' अल्झायमरला दूर ठेवण्यासोबतच बुद्धिबळ तुमच्यासाठी या १० जादुई गोष्टी घडवून आणतं! – InMarathi

अल्झायमरला दूर ठेवण्यासोबतच बुद्धिबळ तुमच्यासाठी या १० जादुई गोष्टी घडवून आणतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जर तुम्हाला उतारवयात अल्झायमर, पार्किन्सन्स, एन्झायटी, डिमेन्शिया असे आजार नको असतील तर एक भारतीय खेळ तुम्हाला उपयोगी पडू शकतो. त्यासाठी खूप काही खर्च करायची गरज नाही फक्त दोन लोकच या खेळासाठी आवश्यक असतात.

 

chess inmarathi

 

म्हणजे खेळाडू देखील जास्त लागत नाहीत. तर असा हा खेळ आहे बुद्धिबळ! बुद्धिबळ खेळ खेळण्याचे अनेक फायदे आहेत तेच माहीत करून घेऊ.

 

१) मेंदू तल्लख होतो

 

brain function featured inmarathi

 

आपल्या मेंदूच्या ज्या भागातून सर्व शरीराला हालचाली करण्याचे संदेश दिले जातात तिथल्या छोट्या छोट्या नसा बुद्धिबळ खेळल्यामुळे जास्त कार्यरत होतात. त्यामुळे शरीराच्या हालचाली, विचार करण्याची क्षमता देखील अधिक वेगाने व्हायला लागतात.

बुद्धिबळ खेळल्याने ग्रहणक्षमता वाढते. मेमरी गेम खेळल्यास बुद्धिबळ खेळणारी व्यक्ती जास्त वस्तू जशाच्या तशा आठवू शकते.

===

हे ही वाचा जगात सर्वांच्या बुद्धीचा कस लावणारं ‘बुद्धिबळ’ भारतात कसं जन्मलं याची रोचक कहाणी!

===

२) मेंदूचे डावा आणि उजवा हे दोन्ही भाग एकत्र सक्षम होतात

 

brain InMarathi

 

आपण कायमच मेंदूचा उजवा भाग जास्त वापरत असतो. पण बुद्धिबळाच्या खेळामुळे आपल्या मेंदूचा उजवा आणि डावा भाग तितकाच वापरला जातो. समोरच्याच्या चालीचा विचार करून पुढे काय करायला पाहिजे याचा अंदाज येतो.

हा एक प्रकारे मेंदूचा व्यायामच आहे आणि त्यामुळेच मेंदू जास्त सजग राहतो. ज्याचा आपल्या दैनंदिन जीवनात देखील खूप उपयोग होतो.

 

३) पार्किन्सन्स होण्यापासून बचाव होतो

 

parkinson inmarati

 

पार्किन्सन्स या आजाराबाबत एक अभ्यास केला गेला आहे. एका मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये ४८८ जेष्ठ नागरिकांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये काही नागरिकांना बुद्धिबळ खेळण्यास सुचवलं गेलं आणि काहींना बुद्धिबळ खेळण्यास दिलं गेलं नाही.

त्यानंतर त्या नागरिकांच्या मेंदूचा अभ्यास केला तर असं दिसून आलं की, बुद्धिबळ खेळणाऱ्या लोकांमध्ये अल्झायमर, डिमेन्शिया, पार्किन्सन्स होण्याचा धोका कमी आहे.

तर जे लोक बुद्धिबळ खेळत नाहीत नव्हते त्यांना मात्र पार्किन्सन्स, अलझायमर, डिमेंशिया हे आजार होण्याची भीती अधिक आहे.

 

४) स्किझोफ्रेनिया आजारातही बुद्धिबळाचा उपयोग होतो

 

schizophrenia inmarathi

 

स्किझोफ्रेनिया या आजारावरील संशोधन हे फ्रान्स मध्ये पॅरिस येथे करण्यात आलं आहे. या संशोधनानुसार ज्या व्यक्तींना स्किझोफ्रेनिया आहे त्यांना बुद्धिबळ खेळण्याची सवय लावण्यात आली.

जे रुग्ण बुद्धिबळ खेळायचे त्या जेष्ठ नागरिकांच्या हालचाली, लक्ष देणे, प्लॅनिंग करणे यांमध्ये सुधारणा झालेले दिसून आले तर जे रुग्ण खेळत नव्हते त्यांना आजाराचा त्रास झाला.

या संशोधनाचे विशेष म्हणजे ज्या रुग्णांना बुद्धिबळ खेळायला लावला त्यांना त्याची इतकी सवय झाली की संशोधनाचे दिवस संपल्यानंतर देखील हे रुग्ण दररोज बुद्धिबळ खेळत होते.

 

५) बुद्धिबळ खेळणाऱ्या मुलांचा सर्वांगीण विकास होतो

 

kids playing chess inmarathi

 

जर लहानपणापासूनच मुलांना बुद्धिबळ खेळण्याची सवय लावली तर त्यांच्या वाचन, गणित सोडवण्यातील अचूकता, प्रॉब्लेम्स सोडवणे या सगळ्यांमध्ये प्रगती खूप लवकर होते.

म्हणूनच अनेक शिक्षण तज्ञ मुलांना लवकरात लवकर बुद्धिबळ खेळण्याची सवय लावा असे सांगतात.

===

हे ही वाचा केरळातील अख्खं गाव “नशेडी” झालं असताना, बुद्धिबळाच्या पटाने सगळं चित्र पालटलं!

===

साधारणपणे इयत्ता दुसरीमध्ये गेलेल्या मुलांना बुद्धिबळ शिकवलं पाहिजे. पण काही काही मुलं वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापासूनच बुद्धिबळ शिकतात ही खरोखरच चांगली गोष्ट आहे.

६) बुद्धिबळ खेळण्याने आत्मविश्वास वाढतो

 

confidence inmarathi

 

नॉर्वेच्या ग्रँड मास्टर कार्लसन याच्या म्हणण्यानुसार बुद्धिबळ तुम्हाला केवळ शांतताच देत नाही तर विचार करण्याची क्षमतादेखील प्रदान करतो. माणसाचा स्वतःकडेच बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आत्मविश्वास वाढीला लागतो.

एखाद्या डावात हरलो तरी नक्की कुठे चुका झाल्या याकडे शांतपणे पाहिलं जातं आणि जिंकलो तर कोणत्या चुका टाळल्या हे लक्षात येतं.

आपण स्वतःच आपले परीक्षण करतो. हार जीत यापेक्षाही स्वतःची प्रगती कशी होईल याकडे लक्ष लागतं. यामुळे आत्मविश्वास वाढतो, मन कणखर होते.

 

७) ॲपवर देखील बुद्धीबळ खेळून फायदा होऊ शकतो

 

chess on mobile inmarathi

 

सध्या मुलांना मोबाईल आणि ॲप यांचे इतके प्रचंड वेड आहे की मुलं मैदानी खेळ देखील जास्त खेळत नाहीत. त्या मुलांना मोबाईलवरील इतर गेम्स खेळण्यापेक्षा बुद्धिबळ खेळण्यास प्रवृत्त केले तर नक्कीच फायदा होईल.

मोबाईलवर आज बुद्धिबळाचे अनेक ॲप्स उपलब्ध आहेत. जी मुलं छोट्या छोट्या गोष्टींनी पॅनिक होतात त्यांच्यासाठी हे ॲप खूप उपयोगी आहे. या ॲपमध्ये मुलांच्या क्षमतेनुसार अवघड लेवल येत जाते. त्यामुळेच मुलं मग शांतपणे विचार करू शकतात.

 

८). ADHD ची लक्षणं कमी होतील

 

adhd inmarathi

 

ADHD म्हणजे काय तर (attention deficit hyperactivity disorder) काही मुले ही अतिरिक्त ऊर्जेने भरलेली असतात त्यामुळे त्यांचं एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित होत नाही.

अशा मुलांना बुद्धिबळ खेळण्यास शिकवलं तर काही फायदा होतोय का हे पाहण्यासाठी २०१६ मध्ये शालेय मुलांवर संशोधन करण्यात आलं. त्यांच्या उपचार पद्धतीत बुद्धिबळ खेळाचा समावेश करण्यात आला. त्यानुसार ४१% मुलांमधली हायपर ऍक्टिव्हिटी कमी होऊन लक्ष देण्याकडे त्यांचा कल वाढला.

 

९) बुद्धिबळ एक सर्जनशील थेरपी

 

chess therapy inmarathi

 

आता अनेक थेरपिस्ट आणि समुपदेशक आपल्या ग्राहकांना आत्मजागरूकता वाढवण्याकरिता बुद्धिबळ खेळण्याचे सुचवत आहेत. या नवीन क्रिएटिव थेरेपीमध्ये बुद्धिबळ खेळताना येणारा स्ट्रेस, चॅलेंजेस काय आहेत आणि त्याला ते ग्राहक कसे सामोरे जातात यावर हे थेरपिस्ट लक्ष ठेवतात.

ग्राहकाच्या प्रत्येक हालचाली ते टिपून घेतात. त्यावरूनच आयुष्यात येणारी संकट किंवा अडचणी यावर मात करण्यासाठी काय करायला हवं याचं मार्गदर्शन हे थेरपिस्ट आणि समुपदेशक आपल्या ग्राहकांना करतात.

 

१०) बुद्धिबळ खेळल्याने क्रिएटिव्हिटी वाढते

 

creativity inmarathi

 

भारतातल्या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार बुद्धिबळ खेळल्याने क्रिएटिव्हीटी वाढते. हे संशोधन करताना शाळेतल्या मुलांचे दोन गट केले. त्यातील एका गटाला काही महिने बुद्धिबळ खेळण्यास देण्यात आले. आणि दुसऱ्या गटातील मुलांच्या खेळातून बुद्धिबळ वगळले.

या दोन्ही गटातील मुलांना काही वस्तू दिल्या आणि त्यापासून वेगवेगळे पॅटर्न बनवायला सांगितले. तर जी मुले बुद्धिबळ खेळत होती, त्या मुलांनी खुप वेगवेगळी सुंदर पॅटर्न बनवले. जी बुद्धिबळ न खेळणारी मुलं बनवू शकली नाहीत.

===

हे ही वाचा बुद्धिबळाच्या सहाय्याने दारूमुक्ती करणाऱ्या गावाची प्रेरणादायी गाथा

===

म्हणूनच लहानपणापासून मुलांच्या खेळात बुद्धिबळाचा समावेश करावा.

त्यामुळे एकाच ठीकणी बसून एकाग्र चित्ताने विचार करण्याची सवय मुलांना लागते. तसचं पुढील आयुष्यातदेखील बुद्धिबळ खेळाचा उपयोग होतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?