'गुजरातच्या आयपीएस अधिकाऱ्यांनी पत्रांमार्फत नरेंद्र मोदींवर आरोप केले होते

गुजरातच्या आयपीएस अधिकाऱ्यांनी पत्रांमार्फत नरेंद्र मोदींवर आरोप केले होते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपली कातडी वाचवण्यासाठी राजकारणी काही ना काही करत असतात, आरोप प्रत्यारोपाचं राजकारण तर आपल्याला नवीन नाही. गेल्या वर्षभरापासून जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात चालेले आहे, ते आता सामान्य जनतेला सवयीचे झालेले आहे. सत्तेत आलेलं सरकार वर्षभरापासूनच कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसून येते.

 

parmbir inmarathi

हे ही वाचा – इशरत जहाँ, डोकलाम आणि भारतातला उरला सुरला विरोधी पक्ष संपवणारे भाजपचे हस्तक

मागच्या निवडणुकीत सत्तेवर आलेला पक्ष आज विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेला आहे. सर्वात जास्त जागा निवडून येऊन सुद्धा आज विरोधी पक्षाचे काम करावे लागत असल्याने, विरोधी पक्ष हा जास्त आक्रमक झालेला दिसून येतोय. सरकार टिकणार नाही, राष्ट्रपती लागवट लागू करा, मंत्र्यांचे राजीनामे अशा घोषणा ते वारंवार करताना दिसून येत आहे.

गेल्या दोन तीन दिवसापासून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांना लिहलेल्या पत्रावरून वातारण चांगलेच तापलेले आहे. विरोधी पक्ष राजीनाम्याची मागणी करत आहे तर सत्ताधारी पक्ष गृहमंत्र्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्यामध्ये होणारा हा पत्रव्यव्हार नवा नाही.

 

modi amit shah inmarathi

 

२०१३ साली जेव्हा नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी घेऊ लागले होते तेव्हा अशाच एका गुजरातच्या आयपीएस अधिकाऱ्यांना तर थेट आजचे गृहमंत्री मा.अमित शहा यांना पत्र लिहून त्यात ‘आपल्याला चुकीच्या एन्काऊंटर प्रकरणी निलंबित केले आहे’. असे नमूद केले होते. 

नक्की प्रकरण काय?

कोणतंही प्रकरण उघडकीस आल्यावर त्या संबंधित अधिकाऱ्याचा राजीनामा मागितला जातो. वंजारा हे आयपीएस अधिकारी म्हणून गुजरातमध्ये कार्यरत होते . वंजारी यांनी २०१४ साली राजीनामा दिला होता.

राजीनामा देत असताना त्यांनी दहा पानी पत्र लिहीत, आजचे ‘पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी व गृहमंत्री मा.अमित शहा यांच्यावर चुकीच्या एन्काऊंटर प्रकरणात मला गोवले आहे’, असा आरोप त्यांनी लावला.

 

vanjara 4 inmarathi

हे ही वाचा – जेव्हा शरद पवारांनी १९९३ मधील १३ वा बॉम्बस्फोट शोधून काढला…!!

सोहराबुद्दीन केस तर मोठ्या प्रमाणावर २००० साली गाजली होती. त्यात अनेक बड्या मंडळींचा सहभाग होता. शेखच्या एन्काऊंटरमध्ये  प्रजापती हा एकमेव साक्षीदार होता, त्यांचा देखील २००६ साली एन्काऊंटर करण्यात आला. ज्या ठिकाणी प्रजापतीचा एन्काऊंटर करण्यात आला त्याच भागात १३ दिवसांपूर्वीच वंजारा यांची बदली करण्यात आली होती. 

या प्रकरणामुळे साहजिक सर्वत्र चर्चा होऊ लागली आणि वंजारा यांच्यावर बोट ठेवण्यात आले. वंजारा यांना अटक ही करण्यात आली होती. तसेच या प्रकरणावरून २०१३ साली ३२ आयपीएस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती ते सर्व वंजारा यांनी प्रशिक्षित केलेले अधिकारी होते.

 

vanajri 2 inmarathi

 

डी.जी  वंजारा नेमके कोण होते?

८० च्या दशकात त्यांनी पोलीस खात्यात डेप्युटी सुप्रिडेंट म्हणून आपल्या करियरची सुरवात केली. १९८७ साली ते आयपीएस ऑफिसर म्हणून त्यांचे प्रमोशन झाले. त्यानंतर काही काळ ATS  ऑफिसरमध्ये सुद्धा काही काळ काम केले. ज्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती तेव्हा ते कच्छच्या सीमेवर काम करत होते.

 

vanjari 1 inmarathi

 

वंजारा यांनी लिहलेल्या पत्रामध्ये त्यांनी अनेक मुद्दे लिहले होते ज्यात त्यांनी असे नमूद केले होते की देशातील अनेक प्रामाणिक पोलीस अधिकारी आहेत ज्यांनी दशतवाद विरोधात अनेक मोठे पराक्रम गाजवूनसुद्धा जेल मध्ये ठेवण्यात आले आहे.

२००७ साली त्यांनाही अटक करण्यात आली. २००९ सालीत्यांना क्लीनचिट मिळून ते सेवेत रुजू झाले. २०१४ साली ते रिटायर सुद्धा झाले.

त्याकाळात त्यांनी हे पत्र लिहलेले होते तेव्हा काँग्रेस विरोधी पक्षात होते. तेव्हा काँग्रेसवाले सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे राजीनामे मागत होते.

हे प्रकरण अगदीच जुने नाही पण अशाच प्रकरणाची आज पुनरावृत्ती होत आहे. राजकारणी त्यांच्या कामासाठी हव्यातश्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करतात. आपल्या मर्जीचे अधिकारी बसवतात आपले काम साध्य करून घेतात. जर ते काम अंगाशी येत असल्यास अधिकाऱ्यांकडे बोट दाखवून रिकामे होतात.

===

हे ही वाचा – ‘सर्वात धडाडीचे’ म्हणून प्रसिद्ध असणारे नगराळे ३ वर्षांपूर्वी एका चुकीमुळे मागे पडले होते

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?