' ही ज्वाला सामान्य नाही! सम्राट अकबराची धर्मांध वृत्ती जळून खाक झाली होती हिच्यात…! – InMarathi

ही ज्वाला सामान्य नाही! सम्राट अकबराची धर्मांध वृत्ती जळून खाक झाली होती हिच्यात…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारताच्या इतिहासात अनेक प्रसिद्ध अध्यात्मिक किस्से सांगितले जातात. ज्या किस्स्यांवर संपूर्ण भारतीयांचा विश्वास आहे. असाच एक किस्सा मुघल शासक अकबराबद्दल देखील सांगितला जातो. काय आहे तो किस्सा ते जाणून घेऊयात.

हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्याच्या जवळ एक शक्तीपीठ आहे. या ठिकाणी कुठल्याही मूर्तीची पूजा केली जात नाही, तर तिथे अग्नीची म्हणजेच ज्वाला मातेची पूजा केली जाते. हे ठिकाण प्रमुख शक्तीपीठांपैकी एक मानलं जातं.

या शक्तीपिठाबद्दल अशी आख्यायिका आहे, की या ठिकाणी सती मातेची जीभ पडली होती आणि त्यामुळेच इथे शाश्वत अग्नीचा निवास आहे.

 

jwala ji mata mandir inmarathi

 

जेव्हा सती मातेच्या मृत्यूमुळे क्रोधीत झालेल्या महादेवांनी महातांडव नृत्य केले तेव्हा त्याच्या परिणामामुळे सती मातेच्या शरीराचे ५२ तुकडे संपूर्ण पृथ्वीवरती विखुरले गेले. या सर्व ठिकाणांना आज शक्तिपीठ म्हणून ओळखलं जातं.

===

हे ही वाचाजगातील एकमेव मंदिर जिथे १ कोटी शिवलिंगांची पूजा केली जाते!

===

हिमाचल प्रदेशच्या शक्तीपीठाबद्दल

अशी आख्यायिका आहे, की या शक्तिपीठाचा मोठा भक्त ध्यानु भगत दरवर्षी ज्वाला मातेच्या दर्शनासाठी येत असे. त्याच्यासोबत ईतरही अनेक भाविक ज्वाला मातेच्या दर्शनासाठी जात असत.

असंच एका वर्षी खूप मोठ्या संख्येने भाविक ज्वाला मातेचं दर्शन घेण्यासाठी हिमाचलच्या दिशेने प्रवास करत होते आणि या सर्व भाविकांना दुर्दैवाने दिल्लीच्या सीमेवर थांबवण्यात आलं. अकबराच्या सैनिकांनी या सर्व भाविकांना थेट अकबरासमोर उपस्थित केलं.

 

akbar inmarathi

 

अकबराने ध्यानु भगतला प्रश्न केला, की ‘एवढ्या मोठ्या संख्येने ते कुठे निघाले आहेत?’ त्यावर ध्यानुने देखील शुद्ध अंतकरणाने सांगितलं, की ते ज्वाला मातेच्या दर्शनासाठी निघाले आहेत. ती या सर्व जगाची पालनकर्ता आहे.

ध्यानुने पुढे अकबराला या मंदिराचे महात्म्य समजावून सांगितले आणि ते दर वर्षी ज्वाला मातेच्या दर्शनासाठी जातात हे देखील सांगितले.

यावर अकबराने ध्यानुच्या भक्तीची आणि ज्वाला मातेच्या शक्तीची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्याने ध्यानुच्या घोड्याचे शिर त्याच्या शरीरापासून वेगळे केले आणि ध्यानुला म्हणाला की जर तुझी ज्वाला माता जगाची पालनकर्ता असेल, तर तिला या घोड्याला परत जिवंत करायला सांग.

त्यावर ध्यानुने अकबराला एक महिन्याचा अवधी मागितला आणि महिनाभर या घोड्याचा शरीर आणि शिर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रार्थना केली अकबराने देखील या गोष्टीला मान्यता दिली.

===

हे ही वाचा – या अजब मंदिरात होतात अशा काही गोष्टी ज्यांची कुणी स्वप्नातही कल्पना केली नसेल!

===

त्यानंतर ध्यानुने सर्व भाविकांना सोबत घेऊन पुढचा प्रवास केला. त्यांनी ज्वाला मातेचे मंदिर गाठले. त्याने मातेला प्रार्थना केली, की माझ्या भक्तीची लाज राख आणि तो घोडा तुझ्या कृपेने जिवंत होऊ देत. असं म्हणतात की ज्वाला मातेने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याचा तो घोडा परत जिवंत केला.

 

horse inmarathi

 

जेव्हा हे घडलं तेव्हा अकबर देखील हैराण झाला, की असं कुठलं मंदिर आहे? याचाच विचार करत त्याने आपल्या संपूर्ण सैन्यासहित हिमाचल प्रदेशमधील ज्वाला मातेचं मंदिर गाठलं.

असं अद्भुत मंदिर आणि नेहमीच धगधगणारी अग्नि अकबराने कदाचित पहिल्यांदाच बघितली होती. त्याने मंदिराची परीक्षा बघायचे ठरवले आणि आपल्या सैन्याला ती आग विझवण्यासाठी पाणी टाकण्याचे आदेश दिले. तेथील भाविकांनी केलेल्या विरोधाकडेदेखील त्याने दुर्लक्ष केले.

बादशहा अकबराच्या सैन्याने ती आग विझवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना ते जमलं नाही, प्रचंड प्रयत्न करून देखील आग विजत नाही हे बघून बादशहा अकबर आणि त्याच्या सैन्याने देखील माघार घेतली.

असं म्हणतात की बादशहाने ज्वाला मातेच्या मंदिरासमोर नतमस्तक होत त्या शक्तीला प्रणाम केला. त्याने हार पत्करली होती.

 

jwala mata mandir inmarathi

 

अशी आख्यायिका आहे, की अकबराने प्रचंड प्रयत्न करूनदेखील या मंदिरातील सदोदित पेटता अग्नी त्याला शमवता आली नाही आणि म्हणूनच खजील होऊन अकबराने या मंदिरावर सोन्याचे छत्र बसवण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्वाला मातेने सोन्याचे हे छत्र मान्य केले नाही.

अगदी काहीच क्षणांमध्ये या सोन्याचे रूपांतर इतर कुठल्यातरी पदार्थात झाले असंही म्हटलं जातं. हा नवा धातू मंदिरापासून काही अंतरावर फेकला गेला. या मंदिराच्या जवळ आजही तुम्हाला परिवर्तित झालेला हा पदार्थ बघायला मिळू शकतो.

 

jwala ji mata mandir chhatra given by akbar

 

===

हे ही वाचा – चमत्कारिक : या अद्भुत मंदिरात गेली ९ वर्ष फक्त पाण्याने दिवा लावला जातोय

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?