' निर्माल्याला पुन्हा उपयोगात आणून निर्वाह करणाऱ्या महिलांना हवी तुमची साथ! – InMarathi

निर्माल्याला पुन्हा उपयोगात आणून निर्वाह करणाऱ्या महिलांना हवी तुमची साथ!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

विकास आणि प्रगतीच्या नावावर ज्या निसर्गापासून सजीव निर्माण होतात, त्याच निसर्गाला माणूस हानी पोहोचवत असल्याचं चित्र आहे. करोनाच्या निमित्ताने मागील वर्षभरापासून आपल्याला त्याची चांगली प्रचिती येत आहे. त्यामुळं यापुढं आपल्या जगण्याची प्रत्येक सवय निसर्गाला पूरक होईल का याचा विचार करणं क्रमप्राप्त ठरलं आहे.

घरातला ओला व सुका कचरा, रद्दी, भंगार साहित्य वगैरेंचं विघटन किंवा पुनर्निमिती शक्य असते. मात्र आपल्या श्रद्धेचं स्थान असलेल्या परमेश्वराच्या आराधनेत वापरण्यात येणारे फुलं, पानं, दुर्वा आणि अन्य तत्सम पदार्थांचं काय? पूजेत वापरण्यात येणाऱ्या या सर्व घटकांना एकत्रितपणे निर्माल्य म्हटलं जातं.

आपण निर्माल्य एकतर वाहत्या पाण्यात सोडतो किंवा अलिकडे स्थानिक प्रशासनानं उपलब्ध करून दिलेल्या कलशामध्ये ठेवतो. पण या निर्माल्याचं काय होतं माहिती आहे का? नदीत सोडलेलं निर्माल्य नदीकिनारी किंवा पाण्याबरोबर काही अंतर वाहत जाऊन जिथं प्रवाह कमी आहे; तिथं अडकून राहतं आणि स्थानिक प्रशासनामार्फत ते संकलित केलं जातं.

याशिवाय निर्माल्य पाण्यात विसर्जित केल्याने पाण्यातील ऑक्सिजन खेचून घेतला जातो. त्यामुळे पाण्यात राहणाऱ्या जलचरांना धोका निर्माण होतो. परिणामी जलचक्र संकटात सापडण्याचीही शक्यता असते.

अजोड श्रद्धेची किनार असलेल्या निर्माल्यातून पुन्हा देवपूजेसाठीच मंगल असं काही बनवता आलं तर? होय, हा प्रयोग पुण्यामध्ये यशस्वीरित्या सुरु आहे.

पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया पुणे, गो विज्ञान संशोधन संस्था आणि थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच यांनी मिळून एकत्रितपणे कामधेनू महिला बचत गटामार्फत निर्माल्यातून उदबत्ती तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.

या प्रकल्पाद्वारे पुणे शहरातील मंदिर आणि इतर ठिकाणांहून निर्माल्य संकलित केले जाते. त्यावर प्रक्रिया केली जाते आणि कोणत्याही कृत्रिम रसायने किंवा यंत्रांशिवाय उदबत्तींची निर्मिती केली जाते.

निरनिराळ्या नैसर्गिक तसेच आयुर्वेदिक घटकांचा आणि पंचगव्याचा वापर करून बचत गटातील महिला यंत्रांशिवाय स्वत:च्या हातांनी बांबूविरहित उदबत्त्या तयार करतात.

कामधेनू महिला बचत गटातील महिला निर्माल्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या  उदबत्त्या तयार करतात. त्यामध्ये श्रीकृष्ण, पंचयाग, सप्तचिरंजिव या तीन प्रकारांचा समावेश आहे. या तीनही प्रकारात वीस वेगवेगळ्या सुगंधांमध्ये उदबत्त्या तयार केल्या जातात..

निर्माल्यापासून तयार करण्यात येणाऱ्या उदबत्तींचे वैशिष्ट्ये

  • थेट निर्माल्यापासून उदबत्ती तयार केली जाते.
  • उदबत्ती तयार करताना त्यामध्ये वेगवेगळ्या नैसर्गिक-आयुर्वेदिक घटकांचा आणि पंचगव्याचा वापर केला जातो.
  • कोणत्याही कृत्रिम रसायनांचा वापर केला जात नाही.
  • उदबत्ती तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या यंत्रांचा वापर नाही.
  • उदबत्तीसाठी बांबूचा वापर करण्यात येत नाही.
  • या उदबत्त्या वातावरण मंगलमय, पवित्र आणि सकारात्मक राखण्यास उपयुक्त.
  • उदबत्ती प्रकल्पामुळे बचत गटातील अनेक महिलांना रोजगार प्राप्त.
  • आकर्षक पॅकिंग, घरपोच डिलीव्हरी.
  • तीन प्रकारच्या उदबत्त्या वीस वेगवेगळ्या सुगंधात उपलब्ध.
  • केवळ ७० रुपयांमध्ये ५० उदबत्त्यांचे पाकिट उपलब्ध.

incense

हे सर्व सुरळित सुरु असताना लॉकडाऊनचा जबरदस्त फटका या प्रकल्पाला बसला. या प्रकल्पात तयार होणाऱ्या उदबत्त्यांच्या विक्री आणि वितरणावर लॉकडाऊनमुळे मर्यादा आल्या. परिणामी उदबत्त्यांच्या उत्पादनावरच मर्यादा ठेवाव्या लागल्या. दुर्दैवाने यामुळे काही महिलांचा रोजगार थांबला.  अचानक रोजगार थांबल्याने या महिलांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या महिलांना कुटुंबाच्या निर्वाहाचे आव्हान समोर उभे राहिले आहे.

===

उदबत्ती खरेदी करण्यासाठी तसेच व्यावसायिक चौकशीसाठी संपर्क :  ८२६३०४८३८७

व्हॉटपॲपद्वारे संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा.

===

दरम्यान लॉकडाऊनमध्ये निर्माण झालेल्या मोठ्या प्रमाणावरील उदबत्त्या विक्रीचे आव्हान या प्रकल्पासमोर आहे. या प्रकल्पाचे संचालक प्रशांत अवचट यांनी या प्रकल्पात लोकसहभागाचे आवाहन केले आहे.

यावेळी खास ‘इनमराठी’शी बोलताना प्रशांत अवचट म्हणाले की,

आपण देवपूजेसाठी इतर प्रकारच्या उदबत्ती खरेदी करण्याऐवजी या उदबत्त्या खरेदी कराव्यात. पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त आणि वातावरण पवित्र करणाऱ्या या उदबत्त्या तुमच्या घरात प्रसन्नता आणतील. शिवाय आपली एक छोटीशी कृती या प्रकल्पात काम करणाऱ्या महिलांना रोजगाराचे साधन मिळवून देऊ शकते.

thamb creative

ज्यांना या उदबत्त्यांच्या विक्री-वितरण व्यवस्थेत सहभागी व्हायचे आहे, त्यांचेही स्वागत आहे. म्हणजेच होलसेलर्स, किरकोळ विक्रेते, ट्रेडर्स, किराणा आणि अन्य दुकानदार आणि अन्य व्यावसायिकांचेही उदबत्ती वितरणाकरिता स्वागत आहे. प्रकल्पासोबत काम करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, समूह, व्यापाऱ्यांना सन्मानजनक मानधन आणि विक्रीसंदर्भातील सहकार्य पुरविले जाईल.

प्रकल्पातील वितरण व्यवस्थेचे काम अद्याप सुरु असल्याने सध्या पुणेतील केवळ काही निवडक किराणा दुकानातच या उदबत्त्या उपलब्ध आहेत. मात्र, तुम्ही फोन करून ऑर्डर दिल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच उदबत्ती उपलब्ध होतील.

उदबत्ती खरेदीसाठी खाली दिलेला फॉम भरून द्या किंवा थेट फोनद्वारे किंवा व्हॉटसॲपद्वारे संपर्क करावा. या प्रकल्पासोबत व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांनीही सोबत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.

तुम्ही उदबत्ती खरेदी केलीत तर काही महिलांच्या घरातील चूल पेटणार आहे. त्यामुळे चला सामाजिक जाणीवेचे भान राखून या प्रकल्पातील उदबत्ती खरेदी करून आपल्या परीने खारीचा वाटा उचलून महिलांच्या प्रकल्पाला बळ देऊयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?