' पॅनकार्ड वरील नंबर मागचं लॉजिक जाणून घ्या… – InMarathi

पॅनकार्ड वरील नंबर मागचं लॉजिक जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वयाची अठरा वर्ष पुर्ण होताच सरकारकडून आपल्याला काही ठराविक कागदपत्र दिली जातात.

आपण भारतीय नागरिक असल्याचा हा पुरावा आहे.

आधारकार्ड, पॅनकार्ड, वोटिंग आयडी आणि वाहन चालविण्यासाठी लायसन्स यांसारखी कागदपत्र अत्यंत महत्वाची आहेत.

हे अधिकार दिले जात असले, तरी त्यासाठी आपल्याला नोंदणी करावी लागते.

१८ वर्षे पूर्ण झाली की भारतीय नागरिकाला पॅनकार्ड काढावेच लागते,

मात्र अनेकदा अनेकजण या कागदपत्रांसाठी नोंदणी करण्याचा कंटाळा करतात.

मात्र यामुळे भविष्यात आपलं किती मोठं नुकसान होतं याचा तुम्ही विचारही केला नसेल.

या कागदपत्रांपैकी एक असलेल्या पॅनकार्डबद्दल आज तुम्हाला माहिती देत आहोत.

सरकारने दिलेल्या महत्त्वपूर्ण ओळखपत्रांमध्ये पॅनकार्ड हे अतिशय महत्त्वाचे आहे.

बँकविषयक, आर्थिक, मालमत्ताविषयक वा शासकीय प्रक्रियांवेळी पॅनकार्डचा उपयोग होतोच.

तर अश्या या पॅनकार्डवर एक क्रमांक असतो, जो तुम्ही नक्कीच पाहिला असेल. बऱ्याच ठिकाणी या क्रमांकाबद्दल तुम्हला विचारणाही झाली असेल.

 

pancard-marathipizza00

 

तुमच्याही मनात कधीना कधी विचार आला असेल की हा क्रमांक बऱ्याच ठिकाणी विचारला जातो, म्हणजे नक्कीच हा क्रमांक महत्त्वाचा असणार

आणि या मागे नक्कीच काहीतरी लॉजिक असणार.

अजूनही या क्रमांकामागचा अर्थ तुम्ही शोधत असालं तर तुमचा तो शोध इथे संपणार आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कारण आज आम्ही तुम्हाला या क्रमांकामागचे गुपित सांगणार आहोत.

पॅनकार्ड वरील या क्रमांकाला पॅन नंबर म्हणतात. हा पॅन नंबर १० आकडी असतो. हा क्रमांक पाच भागांमध्ये विभागून आपण प्रत्येक भागाचा अर्थ जाणून घेऊया.

१) पॅन नंबरमध्ये पहिली तीन इंग्रजी मुळाक्षरे असतात.  ही मुळाक्षरे AAA-ZZZ या सिरीजमधील असतात.

 

pancard-inmarathi

समजा एखाद्या पॅनकार्डला AAB ही तीन मुळाक्षरे दिली तर त्या नंतरच्या पॅनकार्डला AAC ही मुळाक्षरे दिली जातात.

अश्याप्रकारे प्रत्येक पॅनकार्डवर AAA-ZZZ या सिरीजमधील मुळाक्षरे आढळून येतात.

२) चौथे मुळाक्षर हे पॅनकार्ड धारकाचे स्टेट्स दर्शवते. पॅन नंबर मधील हे इंग्रजी मुळाक्षर अतिशय महत्त्वाचे असते.

 

pancard inmarathi

 

C – म्हणजे कंपनी
P – म्हणजे पर्सन (व्यक्ती)
H – म्हणजे Hindu Undivided Family (हिंदू संयुक्त कुटुंब)
F – म्हणजे फर्म
A – म्हणजे असोसिएशन ऑफ पर्सन
T – म्हणजे ट्रस्ट
B – म्हणजे बॉडी ऑफ ईंडीव्हिड्यूअल्स
L – म्हणजे लोकल ऑथोरिटी
J – म्हणजे आर्टिफिशियल ज्युरीशियल पर्सन
G – म्हणजे सरकारी संस्था

अश्याप्रकारे प्रत्येक मुळाक्षराचा एक अर्थ आहे. त्यानुसार ते मुळाक्षर त्या पॅनकार्डचे स्टेट्स दर्शवते.

३) पाचवं मुळाक्षर हे पॅनकार्ड धारकाच्या आडनावामधील पहिले मुळाक्षर असते.

 

pancard-inmarathi

 

म्हणजे जर तुमचं नाव राहूल राणे आहे तर पाचवं अक्षर हे R असेल.

४) त्यापुढील ४ क्रमांक हे 0001 ते 9999 या सिरीजमधील असतात.

 

pancard-inmarathi

 

समजा एखाद्या पॅनकार्डला 1125 हे क्रमांक दिले असतील तर त्या नंतरच्या पॅनकार्डला 1126 हे क्रमांक दिले जातात.

अश्याप्रकारे प्रत्येक पॅनकार्डवर 0001 ते 9999 या सिरीजमधील क्रमांक आढळून येतात.

५) शेवटचे इंग्रजी मुळाक्षर हे चेक डीजीट असते. जो पॅन नंबरचा फॉर्म्युला पूर्ण करतो.

 

pancard-inmarathi

 

असं आहे हे पॅनकार्ड मागचं गौडबंगाल!

अर्थात हा आकड्यांचा खेळ जरी क्लिष्ट असला, ते हे डॉक्टुमेंट तुमच्याजवळ असणं अत्यंत गरजेचं आहे.

बॅंकेशी संपर्क साधला तरी देखील पुढील काही दिवसात पॅनकार्ड मिळु शकतं,

त्यामुळे यासाठी कोणतीही सबब न देता पॅनकार्ड मिळवणं प्रत्येक १८ वर्ष आणि त्यावरील प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?