' "काही दिवस घरकाम करायला आलं नाही तर चालेल का? मला निवडणूक लढवायचीये!"

“काही दिवस घरकाम करायला आलं नाही तर चालेल का? मला निवडणूक लढवायचीये!”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चा फक्त एकाच गोष्टीची आहे ती म्हणजे बंगाल निवडणूक विषयी, आणि या होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी कशी कंबर कसून कामाला लागली आहे त्याचं चित्र आपण गेल्या काही दिवसांपासून बघत आहोत!

मिथुन चक्रवर्ती या बॉलिवूडच्या अभिनेत्याचा भाजपा मध्ये प्रवेश आणि नक्षली बॅकग्राऊंडचा असूनसुद्धा भाजपाने त्याला सामावून घेणं ही काही छोटी मोठी गोष्ट नाही!

===

हे ही वाचा इथून, तिथून शेवटी मिथुन भाजपमध्ये: नक्षलवादी ते नेता, वाचा एक भन्नाट राजकीय प्रवास

===

mithun chakraborty inmarathi

 

आजवर बीजेपीला बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्यात तितकं यश लाभलेलं नाहीये आणि यंदाची निवडणूक म्हणजे बीजेपीसाठी खूप महत्वाची आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे!

मिथुन सारख्या मोठ्या कलाकाराला सामावून घेतल्यानंतर आता आणखीन एक बातमी समोर येतीये तो म्हणजे दुसऱ्याच्या घरची धुणी भांडी करणाऱ्या एका सामान्य स्त्रीला बीजेपीने तिकीट दिलं आहे, जाणून घेऊया नेमकी भानगड आहे तरी काय?

कलिता माझी नावाच्या एका सामान्य कुटुंबातल्या स्त्रीला बीजेपीने औषग्राम इथल्या विभागासाठी उमेदवारी दिली आहे! घरची आर्थिक परिस्थिति अत्यंत बिकट असल्याने कलिता जास्त शिकू शकल्या नाहीत!

 

kalita majhi inmarathi

 

त्यांचे पती प्लंबिंगची काम करतात, कलिता यांना एक मुलगादेखील आहे तो सध्या आठव्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. कलिता यांच्या माहेरी ७ बहिणी आणि १ भाऊ आहेत, त्यांचे वडीलदेखील मजदूरीची कामं करायचे!

कलिता यांना उमेदवारी दिल्यानंतर बीजेपीचे अनेक कार्यकर्तेसुद्धा खुश आहेत, राष्ट्रीय बीजेपी महासचिव बीएल. संतोष यांनी देखील ट्विट करून भारतीय जनता पक्षाचे आभार मानले असून कलिताजी यांना शुभेच्छा दिल्या आहेत!

कलिताजी या दुसऱ्यांच्या घरची कामं करत असल्या तरी त्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत, ग्रामपंचायत निवडणूकदेखील त्यांनी लढवली आहे. त्यांनी एका व्हीडियो मधून पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या प्रभागात प्रचारासाठी यावे अशी विनंतीदेखील केली आहे!

 

इतकंच नाही तर कविता ज्यांच्याकडे घरकाम करायला जायच्या त्या प्रत्येक घरातल्या लोकांकडे त्यांनी एक महिन्याची सुट्टी देखील मागितली आहे ती केवळ प्रचारासाठी! यावरून आपल्या लक्षात येईल की निवडणुक प्रक्रिया ही आपल्या देशात कुठवर रुजली आहेत!

आज बाहेरून सगळेच राजकारणाला नावं ठेवत असतात पण अशी फार कमी लोकं असतात जी खरंच या दलदलीत उतरून अगदी तळगाळापासून काम करतात!

===

हे ही वाचा लोकशाहीच्या नावाने गळा काढणारे, प. बंगालच्या ह्या भयावह वास्तवाकडे डोळेझाक का करतात?

===

कलिताजी यांच्यासारख्या आणखीन काही गरजू तळागाळातल्या महिलांना बीजेपी ने यावेळेस उमेदवारी दिली आहे, आणि या सगळ्याचा बंगालच्या निवडणुकांवर सकारात्मक परिणाम होईल का नाही हे येणारा काळच ठरवेल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?