मोदींबरोबर भारतीय जंगलांत फिरणाऱ्या बेअर ग्रिल्स बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

नुकताच नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ डिस्कव्हरी वाहिनीवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात ते एका व्यक्ति बरोबर जंगलात सफारीवर गेले  आहे, त्या व्यक्तिचं नाव आहे “बेअर ग्रील्स”.

 

modi man vs wild

तर हा बेअर ग्रील्स भारताच्या जंगलात नरेंद्र मोदींना जंगलातील भयावह वातावरणात आपण स्वतचे संरक्षण कसे करायचे याच्या काही सर्व्हायवल टिप्स देणार आहे.

याआधी अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांसोबत आणि असंख्य सेलिब्रेटीज सोबत या बेअर ग्रील्सने अशे अनेक एपिसोड शूट केले आहेत.

पण हा बेअर ग्रील्स नेमका आहे कोण?

चला जाणून घेऊया.

डिस्कव्हरीवर Man Vs Wild हा कार्यक्रम लागतो, त्यात एक माणूस स्वत: जंगलात जातो आणि तेथून बाहेर कसं पडायचं ते शिकवतो. तो व्यक्ती आहे बेअर ग्रील्स ..

हा बेअर ग्रिल्स सर्व्हायव्हल एक्सपर्ट म्हणून संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. निर्जन ठिकाणी कधी अडकलात, तर तेथून बाहेर पडत एखादी वस्ती कशी शोधावी आणि पुन्हा आपलं घर कसं गाठावं हे बेअर ग्रिल्स आपल्या मॅन व्हर्सेस वाईल्ड या शो मधून सांगत असतो.

आज आपण अश्या या ब्रेव्ह माणसाबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया. म्हणजेच आपण बेअर ग्रिल्स हे व्यक्तिमत्त्व अधिक जवळून जाणून घेऊया.

 

bear-grylls-marathipizza
firelabel.co.uk

बेअर ग्रिल्सचं खरं नाव आहे एडवर्ड मायकल ग्रिल्स!

जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा आठवड्याभरा नंतर त्याच्या मोठ्या बहिणीने त्याला ‘बेअर’ नवाने हाका मारायला सुरुवात केली.

 

bear-grylls-marathipizza01
primalsurvivor.net

ही गोष्ट फारच कमी लोकांना ठावूक असेल पण बेअर ग्रिल्सने शॉटोकॅन कराटेमध्ये सेकंड डॅन ब्लॅक बेल्ट मिळवला आहे.

 

bear-grylls-marathipizza02
pinterest.com

त्याने ब्रिटीश आर्मीच्या स्पेशल एयर सर्विसमध्ये राखीव सैनिक म्हणून काम केले आहे.

स्पेशल एयर सर्विसमध्ये कार्यरत असताना १९९६ साली स्कायडाईव्ह करताना त्याचे पॅराशूट फाटले आणि १६,००० फुटांवरून तो थेट खाली कोसळला. ज्यामुळे त्याला जबर दुखापत झाली होती.

 

bear-grylls-marathipizza03
mpora.com

आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे – हा अपघात होऊन देखील पुढच्या १८ महिन्यांमध्ये वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्याने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले.

लहानपणापासूनच त्याचा स्वभाव जिद्दी आणि साहसी होता हे दर्शवणारी ही एक महत्त्वाची गोष्ट!

 

bear-grylls-marathipizza04
dailymail.co.uk

एव्हरेस्टची तयारी करताना त्याने अमा डबलाम नावाचे एक शिखर सर केले होते.

हे तेच शिखर आहे ज्याबद्दल सर एडमंड हिलरी यांनी असे उद्गार काढले होते की,

हे शिखर मनुष्य प्राण्याच्या चढाईसाठी केवळ अशक्य आहे.

पण बेअर ग्रिल्सने या शिखराच्या माथ्याला गवसणी घातली आणि ही कामगिरी करून दाखवणारा तो सर्वात तरुण व्यक्ती ठरला.

 

bear-grylls-marathipizza05
stbtp.blogspot.in

बेअर ग्रिल्सच्या नावावर एक विश्वविक्रम आहे तो म्हणजे- त्याने ७६०० मीटर उंचीवर हॉट एयर बलून मध्ये बसून खुल्या हवेमध्ये डिनरचा आस्वाद घेतला होता.

एवढ्या उंचीवर ऑक्सिजनच्या कमतरतेमध्ये अशी कामगिरी आजवर कोणालाही करता आलेली नाही.

 

bear-grylls-marathipizza06
blog.squadup.com

 

ही गोष्ट काही जणांना किळसवाणी वाटू शकते पण हो हे खरं आहे की बेअर ग्रिल्स स्वत:चे मुत्र पितो आणि मृत पाण्याचे हृदय कच्चे चावून खातो.

या दोन्ही गोष्टी त्याने मॅन व्हर्सेस वाईल्ड या शो वर संपूर्ण जगाला करून दाखवल्या आहेत हे विशेष!

अश्या विचित्र गोष्टी करायला त्याला आवडते असे नाही.

पण एखाद्या निर्जन ठिकाणी जेथे ना पाणी आहे ना खाणे, अश्यावेळी माणसाने अजिबात विचार न करता स्वत:चे प्राण वाचवण्याच्या उद्देशाने अश्या गोष्टी केला तर चूक काही नाही असे त्याचे म्हणणे!

 

bear-grylls-marathipizza07

 

बेअर ग्रिल्सला भारतीय सैन्यामध्ये दाखल व्हायची आणि सियाचीन मध्ये जाऊन जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमीवर कर्तव्य बजावण्याची खूप इच्छा होती.

परंतु भारतीय सैन्यामध्ये केवळ भारतीय नागरिकालाच प्रवेश मिळत असल्याने त्याची ही इच्छा अपूर्ण राहिली. परंतु त्याला भारतीय सैन्याबरोबर काही दिवस व्यतीत करण्याची संधी मिळाली.

दरम्यानच्या काळात त्याने भारतीय सैन्याकडून गिर्यारोहण आणि इतर आवश्यक कौशल्ये शिकून घेतली, ज्याचा त्याला पुढे एव्हरेस्ट मोहीमेवर फायदा झाला.

 

bear-grylls-marathipizza08
twitter.com

त्याने मॅन व्हर्सेस वाईल्ड मधून संपूर्ण क्रू सोबत जगातील सर्वच धोकादायक प्रदेशांमध्ये शुटींग केलं आहे आणि लोकांना तेथून बाहेर कसं पडायचं ते शिकवलं आहे. हा देखील एक आगळावेगळा विक्रम आहे.

 

bear-grylls-marathipizza09
muzak4321.blogspot.in

बेअर ग्रिल्स बद्दलच्या या अज्ञात आणि प्रेरणा देणाऱ्या गोष्टी वाचून बेअर ग्रिल्सचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणाऱ्या भटक्यांना नवी उमेद मिळाली असेल हे मात्र नक्की!

 ===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “मोदींबरोबर भारतीय जंगलांत फिरणाऱ्या बेअर ग्रिल्स बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी

  • August 9, 2019 at 5:22 pm
    Permalink

    super

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?