' दोन भाऊ एकत्र आले, की ताकद कैक पटींनी वाढते! अशाच काही भन्नाट जोड्यांबद्दल...

दोन भाऊ एकत्र आले, की ताकद कैक पटींनी वाढते! अशाच काही भन्नाट जोड्यांबद्दल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कालच भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पंड्या या दोघांनी चांगली कामगिरी करत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

अष्टपैलू कामगिरी करून भारताला विजय मिळवून देणारा कृणाल पंड्या, या सामन्यात आणखी एका कारणासाठी चर्चेत राहिला; ते म्हणजे त्याचं भर मैदानावर भावुक होणं.

हार्दिक आणि कृणाल ही भावांची जोडी काल भारतीय संघाकडून एकत्र खेळली. भावुक झालेला कृणाल काल लहान भाऊ हार्दिकच्या खांद्यावर डोकं टेकवून रडला.

काही दिवसांपूर्वीच या भावांच्या पित्याला देवाज्ञा झाली. आपल्या दोन्ही मुलांनी भारतासाठी एकत्र खेळावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. अखेर हे स्वप्न सत्यात उतरलं आणि त्याचमुळे कृणालला भरून आलं.

 

hardik and krunal pandya inmarathi

 

याच सामन्यात इंग्लंडकडून सॅम आणि टॉम करण ही भावांची जोडी खेळली. अर्थात, दोन भावांनी देशाचं एकाचवेळी प्रतिनिधित्व करणं, ही गोष्ट काही पहिल्यांदाच घडलेली नाही. तर याआधी सुद्धा अशा भावांच्या जोड्या राष्ट्रीय संघासाठी एकत्र खेळल्या आहेत. आज जाणून घेऊयात अशाच काही भावांबद्दल…

१. अँडी आणि ग्रॅण्ट फ्लॉवर

क्रिकेट खेळण्याची फार संधी न मिळणारा आणि तरीही कसोटी मान्यताप्राप्त १२ देशांच्या यादीत सहभागी असलेला क्रिकेट संघ म्हणजे झिम्बाब्वे! या संघाने जेव्हा त्यांच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ पाहिला, तेव्हा हे दोन भाऊ एकाचवेळी संघाचे प्रतिनिधित्व करत होते.

या दोघांनी झिम्बाब्वेसाठी वीस हजारांहून अधिक धावा केल्या. मोठा भाऊ अँडी याने अनेक वर्षं यष्टिरक्षणाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. तो संघाचा कप्तानही होता. तर लहान भाऊ ग्रॅण्ट हा मधल्या फळीतील एक चांगला खेळाडू होता.

 

andy and grant flower inmarathi

 

===

हे ही वाचा – सचिनने नाही, या खेळाडूने केलाय वनडे मधील पहिलं द्विशतक ठोकण्याचा विश्वविक्रम!

===

२. स्टीव्ह आणि मार्क वॉ

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट विश्वात असलेला दबदबा कुठल्या क्रिकेटप्रेमीला माहित नसेल… नव्वदीच्या काळात हा दबदबा निर्माण करण्यात ज्या कर्णधाराने मोलाचा वाटा उचलला तो म्हणजे, स्टीव्ह वॉ!

स्टीव्ह आणि मार्क हे दोन्ही भाऊ ऑस्ट्रेलियासाठी बराच काळ एकत्र खेळले. ऑस्ट्रेलियन संघाच्या फलंदाजीत या दोघांनी उत्तम कामगिरी केली.

 

mark waugh and steve waugh inamrathi

 

कप्तान म्हणून जगातील सर्वाधिक यशस्वी लोकांच्या यादीत स्टीव्हचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. फलंदाजीच्या बाबतीत मात्र मार्क उजवा ठरल्याचं त्यांच्या आकडेवारीवरून लक्षात येईल.

३. ब्रेंडन आणि नॅथन मॅक्लम

न्यूझीलंडचे हे भाऊ बराच काळ एकत्र खेळले आहेत. २००९ ते २०१६ या सात वर्षांच्या काळात हे दोन्ही भाऊ जवळपास प्रत्येक वनडे सामने एकत्र खेळले आहेत.

 

nathan and brendon inmarathi

 

ब्रेंडन चांगला यष्टीरक्षक आणि फलंदाज होता. त्याने काही काळ संघाच्या कर्णधारपदाची धुरा सुद्धा वाहिली. नॅथन ऑफस्पिन गोलंदाजी करायचा.

===

हे ही वाचा – खांद्याला चेंडू लागला, अंपायरने सचिनला आऊट दिलं. तो क्षणभर स्तब्ध झाला आणि…

===

४. इरफान आणि युसूफ पठाण

पठाण बंधू भारताकडून एकत्र खेळले हे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. डावखुरा इरफान  उत्तम अष्टपैलू खेळाडू होता तर मोठा भाऊ युसूफ हा फलंदाज म्हणून संघात आला. स्फोटक फलंदाज म्हणून खेळता खेळात तोही ऑफस्पिन गोलंदाजी करू शकणारा अष्टपैलू तयार झाला.

 

irfan and yusuf inmarathi

 

या भारतीय बंधूंनी भन्नाट फलंदाजी करून  लंकेविरुद्धचा सामना खेचून आणला होता. हा विजयी तडाखा सुद्धा नक्कीच पाहायला हवा.

 

५. केविन आणि निल ओब्रेन

झिम्बाब्वे प्रमाणेच आयर्लंड सुद्धा भावांच्या जोडीच्या बाबतीत मागे नाही. २००७ च्या विश्वचषकात इंग्लंड आणि पाकिस्तानला जोरदार धक्का देणाऱ्या आयर्लंडच्या संघात एक भावाची जोडी खेळत होती.

 

kevin and niall obrein inmarathi

 

विश्वचषक सामन्यात इंग्लंडला धूळ चारण्याची किमया करून दाखवली ती केविनने! १५० धावांच्या आत ५ गडी बाद झालेले असताना केविनने दमदार शतक हाणलं. हा सामना गोऱ्या साहेबांचे डोळे उघडणारा ठरला होता.

६. अॅल्बी आणि मॉर्ने मॉर्केल

दक्षिण आफ्रिका संघाकडून अॅल्बि आणि मॉर्ने हे बंधू खेळले आहेत. अॅल्बी एक चांगला अष्टपैलू होता, तर मॉर्ने हा एक तगडा मध्यमगती गोलंदाज होता.

 

morkel brothers inmarathi

 

स्फोटक फलंदाजी करणारा अॅल्बी बऱ्यापैकी गोलंदाजी सुद्धा करायचा. मात्र, मॉर्नेने त्याच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर कसोटी सामन्यांमध्ये ३०० हुन अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

===

हे ही वाचा – ऑस्ट्रेलियाच्या या २ जुळ्या भावांनी ५ पार्टनरशिपमध्ये भल्याभल्या संघांना धूळ चारली!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?