' या १० टिप्स माहीत असतील तर आपल्या स्मार्टनेसने इतरांवर सहज छाप पाडू शकाल!

या १० टिप्स माहीत असतील तर आपल्या स्मार्टनेसने इतरांवर सहज छाप पाडू शकाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो. ‌समजू लागल्यापासून त्याला सतत काही ना काही शिकायला मिळत असतं, मग तो शाळेचा अभ्यास असू दे किंवा जगात वागायचं व्यवहार ज्ञान. भेटणारा प्रत्येक माणूस आपल्या वागण्या बोलण्यातून काही तरी शिकवून जातो.

कुणी कसं असावं हे शिकवतात, कुणी कसं नसावं हे शिकवतात, कुणी गोड बोलून लोक संग्रह करतात, कुणी उत्तम व्यवस्थापन करु शकतात, कुणाची विनोदबुद्धी उत्तम असते तर कुणी उत्तम श्रोता असतो..कुणी उत्तम वक्ता असतो.. थोडक्यात सांगायचं तर, जगात कुणीही आणि काहीही निरुपयोगी नाही!

आपल्यापैकी प्रत्येकाला काहीतरी वेगळं येतच असतं. म्हणजे आपलं व्यवहारातील वागणं सोडून द्या, आपला पोटापाण्याचा उद्योग सोडून काहीतरी प्रत्येक जण करु शकत असतो. पण बहुतेक वेळा अनेक लोकांना असं वाटत असतं की शिकायला फक्त शाळेतच जावं लागतं.

 

learning inmarathi

 

शाळा संपली की शिक्षण संपलं. मात्र शाळा कॉलेजमधील शिक्षण संपलं की जगाची बिनभिंतीची शाळा सुरु होते. तिथं तर रोज नवा पाठ असतो. रोज नवी परीक्षा असते. आणि वैशिष्ट्य असं की इथला एकाचा पेपर दुसऱ्यासारखा नसतो, एकमेकांची काॅपी करता येत नाही.

अनुभव हाच गुरू असतो. त्याची पध्दत फार वेगळी. शाळेत अभ्यास करुन परीक्षा द्यायची असते, पण जगाच्या शाळेत आधी परीक्षा मग धडा! ते काही असो, पण नित्य नव्या अनुभवानंतर जीवन समृद्ध होतं हे पण त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि असं समृद्ध असलेलं जीवन असलेली व्यक्ती विनम्र, विनयशील होते.

म्हणजेच हे अनुभवांची जोड असलेलं व्यक्तीमत्व चांगला माणूस म्हणून आकाराला येतं. पण त्यासाठी आवश्यक असते नित्य नवं शिकण्याची इच्छा! असं रोज काही नवं शिकायला मिळतं तेव्हा काय होतं?

१. विविध प्रकारच्या विषयांची माहिती मिळून बहुआयामी व्यक्तिमत्त्व तयार होते.

२. नव्या नव्या कल्पना सुचतात.

३. आत्मविश्वास वाढतो.

४. इतर लोकांसाठी पण प्रेरणास्थान ठरु शकता.

===

हे ही वाचा करिअरमधील अपयश टाळण्यासाठी, “ह्या १०” प्रश्नांवर विचार करायलाच हवा!

===

५. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक जाणीवा प्रगल्भ होतात.

पण हे नवं शिकायचं असेल तर काय करायचं? इंटरनेटच्या माध्यमातून अवघं जग एका क्लिकवर येऊन थांबलं आहे. जे जे काही उत्तम आहे ते ते सारं एका बटणावर आपण मिळवू शकतो.

मग हेच आपलं ज्ञानाचं क्षितीज विस्तारण्यासाठी काही टिप्स-

१. विकीपिडीयाच्या आर्टिकल्स लिंक सबस्क्राईब करा

 

wikipedia inmarathi

 

विकीपिडीया हा माहितीचा महासागर आहे. जगातील कोणताही विषय विकीपिडीयाला वर्ज्य नाही. त्यावर रोज नवनवी आर्टिकल पोस्ट केली जातात. या Featured Article ना सबस्क्राईब केलं की आपल्याला नवीन आर्टिकल प्रसिद्ध झाली की सूचना देणारा मेसेज येतो. म्हणजे नवं आर्टिकल लगेचच आपण वाचू शकतो.

 

२. शब्दकोशांची होमपेज बघा

 

dictionary inmarathi

 

बहुभाषिक असणं ही फार मोठी गोष्ट आहे. साधारणपणे एका माणसाला किमान दोन भाषा येतातच. पण परदेशी भाषा पण आपण घर बसल्या शिकू शकतो. त्यासाठी या भाषांचे शब्दकोश आपल्याला इंटरनेटवर उपलब्ध आहेत.

त्यांची होमपेजेस पाहीली तरी टप्प्या टप्प्याने आपण ती भाषा समजू शकतो, शिकू शकतो. म्हणून आपलं भाषिक ज्ञान वाढवण्यासाठी इंटरनेट उपयुक्त आहे.

३. कलाकृती सादर करणाऱ्या पेजेसना सबस्क्राईब करा

 

online arts inmarathi

 

जर तुम्हाला कलाकौशल्य चित्रकला किंवा इतर प्रकारच्या कलांमध्ये रुची असेल तर अशी पेजेस सबस्क्राईब करा. ज्यामुळे तुम्हाला कलाकृती निर्माण करायला वेगवेगळ्या अभिनव कल्पना मिळतील.

सोशल मिडिया वर तर असे विविध ग्रूप आहेत ज्यावर कलाकृती तयार करण्याचे व्हिडिओ, फोटो अपलोड केलेले आढळतात. त्याला मोटीफ असं म्हणतात. ते पाहून आपण तसे पॅटर्न बनवू शकतो.

 

४. हे तुम्हाला माहीत आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या चॅनलना सबस्क्राईब करा

 

youtube inmarathi

 

जग इतकं अफाट मोठं आहे की ते दोन डोळे आणि एका मेंदूत सामावलं जाणं कठीण आहे. तरीही असे काही लोक आहेत जे या अफाट पसाऱ्यात सुईसारख्या प्रश्नांची उत्तरं शोधून देत असतात.

अगदी ढगांचा रंग पांढरा का आहे? इथपासून औद्योगिक क्रांतीपर्यंतची उत्तरे या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. बऱ्यापैकी रोजच या साईट अपडेट केल्या जातात. अशा साईट्सना भेट द्या.

===

हे ही वाचा यशाचं सिक्रेट म्हणजे फक्त या “५ गोष्टी”, मात्र तुम्ही दाखवायला हवे सातत्य!

===

५. Podcast ऐका

 

podcast inmarathi

 

Podcast म्हणजे इंटरनेटवर मिळणारी डिजिटल रेकॉर्ड. याद्वारे लोक राजकारण ते शास्त्र आणि कला यांच्या माहितीची देवाण-घेवाण करत असतात.

गाडी चालवता चालवता हे पोडकास्ट ऐकून आपलं ज्ञान अद्ययावत करायची सोपी पद्धत अवलंबली तर सर्वसमावेशक ज्ञान आपल्याला सहज मिळू शकतं.

 

६. सतत प्रयोगशील वृत्ती ठेवा

 

be experimental inmarathi

 

प्रत्येक मोठ्या माणसात एक लहान मूल दडलेलं असतं. त्याला सतत काही ना काही शंका सतावत असतात. ते धडपडत आपलं आपलं ज्ञान मिळवायला बघत असतं. ते मूल नेहमी जागं ठेवा. प्रयोगातूनच आपल्याला नवे नवे रस्ते सापडत असतात. म्हणून प्रयत्न सोडू नका.

 

७. चुकांकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघा

 

learn from mistakes inmarathi

 

आयुष्यात काम करताना चुका होतातच. चुका होतच नाही असा माणूस तो ज्यानं प्रयत्न केलेच नव्हते.

चुका हे अपयश म्हणून नाही तर ज्ञानाची पायरी म्हणून बघा म्हणजे त्या सुधारायचे मार्गही आपोआपच सापडतील आणि अनुभवाची शिदोरी जमेत होईल ती वेगळीच.

 

८. ऑफिसच्या रुटीनमध्ये थोडा बदल करा

 

office routine inmarathi

 

ऑफिस एके ऑफिस असं कंटाळवाणं वेळापत्रक ठेवू नका. जेवायला सहकाऱ्यांना घेऊन बाहेर जा, कधी कधी दुसऱ्या विभागातील लोकांनाही सोबत घ्या, बोला, यामुळे कितीतरी मित्र मिळतील आणि समस्यांवरील तोडगे पण!

 

९. आपले मित्र, मार्गदर्शक यांचे सल्ले घ्या

 

advice inmarathi

 

कधी कधी आपल्याला पण समजत नाही असे कठीण प्रसंग समोर येतात. तेव्हा आपले‌ चांगले मित्र, उत्तम मार्गदर्शक यांना फोन करा आणि विचारा. मनमोकळ्या लोकांची कुठंही अडवणूक होत नाही. मन नेहमी स्वच्छ ठेवा.

 

१०. तुमची वैशिष्ट्ये तुमची ताकद बनवा

 

strenth inmarathi

 

प्रत्येक माणसाचं वैशिष्ट्य वेगळं असतं. स्वतःला ओळखा. तुम्ही काय करु शकता आणि काय नाही याचा शोध घ्या. ज्या उणिवा आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करत रहा आणि जी शक्तीस्थानं आहेत त्यांच्या मदतीनं आपलं काम उत्तम रितीने पार पाडा.

थोडक्यात सांगायचं तर, पुस्तकं आणि माणसं वाचत रहा…प्रगती शंभर टक्के होतेच.

===

हे ही वाचा बेरोजगार ते बिलियन डॉलर्सचा मालक ई-कॉमर्स जगतातला खरा ‘अलिबाबा’ – जॅक मा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?