गी यांचं पुढच्या वर्षी लग्न झालं आणि मार्गीने पुढे कित्येक वर्ष ‘डॉमिनो’ पिझ्झा सोबत काम केलं.

२. टॉम आणि जिम यांच्यापैकी जीम ला या भागेदारी व्यवसायातून मुक्त व्हायचं होतं. ५०% व्यवसाय आपल्या मालकीचा असतांना जीम हा फक्त एक वोक्सवॅगन कार घेऊन व्यवसायातून बाहेर पडला होता आणि आपल्या पोस्ट ऑफिसच्या नोकरीत परत गेले होते. वोक्सवॅगनची ही कार मॉघन बंधू हे पिझ्झा डिलिव्हरी साठी वापरायचे.

 

dominos 4 inmarathi

हे ही वाचा – “पिझ्झा हट” ने केलाय चक्क अंतराळात एक रेकॉर्ड! वाचा जबरदस्त कहाणी!

३. पिझ्झा डिलिव्हरी करायला गेल्यावर त्या काळात बरेच कॉलेजचे विद्यार्थी हे पैसे द्यायचे नाहीत. काही जण हे पिझ्झा चोरण्याचा सुद्धा प्रयत्न करायचे. टॉम हे पुढच्या वेळी त्या भागात गेले की, कारचा दरवाजा लॉक न करता लपून बसायचे आणि त्या चोरांना पकडायचे.

४. ‘डॉमिनोज  पिझ्झा’ हे आज जरी यशस्वी बिजनेस मॉडेल म्हणून समोर येत असलं तरी मॉघन बंधूंना सुरुवातीच्या काळात बऱ्याच लोकांनी व्यवसायात फसवलं आहे. टॉम हे कोणत्याही व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवायचे आणि त्यांच्या नफ्याचे पैसे त्या व्यक्तीला देऊन टाकायचे. ती व्यक्ती त्यांना पुन्हा कधीच भेटायची नाही.

५. टॉम आणि जीम यांच्या लहानपणीच त्यांच्या वडीलांचं निधन झालं होतं. त्यांचं पालन पोषण व्यवस्थित व्हावं यासाठी त्यांच्या आईने त्या दोघांना कॅथलिक अनाथ आश्रमात पाठवलं होतं. तिथे राहून या दोन भावांनी स्वतःला घडवलं आणि आपल्या परिवाराचं नाव इतकं मोठं केलं हे खरंच कौतुकास्पद आहे.

 

dominos 1 inmarathi

 

६. आपल्या स्पर्धकांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्याच्या विचाराने टॉम मॉघन यांनी ३० मिनिटांत डिलिव्हरी किंवा पिझ्झा फुकट ही संकल्पना सुरू केली. हे साध्य करण्यासाठी त्यांनी पिझ्झा किती मिनिटांत झाला पाहिजे, प्रत्येक रहदारीच्या रस्त्यावर आपलं स्टोअर असावं हे त्यांनी ठरवलं आणि त्या दिशेने त्यांनी पावलं उचलली.

डॉमिनोज पिझ्झाने अमेरिकेत हे ३० मिनिटांत डिलिव्हरी हे वचन बंद केलं. जगातील इतर देशात काही ठिकाणी अजूनही ही ऑफर सुरू ठेवण्यात आली आहे.

६. आहाराबद्दल जागरूक असलेले टॉम हे वर्षभरातून केवळ ७ वेळेसच गोड खातात ज्यामध्ये ख्रिसमस, ईस्टर सारख्या दिवसांचा समावेश आहे. इतकंच नव्हे तर मॉघन बंधू हे नेहमीच आपल्या कर्मचारी आणि फ्रॅंचायझी देणाऱ्या लोकांना सुद्धा आहाराचे नियम सांगायचे. जे लोक आहाराचे नियम पाळायचे आणि वजन कमी करायचे त्यांना एक आर्थिक बक्षीस दिलं जायचं.

पिझ्झा चे डॉक्टर्स –

१९७३ मध्ये टॉम मॉघन यांनी डॉमिनोज  पिझ्झाच्या मॅनेजर लोकांसाठी एक कॉर्पोरेट ट्रेनिंग कार्यक्रम तयार केला. या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की, मॅनेजर लोकांना पिझ्झा व्यवसायातील सर्व बारकावे शिकवता यावेत.

 

dominos 5 inmarathi

 

एका परीने डॉमिनोज  पिझ्झाच्या मॅनेजर लोकांना ‘पिझ्झा चे डॉक्टर्स’ करणे हे मॉघन यांनी ठरवलं आहे. १९८६ मध्ये डॉमिनोजच्या कॉलेज ऑफ पिझ्झारॉलॉजी मधून डिक मूलर, जिम टिली यांना ‘डॉक्टरेट’ ही पदवी देण्यात आली आणि २० जणांना मास्टर्स ची पदवी त्यांच्या पिझ्झा व्यवसायाच्या ज्ञानानुसार देण्यात आली.

टॉम मॉंगन यांचं व्यक्तिगत आयुष्य –

टॉम मॉघन यांचा जन्म २५ मार्च १९३७ रोजी अमेरिकेतील मिशगन प्रांतातील एन आर्बर या शहरात झाला होता. त्यांचे वडील हे एक ट्रक ड्रायव्हर होते. टॉम हे चार वर्षांचे असतांना त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं.

अनाथ आश्रमात रहायला जाण्यापूर्वी टॉम मॉघन यांनी शेती करणे, मासे पकडणे आणि रिकॉर्ड ईगल हे पत्रक वाटण्याचं काम करायचे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ३ वर्ष नौसेनेत काम केलं. पण, तिथे मन रमत नव्हतं म्हणून ते काम टॉम यांनी सोडून दिलं होतं.

 

tom 1 inmarathi

 

१९६९ पर्यंत मॉंगन यांनी ‘डॉमिनो पिझ्झा’चे १२ स्टोअर्स सुरू केले होते. त्यापैकी सर्वात मोठ्या स्टोअरला आग लागली होती. तेव्हा ‘डॉमिनो’ हा ग्रुप दिवळखोर झाला होता.

१५० कर्जदारांकडून मिळून डॉमिनोवर १५ लाख यु एस डॉलर्स इतकी केस टाकण्यात आली होती. बँकेने ‘डॉमिनो पिझ्झा’ वर मालकी घोषित केली होती. पण, बँक डॉमिनो पिझ्झाचं स्टोअर चालवू शकत नव्हते.

टॉम मॉघन यांनी त्यांनीच सुरू केलेल्या कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली. ८०० डॉलर्स प्रति महिन्याच्या पगारावर टॉम यांनी ही नोकरी सुरू केली होती. १९७१ मध्ये बँकेला ही खात्री पटली की, ‘डॉमिनो पिझ्झा’ ही कंपनी इथून पुढे अजूनच नुकसान देईल.

बँकेने टॉम मॉघन यांना कंपनी चे शेअर्स परत देऊन टाकले आणि टॉम मॉंगन हे परत एकदा डॉमिनो पिझ्झाचे मालक झाले.

१९८९ मध्ये टॉम मॉंगन यांनी डॉमिजनोची प्रेसिडेन्सी डेव्हिड ब्लॉक यांना दिली आणि ते स्वतः कंपनीचे सीईओ झाले. आज ‘डॉमिनोज  पिझ्झा’ चे जगभरातील ६४ देशात ६१०० फ्रँचायझी आहेत.

एका छोट्या पिझ्झा स्टोअर पासून सुरू झालेला हा प्रवास आज जगातील दुसऱ्या क्रमांकाची पिझ्झा डिलिव्हरी कंपनी कशी होऊ शकते? हा सर्व नवीन व्यवसायिकांसाठी आज अभ्यासाचा विषय आहे.

डॉमिनो पिझ्झाच्या व्यवसाय पद्धतीतून आपण उत्पादन दर्जा, सातत्य आणि तत्परता या गोष्टी नक्कीच शिकायला पाहिजे.

===

हे ही वाचा – जबरदस्त! : या “भाजी+भाकरी”च्या देशी पिझ्झासमोर परदेशी पिझ्झा फिका पडतोय…!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?